S M L

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी विश्वजित कदम

20 सप्टेंबरअत्यंत चुरशीच्या झालेल्या युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विश्वजित कदम यांचा विजय झाला. विश्वजित कदम यांनी सत्यजित तांबे यांचा 10 हजारापेक्षा जास्त मतांनी पराभव केला. विश्वजित कदम यांना 25 हजार 307 मतं मिळाली. तर सत्यजित तांबे यांना 14 हजार 414 मतं मिळाली. थोड्याच वेळात याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या निवडणुकीमुळे काँग्रेसमधल्या घराणेशाहीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय. कार्यकारणीत निवडून आलेले सदस्य काँग्रेसमधील कुठल्या ना कुठल्या नेत्याचे नातेवाईकच आहेत.घराणेशाहीवर शिक्कामोर्तबविश्वजित कदम - प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेस - वनमत्री पतंगराव कदमांचा मुलगा सत्यजित तांबे उपाध्यक्ष, युवक काँग्रेस - महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचा भाचाकुणाल राऊत - मुख्य सरचिटणीस, युवक काँग्रेस - रोहयोमंत्री नितीन राऊत यांचा मुलगाराहुल पुगलिया - सरचिटणीस, युवक काँग्रेस - माजी खासदार नरेश पुगलिया यांचा मुलगा

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2011 10:03 AM IST

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी विश्वजित कदम

20 सप्टेंबर

अत्यंत चुरशीच्या झालेल्या युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विश्वजित कदम यांचा विजय झाला. विश्वजित कदम यांनी सत्यजित तांबे यांचा 10 हजारापेक्षा जास्त मतांनी पराभव केला. विश्वजित कदम यांना 25 हजार 307 मतं मिळाली. तर सत्यजित तांबे यांना 14 हजार 414 मतं मिळाली. थोड्याच वेळात याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या निवडणुकीमुळे काँग्रेसमधल्या घराणेशाहीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय. कार्यकारणीत निवडून आलेले सदस्य काँग्रेसमधील कुठल्या ना कुठल्या नेत्याचे नातेवाईकच आहेत.

घराणेशाहीवर शिक्कामोर्तब

विश्वजित कदम - प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेस - वनमत्री पतंगराव कदमांचा मुलगा सत्यजित तांबे उपाध्यक्ष, युवक काँग्रेस - महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचा भाचाकुणाल राऊत - मुख्य सरचिटणीस, युवक काँग्रेस - रोहयोमंत्री नितीन राऊत यांचा मुलगाराहुल पुगलिया - सरचिटणीस, युवक काँग्रेस - माजी खासदार नरेश पुगलिया यांचा मुलगा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2011 10:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close