S M L

माजी क्रिकेटर पतौडी यांचं निधन

22 सप्टेंबरभारतीय टीमचे माजी कॅप्टन मन्सुर अली खान पतौडी यांचं निधन झालं. दिल्लीतल्या सर गंगा राम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. फुप्फुसाच्या आजारामुळे गेल्या महिन्यात त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झालेली नाही. 70 वर्षीय पतौडी भारताचे दिग्गज क्रिकेटर म्हणून ओळखले जातात. 1968 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलँडममध्ये पहिली टेस्ट सीरिज जिंकण्याचा पराक्रम केला होता. 1961 ते 1975 दरम्यान ते भारतीय टीमकडून 46 मॅच खेळले आहेत. 'टायगर' पतौडींचा जीवन प्रवास मन्सुर अली खान पतौडींची ही क्रिकेटच्या मैदानावरील शेवटची एण्ट्री ठरली. निमित्त होतं इंग्लंडमधील भारताच्या पराभवाचं. आपल्या वडिलांच्या नावाने देण्यात येणारी ट्रॉफी विजेत्या इंग्लंडच्या हवाली करताना टायगरला क्रिकेट जगतानं शेवटचं पाहिलं. याच इंग्लंडविरुध्द टायगरच्या तुफान इनिंग क्रिकेट प्रेमींच्या आजही स्मरणात आहे.नवाब पतौडींनी भारतीय क्रिकेटला खर्‍या अर्थाने रॉयल चेहरा दिला. राजघराण्यात जन्मलेल्या पतौडींच्या खेळात शाही झाक होती. इंग्लंडमधील शिक्षणामुळे आलेला आत्मविश्वास पुढे त्यांना क्रिकेट करियरमध्ये उपयोगी आलं.भारतीय टीमचं नेतृत्व करणारे टायगर पतौडी जगातील सगळ्यात तरुण कॅप्टन ठरले होते. 1962 साली अपघाताने पतौडी यांच्याकडे भारताचे कॅप्टनपद चालून आलं. विंडीजदौर्‍यात बाऊंसरवर कॅप्टन नरी कॉण्ट्रॅक्टर जखमी झाल्यामुळे पतौडींकडे कॅप्टनसी सोपवण्यात आली होती. आणि त्यानंतर त्यंानी भारतीय टीमला नवा आत्मविश्वास मिळवून दिला. पतौडींच्याच नेतृत्वाखाली भारतीय टीमने पहिल्यांदा विदेशात टेस्ट सीरिज जिंकली होती. 1968 सालचा न्यूझीलंडविरुध्दचा तो विजय भारताच्या स्पिनर चौकडी आणि पतौडींच्या नेतृत्वासाठी आजही लक्षात राहिला.आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे कार अपघातात वयाच्या 20 व्यावर्षी एक डोळा गमावूनही पतौडींनं हे यश संपादन केलं होतं. कार अपघातात त्यांनी उजवा डोळा गमावला. पण हिम्मतीच्या जोरावर त्यांनी आपल्या शारिरीक अपंगत्वावर मात केली. पतौडी आणखीन एका कारणासाठी सुपरस्टार ठरले. 1969 साली त्यंानी सीनेस्टार शर्मिला टागोरशी लग्न केलं. बॉलीवूडचा सुपरस्टार सैफ अली खान, सोहा आणि जेव्हल्री डिझायनर सबा या त्यांच्या तीन मुलांनी आपापल्या करिअरमध्ये दबदबा राखला. क्रिकेटनंतर पोलो हा पतौडींचा आवडीचा खेळ होता. क्रिकेटमधील त्यांचं योगदान सुवर्ण अक्षरात नोंदवलं जाईल.भारताचा टायगर अर्थात मन्सूर अली खान पतोडी यांचा जन्म भोपाळमध्ये 5 जानेवारी 1941 साली झाला. देहरादूनच्या वेल्हम शाळेत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. ऑक्सफोर्डच्या विन्चेस्टर ऍन्ड बॅलिओल कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. 20 वर्षांचे असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी कायमची गेली. यानंतर 27 डिसेंबर 1969 साली प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोरशी विवाहबद्ध झाले. ते 1961 ते 1975 पर्यंत भारतीय टीमकडून 46 मॅच खेळले. 1962 साली भारतीय टीमच्या कॅप्टनपदी निवड झाली. तर 1964 साली अर्जुन पुरस्कार आणि 1967 साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2011 01:36 PM IST

