S M L

कॅश फॉर व्होट प्रकरणाची भाजपला पूर्वकल्पना होती - सुधींद्र कुलकर्णी

27 सप्टेंबरकॅश फॉर व्होटप्रकरणात स्टींग ऑपरेशनची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पूर्वकल्पना होती अशी कबुली सुधींद्र कुलकर्णी यांनी दिली. याप्रकरणी सुधींद्रकुलकर्णी आज कोर्टात हजर झाले. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहेत. पण आपण जे केलं ते भ्रष्टाचार उघड करण्यासाठी केलं जर भ्रष्टाचार उघड करणं गुन्हा असेल तर आपण जेलमध्ये जाण्यास तयार आहोत. पण मग काँग्रेसच्या नेत्यांनाही याप्रकरणी गजाआड केलं पाहिजे अशी मागणी सुधींद्र कुलकर्णी यांनी केली. दरम्यान अमरसिंग यांनी उपचारांसाठी परदेशी जाण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली होती. दिल्ली कोर्टात आज याविषयीचा निर्णय होणार आहे. अमरसिंग यांना देण्यात आलेला जामीन आज संपतोय. तीस हजारी कोर्टाने अमरसिंग यांना जामीन दिला तेव्हा तब्येतीच्या कारणावरून हा जामीन देण्यात आला होता पण त्यामध्ये उपचारांसाठी परदेश प्रवासाची परवानगी देण्यात आलेली नव्हती. शिवाय अमरसिंग यांना त्यांचा पासपोर्ट आणि 2 लाखांचं हमीपत्रंही दाखल करावं लागलं होतं. अमरसिंग यांना वैद्यकीय उपचारांसाठी सिंगापूरला जाणं गरजेचं असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2011 08:48 AM IST

कॅश फॉर व्होट प्रकरणाची भाजपला पूर्वकल्पना होती - सुधींद्र कुलकर्णी

27 सप्टेंबर

कॅश फॉर व्होटप्रकरणात स्टींग ऑपरेशनची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पूर्वकल्पना होती अशी कबुली सुधींद्र कुलकर्णी यांनी दिली. याप्रकरणी सुधींद्रकुलकर्णी आज कोर्टात हजर झाले. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहेत. पण आपण जे केलं ते भ्रष्टाचार उघड करण्यासाठी केलं जर भ्रष्टाचार उघड करणं गुन्हा असेल तर आपण जेलमध्ये जाण्यास तयार आहोत. पण मग काँग्रेसच्या नेत्यांनाही याप्रकरणी गजाआड केलं पाहिजे अशी मागणी सुधींद्र कुलकर्णी यांनी केली.

दरम्यान अमरसिंग यांनी उपचारांसाठी परदेशी जाण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली होती. दिल्ली कोर्टात आज याविषयीचा निर्णय होणार आहे. अमरसिंग यांना देण्यात आलेला जामीन आज संपतोय. तीस हजारी कोर्टाने अमरसिंग यांना जामीन दिला तेव्हा तब्येतीच्या कारणावरून हा जामीन देण्यात आला होता पण त्यामध्ये उपचारांसाठी परदेश प्रवासाची परवानगी देण्यात आलेली नव्हती. शिवाय अमरसिंग यांना त्यांचा पासपोर्ट आणि 2 लाखांचं हमीपत्रंही दाखल करावं लागलं होतं. अमरसिंग यांना वैद्यकीय उपचारांसाठी सिंगापूरला जाणं गरजेचं असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2011 08:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close