S M L

सोलापुरमधील विडी उद्योग संकटात

16 नोव्हेंबर, सोलापूर सिध्दार्थ गोदाम धुम्रपानविरोधी कायद्याचा सर्वाधिक फटका विडी उद्योगाला बसणार आहे. या कायद्याचा आधार घेत आता कारखाना मालकांनी 40 टक्के कामगार कपातीचं हत्यार उपसलं आहे. याच कायद्यातील त्रुटींचा निषेध करण्यासाठी कारखाना मालकांनी 30 नोव्हेंबरपासून बंदचा निर्णय घेतलाय. त्यामुळे विडी कामगारांसमोर नवीन संकट उभं राहिलंय.विडी उद्योग अनेक महिलांना रोजगार पुरवतो. दिवसाकाठी 50 ते 60 रुपयांची मिळकत होते. ' खूप दिवसापासून विडीचे काम करते. विडी बंद करायची तर आम्हाला सरकारने पैसे द्यावे. आम्हाला दुसरं काम येत नाही. नाहीतर आम्हाला काहीतरी खाऊन जीवन संपवावं लागेल ' असं आगम्मा बाई सांगत होत्या. आगम्मा सारख्याच सोलापुरातील 65 हजार महिला कामगारांवर संकट ओढवलंय. त्यासाठी आता विडी कामगार संघटनेनं पुढाकार घेतलाय. ' बहुराष्ट्रीय कंपन्यांना देशी मार्केट देण्याचा हा डाव आहे. 100 पेक्षा जास्त कामगार असतील, तर अशी कपात करता येत नाही. सरकारला विडी उद्योग संपवायचा आहे ' असं कम्युनिस्ट पक्षाचे खासदार नरसय्या आडम यांनी सांगितलं. धुम्रपानविरोधी कायद्यामुळे या उद्योगाला फटका बसल्यानेच कामगार कपातीचा आणि बंदचा निर्णय घेतल्याचं कारखानदारांचं म्हणणं आहे. ' धुम्रपानविरोधी कायद्यामुळे विक्रीत 15 ते 20 टक्के घट झाली. मागणी कमी झाली. कामगार कपातीशिवाय पर्याय नाही ', असं सोलापुर विडी कारखाना मालक सघटनेचे अध्यक्ष गोविदप्रसाद तिवारी सांगत होते.आधीच वेगवेगळी संकटं झेलणारा विडी कामगार आता धुम्रपान विरोधी कायदा आणि कारखाना मालकांच्या निर्णयामुळे पुरता हतबल झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2008 04:12 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2008 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close