S M L

लाच दिली नाही म्हणून ड्रायव्हरची हत्या

26 सप्टेंबरउत्तर प्रदेशातल्या चंदौलीत एक धक्कादायक घटना घडली. आरटीओच्या अधिकार्‍याला लाच द्यायला नकार दिल्याच्या कारणावरून एका ट्रक ड्रायव्हरला चिरडण्यात आलं. या प्रकरणात आरटीओच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे असा आरोप मृत ड्रायव्हरच्या मुलाने केला. चंदौलीजवळ एनएच-2 वरच्या चेकपोस्टवर ही घटना घडली. सहाय्यक आरटीओ अधिकार्‍याने गुप्ता नावाच्या ड्रायव्हरची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी पोलिसांविरोधात निदर्शनं केली. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना हवेत फायरिंग ही करावा लागला. विशेष म्हणजे चंदौली हे बिहार आणि युपीची बॉर्डर आहे. येथे नेहमी वसुली करण्याचा गौरखधंदा सुरू असतो. ट्रक ड्रायव्हरचं म्हणणं आहे की, आरटीओ अधिकारी बनावट पावतीच्या नावावर परेशान करतात आणि अवैध वसुली करतात. तसेच ड्रायव्हरचा आरोप आहे की आजही आरटीओ अधिकारी अवैध वसुली करत होते. आनंद नावाच्या ड्रायव्हरने लाच देण्यास नकार दिल्यामुळे अधिकार्‍यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत आनंदचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जमलेल्या ट्रक ड्रायव्हरनी नॅशनल हायवे जाम करण्याचा प्रयत्न केला. तसेच जवळच्या गावातील ही बातमी पोहचताच गावकरी ही यात सहभागी झाले. यानंतर हायवे जाम करण्यात आला. तर दुसरीकडे पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाईसाठी मृत ड्रायव्हरच्या पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2011 05:19 PM IST

लाच दिली नाही म्हणून ड्रायव्हरची हत्या

26 सप्टेंबर

उत्तर प्रदेशातल्या चंदौलीत एक धक्कादायक घटना घडली. आरटीओच्या अधिकार्‍याला लाच द्यायला नकार दिल्याच्या कारणावरून एका ट्रक ड्रायव्हरला चिरडण्यात आलं. या प्रकरणात आरटीओच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे असा आरोप मृत ड्रायव्हरच्या मुलाने केला. चंदौलीजवळ एनएच-2 वरच्या चेकपोस्टवर ही घटना घडली. सहाय्यक आरटीओ अधिकार्‍याने गुप्ता नावाच्या ड्रायव्हरची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी पोलिसांविरोधात निदर्शनं केली. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना हवेत फायरिंग ही करावा लागला. विशेष म्हणजे चंदौली हे बिहार आणि युपीची बॉर्डर आहे. येथे नेहमी वसुली करण्याचा गौरखधंदा सुरू असतो. ट्रक ड्रायव्हरचं म्हणणं आहे की, आरटीओ अधिकारी बनावट पावतीच्या नावावर परेशान करतात आणि अवैध वसुली करतात. तसेच ड्रायव्हरचा आरोप आहे की आजही आरटीओ अधिकारी अवैध वसुली करत होते. आनंद नावाच्या ड्रायव्हरने लाच देण्यास नकार दिल्यामुळे अधिकार्‍यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत आनंदचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जमलेल्या ट्रक ड्रायव्हरनी नॅशनल हायवे जाम करण्याचा प्रयत्न केला. तसेच जवळच्या गावातील ही बातमी पोहचताच गावकरी ही यात सहभागी झाले. यानंतर हायवे जाम करण्यात आला. तर दुसरीकडे पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाईसाठी मृत ड्रायव्हरच्या पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2011 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close