S M L

प्रदेश युवक काँग्रेसच्या मतदानाला सुरूवात

17 सप्टेंबरप्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सरचिटणीस पदांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी आज आणि उद्या दोन दिवस मतदान होत आहे. या मतमोजणीचा निकाल 20 सप्टेंबरला लागणार आहे. अध्यक्षपदासाठी वनमंत्री पंतगराव कदम यांचा मुलगा विश्वजित कदम आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाचा सत्यजित तांबे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. यांच्याशिवाय आणखीही 38 उमेदवार रिंगणात आहेत. पुण्यात काँग्रेस भवनात मतदान होत आहे. या निवडणुकीतही साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर होत असल्याबद्दल नाराजीही व्यक्त होतेय. नागपूरच्या रविनगरमधील अग्रेसन भवनात मतदान सुरू आहे. युवक काँग्रेसच्या नागपूर लोकसभा अध्यक्ष पदासाठी 22 उमेदवार रिंगणात आहेत. खासदार दत्ता मेघे यांचा मुलगा समीर मेघे आणि विलास मुत्तेमवार गटाचे विजय वनवे यांच्यात अध्यक्ष पदासाठी थेट लढत आहे. तर प्रदेश कार्यकारणीसाठी नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत, ऋषी वैद्य, अरविंद कौर रिंगणात आहेत. औरंगाबादेतल्या गांधी भवनात मतदानाला सुरूवात झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2011 08:15 AM IST

प्रदेश युवक काँग्रेसच्या मतदानाला सुरूवात

17 सप्टेंबर

प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सरचिटणीस पदांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी आज आणि उद्या दोन दिवस मतदान होत आहे. या मतमोजणीचा निकाल 20 सप्टेंबरला लागणार आहे. अध्यक्षपदासाठी वनमंत्री पंतगराव कदम यांचा मुलगा विश्वजित कदम आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाचा सत्यजित तांबे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. यांच्याशिवाय आणखीही 38 उमेदवार रिंगणात आहेत. पुण्यात काँग्रेस भवनात मतदान होत आहे. या निवडणुकीतही साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर होत असल्याबद्दल नाराजीही व्यक्त होतेय. नागपूरच्या रविनगरमधील अग्रेसन भवनात मतदान सुरू आहे. युवक काँग्रेसच्या नागपूर लोकसभा अध्यक्ष पदासाठी 22 उमेदवार रिंगणात आहेत. खासदार दत्ता मेघे यांचा मुलगा समीर मेघे आणि विलास मुत्तेमवार गटाचे विजय वनवे यांच्यात अध्यक्ष पदासाठी थेट लढत आहे. तर प्रदेश कार्यकारणीसाठी नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत, ऋषी वैद्य, अरविंद कौर रिंगणात आहेत. औरंगाबादेतल्या गांधी भवनात मतदानाला सुरूवात झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2011 08:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close