S M L

मोदींना पंतप्रधानपदासाठी राज ठाकरेंचा पाठिंबा

19 सप्टेंबरनरेंद्र मोदींच्या उपवासाला आणि सद्भावना मिशनला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. मोदींना शुभेच्छा देण्यासाठी राज यांनी अहमदाबादमध्ये मोदींच्या उपवासाच्या ठिकाणी हजेरी लावली आणि त्यांची भेट घेतली. पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदी यांना आपला पाठिंबा आहे असंही राज यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. गुजरात दौर्‍यावर राज ठाकरे असतांना नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहे आणि आपला नेहमी त्यांना पाठिंबा राहिलं असं म्हटलं होतं. आज राज यांनी मोदींच्या सद्भावना उपवासाच्या ठिकाणी जाऊन भेट घेतली. मोदींचे उपोषण हे एक वेगळ्या आणि चांगल्या कामासाठी आहे. राजकारणापलीकडे ही दुसर जग आहे. मी दौर्‍यावर असतांना ही म्हटलं होतं. मोदींसारखा देशात कोणताही व्यक्ती असो तो जर पंतप्रधान होत असेल तर मोदी का नाही. जर मोदी पंतप्रधान होत असेल तर चांगली गोष्ट आहे. असं राज ठाकरे म्हणाले. काँग्रेसच्या वतीने मोदींना टक्कर देण्यासाठी वाघेलांही उपोषणावर बसले याबद्दल राज यांना विचारणा केली असता राज म्हणाले की, सध्या उपोषणाचे फॅशनच झालं आहे. पण मोदी यांचे उपोषण हे वेगळ आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची मागणी केली नाही. असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 19, 2011 10:30 AM IST

मोदींना पंतप्रधानपदासाठी राज ठाकरेंचा पाठिंबा

19 सप्टेंबर

नरेंद्र मोदींच्या उपवासाला आणि सद्भावना मिशनला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. मोदींना शुभेच्छा देण्यासाठी राज यांनी अहमदाबादमध्ये मोदींच्या उपवासाच्या ठिकाणी हजेरी लावली आणि त्यांची भेट घेतली. पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदी यांना आपला पाठिंबा आहे असंही राज यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

गुजरात दौर्‍यावर राज ठाकरे असतांना नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहे आणि आपला नेहमी त्यांना पाठिंबा राहिलं असं म्हटलं होतं. आज राज यांनी मोदींच्या सद्भावना उपवासाच्या ठिकाणी जाऊन भेट घेतली. मोदींचे उपोषण हे एक वेगळ्या आणि चांगल्या कामासाठी आहे. राजकारणापलीकडे ही दुसर जग आहे. मी दौर्‍यावर असतांना ही म्हटलं होतं. मोदींसारखा देशात कोणताही व्यक्ती असो तो जर पंतप्रधान होत असेल तर मोदी का नाही. जर मोदी पंतप्रधान होत असेल तर चांगली गोष्ट आहे. असं राज ठाकरे म्हणाले. काँग्रेसच्या वतीने मोदींना टक्कर देण्यासाठी वाघेलांही उपोषणावर बसले याबद्दल राज यांना विचारणा केली असता राज म्हणाले की, सध्या उपोषणाचे फॅशनच झालं आहे. पण मोदी यांचे उपोषण हे वेगळ आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची मागणी केली नाही. असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2011 10:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close