S M L

रत्नागिरीत बिबट्या अडकला फासात

24 सप्टेंबररत्नागिरी जिल्ह्यात बिबट्या वस्तीत येण्याचे प्रमाण वाढत चाललं आहे. या बिबट्यांना ग्रामस्थांकडून फासात अडकवलं जात आहे. दापोली तालुक्यातल्या वनवशी गावात असाच एक बिबट्या काल रात्रीपासून तब्बल 10 तास फासात अडकून होता. ग्रामस्थांनी वनविभागाला कळवल्यानंतर तब्बल 4 तासांनी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र या बिबट्याला पिंजर्‍यात घ्यायला तब्बल 3 तासांहून जास्त वेळ लागला. बिबट्याचा उजवा पाय तारेच्या फासात अडकल्यामुळे या बिबट्याला काही जखमाही झाल्यात. अंदाजे 2 वर्षाचा असलेल्या या बिबट्याला उपचारानंतर चांदोली अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याचे समजतंय. मात्र बिबट्याला अडकवण्यासाठी लावण्यात आलेला हा फास शिकारीच्याच उद्देशाने लावला गेला असल्याची चर्चा या गावात सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2011 11:52 AM IST

रत्नागिरीत बिबट्या अडकला फासात

24 सप्टेंबर

रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्या वस्तीत येण्याचे प्रमाण वाढत चाललं आहे. या बिबट्यांना ग्रामस्थांकडून फासात अडकवलं जात आहे. दापोली तालुक्यातल्या वनवशी गावात असाच एक बिबट्या काल रात्रीपासून तब्बल 10 तास फासात अडकून होता. ग्रामस्थांनी वनविभागाला कळवल्यानंतर तब्बल 4 तासांनी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र या बिबट्याला पिंजर्‍यात घ्यायला तब्बल 3 तासांहून जास्त वेळ लागला. बिबट्याचा उजवा पाय तारेच्या फासात अडकल्यामुळे या बिबट्याला काही जखमाही झाल्यात. अंदाजे 2 वर्षाचा असलेल्या या बिबट्याला उपचारानंतर चांदोली अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याचे समजतंय. मात्र बिबट्याला अडकवण्यासाठी लावण्यात आलेला हा फास शिकारीच्याच उद्देशाने लावला गेला असल्याची चर्चा या गावात सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2011 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close