S M L

कास पठारावर भरला फुलांचा मेळावा

तुसार तपासे, सातारा 24 सप्टेंबरसातारा जिल्ह्यातील कास पठार सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. कारण इथं भरलाय या विविध रंगी फुलांचा मेळावा. दुर्मिळ आणि देखण्या, नाजूक फुलांनी हे पठार भरून गेलंय. दरवर्षी 15 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबर एवढ्याच काळात ही फुलं इथं उमलतात. यंदा त्यांना फुलायला तब्बल 10 दिवस उशीर झाला. पण आता हे सौंदर्य पहायला राज्यभरातून लोक जमतायेत. ही फुलं उमलण्याचा कालावधी अगदी थोडा असतो. त्यामुळे साहजिकच इथंल सौंदर्यतसेच रहावे अशी अपेक्षा आहे. महाबळेश्वर, पाचगणी, ठोसेघर धबधबा, आणि कास तलाव नंतर सातारा जिल्ह्यातील लोकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलय ते सातारा कास फ्लॉवर व्हॅली. सातारा जिल्ह्यात कास फ्लॉवर व्हॅली इथ फुललेल्या रंगीबेरंगी फुलांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं. लोकांची गर्दी इथं दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दुर्मिळ आणि सुंदर अशा फुलांनी कास पठार व्हॅलीचा परिसर भरुन घेला आहे. दरवर्षी 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत ही फुले कास पठारावर येतात. पण, यंदा 10 दिवस उशीरा ही फुले उमलली पण, तरीही ह्या फुलाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी फक्त सातारा जिल्ह्यातीलच नाही तर देशातून, परदेशातूनही ही फुले पाहण्यास पर्यटक येत आहे. काही दिवसच ही फुले उमलतातपण, त्यामुळे या फुलांना नुकसान पोहचणार्‍यांना 100 दंड केला जातो. या फुलांचे संरक्षण वन विभाग आणि स्थानिक पोलिसंाच्या हाती आहे. पण, दुर्देवाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही विभाग याकडे दुर्लक्ष करतात परिणामी फुले पहायला येणारे पर्यटक ही फुले तोडतात आणि पायदाळी तुडवतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2011 12:01 PM IST

कास पठारावर भरला फुलांचा मेळावा

तुसार तपासे, सातारा

24 सप्टेंबर

सातारा जिल्ह्यातील कास पठार सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. कारण इथं भरलाय या विविध रंगी फुलांचा मेळावा. दुर्मिळ आणि देखण्या, नाजूक फुलांनी हे पठार भरून गेलंय. दरवर्षी 15 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबर एवढ्याच काळात ही फुलं इथं उमलतात. यंदा त्यांना फुलायला तब्बल 10 दिवस उशीर झाला. पण आता हे सौंदर्य पहायला राज्यभरातून लोक जमतायेत. ही फुलं उमलण्याचा कालावधी अगदी थोडा असतो. त्यामुळे साहजिकच इथंल सौंदर्यतसेच रहावे अशी अपेक्षा आहे.

महाबळेश्वर, पाचगणी, ठोसेघर धबधबा, आणि कास तलाव नंतर सातारा जिल्ह्यातील लोकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलय ते सातारा कास फ्लॉवर व्हॅली. सातारा जिल्ह्यात कास फ्लॉवर व्हॅली इथ फुललेल्या रंगीबेरंगी फुलांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं. लोकांची गर्दी इथं दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

दुर्मिळ आणि सुंदर अशा फुलांनी कास पठार व्हॅलीचा परिसर भरुन घेला आहे. दरवर्षी 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत ही फुले कास पठारावर येतात. पण, यंदा 10 दिवस उशीरा ही फुले उमलली पण, तरीही ह्या फुलाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी फक्त सातारा जिल्ह्यातीलच नाही तर देशातून, परदेशातूनही ही फुले पाहण्यास पर्यटक येत आहे. काही दिवसच ही फुले उमलतातपण, त्यामुळे या फुलांना नुकसान पोहचणार्‍यांना 100 दंड केला जातो. या फुलांचे संरक्षण वन विभाग आणि स्थानिक पोलिसंाच्या हाती आहे. पण, दुर्देवाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही विभाग याकडे दुर्लक्ष करतात परिणामी फुले पहायला येणारे पर्यटक ही फुले तोडतात आणि पायदाळी तुडवतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2011 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close