S M L

उध्दव ठाकरेंनी खड्‌ड्यांची फोटोग्राफी करावी - राज ठाकरे

19 सप्टेंबरआगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी सुरू झाल्याचं दिसतं आहे. आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली या परिषदेत त्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतलं. दुसर्‍या राज्यात जाऊन तिथल्या प्राण्यांचे फोटो काढण्यापेक्षा मुंबईतल्या रस्त्यांवरपडलेल्या खड्‌ड्यांचे फोटो काढा, असा सणसणीत टोला राज ठाकरेंनी लगावला. मुंबईची माती करण्यापेक्षा पूर्णवेळ फोटो काढणं बरं असंही राज ठाकरेंनी म्हंटलं आहे.गुजरात दौर्‍यावर राज ठाकरे असतांना नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहे आणि आपला नेहमी त्यांना पाठिंबा राहिलं असं म्हटलं होतं. आज राज यांनी मोदींच्या सद्भावना उपवासाच्या ठिकाणी जाऊन भेट घेतली. मोदींचे उपोषण हे एक वेगळ्या आणि चांगल्या कामासाठी आहे. राजकारणापलीकडे ही दुसर जग आहे. मोदींसारखा देशात कोणताही व्यक्ती असो तो जर पंतप्रधान होत असेल तर मोदी का नाही. जर मोदी पंतप्रधान होत असेल तर चांगली गोष्ट आहे. असं राज ठाकरे म्हणाले. आज संध्याकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनीउद्धव ठाकरेंवर टीका केली. बाहेरच्या राज्यात प्राण्यांचे फोटो काढण्यापेक्षा मुंबईतील रस्त्यांवरील खड्‌ड्यांचे फोटो काढा. असा टोला त्यांनी लगावला. संपावर जाणार्‍या महापालिका कर्मचार्‍यांवरही त्यांनी टीका केली. दरवर्षीप्रमाणे यांचं नाटक उभं राहील. संपावर जाण्यापेक्षा चर्चा करून मार्ग काढावा असा सल्लाही राज यांनी दिला. तसेच इमामांच्या हातून टोपी न घालणार्‍या मोदींचं चुकलं नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींची पाठराखण केली. काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक धर्मांच्या टोप्या घातल्या त्यामुळे देशाचं काय भलं झालं. टोप्या घातल्यामुळे कोणाचाही फायदा होत नाही असं राज यांनी म्हटले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 19, 2011 05:41 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2011 05:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close