S M L

नाशकात कांदा,द्राक्ष निर्यातीला 'टेक ऑफ'

21 सप्टेंबरनाशिकमधून आता कांदा, द्राक्ष, डाळींब यांच्या निर्यातीचा हवाई मार्गही मोकळा झाला आहे. ओझर विमानतळावर हवाई कार्गोची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. एचएएल आणि हॅलकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा सुरू होत आहे. ओझर विमानतळावरून 1964 पासून लष्करासाठी मालवाहतुकीची परवानगी होती. मात्र, पहिल्यांदाच आता इतर मालाच्या हवाई वाहतुकीची सोय नाशिककरांसाठी झाली आहे. 70 कोटी रुपयांची गुंतवणूक यात करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला नाशिकमध्ये पहिलं एअर कार्गो उतरणार आहे. नाशिकमधला माल परदेशात पाठवण्यासाठी आता मुंबई विमानतळावर ताटकळावं लागणार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2011 05:35 PM IST

नाशकात कांदा,द्राक्ष निर्यातीला 'टेक ऑफ'

21 सप्टेंबर

नाशिकमधून आता कांदा, द्राक्ष, डाळींब यांच्या निर्यातीचा हवाई मार्गही मोकळा झाला आहे. ओझर विमानतळावर हवाई कार्गोची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. एचएएल आणि हॅलकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा सुरू होत आहे. ओझर विमानतळावरून 1964 पासून लष्करासाठी मालवाहतुकीची परवानगी होती. मात्र, पहिल्यांदाच आता इतर मालाच्या हवाई वाहतुकीची सोय नाशिककरांसाठी झाली आहे. 70 कोटी रुपयांची गुंतवणूक यात करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला नाशिकमध्ये पहिलं एअर कार्गो उतरणार आहे. नाशिकमधला माल परदेशात पाठवण्यासाठी आता मुंबई विमानतळावर ताटकळावं लागणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2011 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close