S M L

सक्षम सुरक्षेशिवाय उघडणार नाही पद्मनाभ मंदिराचा खजिना !

22 सप्टेंबरकेरळच्या पद्मनाभ मंदिरातल्या खजिन्याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. जोपर्यंत सक्षम सुरक्षाव्यवस्था मिळत नाही, तोपर्यंत मंदिराचा उर्वरित खजिना उघडला जाऊ नये, अशी सूचना सुप्रीम कोर्टाने केली. मंदिराला सध्या राज्य सरकार देत असलेल्या सुरक्षेबाबत समाधानी असल्याचंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. पण पद्मनाभ मंदिराला कडक सुरक्षा व्यवस्था आवश्यक असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहेत. मात्र सीआरपीएफ (CRPF) कडे मंदिराची सुरक्षाव्यवस्था द्यायला कोर्टाने नकार दिला. या मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारकडेच राहिल, असा आदेश कोर्टाने दिला. त्यामुळे पद्मनाभ मंदिराचे दरवाजे सध्यातरी बंदच राहणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2011 02:42 PM IST

सक्षम सुरक्षेशिवाय उघडणार नाही पद्मनाभ मंदिराचा खजिना !

22 सप्टेंबर

केरळच्या पद्मनाभ मंदिरातल्या खजिन्याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. जोपर्यंत सक्षम सुरक्षाव्यवस्था मिळत नाही, तोपर्यंत मंदिराचा उर्वरित खजिना उघडला जाऊ नये, अशी सूचना सुप्रीम कोर्टाने केली. मंदिराला सध्या राज्य सरकार देत असलेल्या सुरक्षेबाबत समाधानी असल्याचंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. पण पद्मनाभ मंदिराला कडक सुरक्षा व्यवस्था आवश्यक असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहेत. मात्र सीआरपीएफ (CRPF) कडे मंदिराची सुरक्षाव्यवस्था द्यायला कोर्टाने नकार दिला. या मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारकडेच राहिल, असा आदेश कोर्टाने दिला. त्यामुळे पद्मनाभ मंदिराचे दरवाजे सध्यातरी बंदच राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2011 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close