माजी क्रिकेटर पतौडी यांचं निधन

22 सप्टेंबर

भारतीय टीमचे माजी कॅप्टन मन्सुर अली खान पतौडी यांचं निधन झालं. दिल्लीतल्या सर गंगा राम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. फुप्फुसाच्या आजारामुळे गेल्या महिन्यात त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झालेली नाही. 70 वर्षीय पतौडी भारताचे दिग्गज क्रिकेटर म्हणून ओळखले जातात. 1968 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलँडममध्ये पहिली टेस्ट सीरिज जिंकण्याचा पराक्रम केला होता. 1961 ते 1975 दरम्यान ते भारतीय टीमकडून 46 मॅच खेळले आहेत.

'टायगर' पतौडींचा जीवन प्रवास

मन्सुर अली खान पतौडींची ही क्रिकेटच्या मैदानावरील शेवटची एण्ट्री ठरली. निमित्त होतं इंग्लंडमधील भारताच्या पराभवाचं. आपल्या वडिलांच्या नावाने देण्यात येणारी ट्रॉफी विजेत्या इंग्लंडच्या हवाली करताना टायगरला क्रिकेट जगतानं शेवटचं पाहिलं. याच इंग्लंडविरुध्द टायगरच्या तुफान इनिंग क्रिकेट प्रेमींच्या आजही स्मरणात आहे.

नवाब पतौडींनी भारतीय क्रिकेटला खर्‍या अर्थाने रॉयल चेहरा दिला. राजघराण्यात जन्मलेल्या पतौडींच्या खेळात शाही झाक होती. इंग्लंडमधील शिक्षणामुळे आलेला आत्मविश्वास पुढे त्यांना क्रिकेट करियरमध्ये उपयोगी आलं.

भारतीय टीमचं नेतृत्व करणारे टायगर पतौडी जगातील सगळ्यात तरुण कॅप्टन ठरले होते. 1962 साली अपघाताने पतौडी यांच्याकडे भारताचे कॅप्टनपद चालून आलं. विंडीजदौर्‍यात बाऊंसरवर कॅप्टन नरी कॉण्ट्रॅक्टर जखमी झाल्यामुळे पतौडींकडे कॅप्टनसी सोपवण्यात आली होती. आणि त्यानंतर त्यंानी भारतीय टीमला नवा आत्मविश्वास मिळवून दिला. पतौडींच्याच नेतृत्वाखाली भारतीय टीमने पहिल्यांदा विदेशात टेस्ट सीरिज जिंकली होती. 1968 सालचा न्यूझीलंडविरुध्दचा तो विजय भारताच्या स्पिनर चौकडी आणि पतौडींच्या नेतृत्वासाठी आजही लक्षात राहिला.

आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे कार अपघातात वयाच्या 20 व्यावर्षी एक डोळा गमावूनही पतौडींनं हे यश संपादन केलं होतं. कार अपघातात त्यांनी उजवा डोळा गमावला. पण हिम्मतीच्या जोरावर त्यांनी आपल्या शारिरीक अपंगत्वावर मात केली.

पतौडी आणखीन एका कारणासाठी सुपरस्टार ठरले. 1969 साली त्यंानी सीनेस्टार शर्मिला टागोरशी लग्न केलं. बॉलीवूडचा सुपरस्टार सैफ अली खान, सोहा आणि जेव्हल्री डिझायनर सबा या त्यांच्या तीन मुलांनी आपापल्या करिअरमध्ये दबदबा राखला. क्रिकेटनंतर पोलो हा पतौडींचा आवडीचा खेळ होता. क्रिकेटमधील त्यांचं योगदान सुवर्ण अक्षरात नोंदवलं जाईल.

भारताचा टायगर अर्थात मन्सूर अली खान पतोडी यांचा जन्म भोपाळमध्ये 5 जानेवारी 1941 साली झाला. देहरादूनच्या वेल्हम शाळेत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. ऑक्सफोर्डच्या विन्चेस्टर ऍन्ड बॅलिओल कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. 20 वर्षांचे असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी कायमची गेली. यानंतर 27 डिसेंबर 1969 साली प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोरशी विवाहबद्ध झाले. ते 1961 ते 1975 पर्यंत भारतीय टीमकडून 46 मॅच खेळले. 1962 साली भारतीय टीमच्या कॅप्टनपदी निवड झाली. तर 1964 साली अर्जुन पुरस्कार आणि 1967 साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2011 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close