S M L

शिक्षकांनीच लाटलं विद्यार्थ्यांचे अनुदान

गणेश गायकवाड, मुंबई27 सप्टेंबरकेंद्र सरकारने विद्यार्थांच्या संर्वधनासाठी आणि प्रोत्साहनासाठी दिलेल्या अनुदानाचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ तालुक्यात राहटोली गावातील शाळेत उघडकीस आला. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा या उद्देशाने विद्यार्थ्यांना इंस्पायरी ऍवार्ड देण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी सादर करावयाचे प्रयोग शिक्षकांनीच रेडीमेड आणून सादर करुन विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीचाच गळा घोटला. तसेच इंस्पायरी ऍवार्डच्या स्वरुपात आलेली रक्कम ही शिक्षकांनीच अपहार केल्याची तक्रार विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा या करता केंद्र शासनाने पहिल्यांदाच इंस्पायरी ऍवार्ड नावाने एक विशेष योजना सुरु केली आहे. पण, या योजनेला काळीमा फासण्याचं काम अंबरनाथ तालुक्यात उघडकीला आलं. अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी प्राची खोतची इंस्पायरी ऍवार्डसाठी निवड झाली होती. तिच्या नावे अनुदानाचे 5,000 हजार रुपयेही आले. तिनं सौर उर्जेवर चालणारा एक प्रयोग सादर केल्याचं दाखवलं गेलं. पण, धक्कादायक प्रकार म्हणजे तिनं कोणताही प्रयोग सादर केला नाही की, तिला कोणत्याही प्रकारचं अनुदान मिळालं नाही अशी तक्रार तिनं बोर्ड ऑफ डायरेक्टरकडे केली. विद्यार्थिनी प्राची खोत म्हणते, मी प्रयोग केला नाही आणि अनुदानाचे पैसेही घेतले नाहीत. हे पैसे आमच्या शिक्षिका यांनी घेतल्याचा माझा आरोप आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेतून कल्पक आणि संशोधक वृत्ती असणार्‍या दोन विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांची नावं शिक्षण विभागाकडे पाठवली जातात त्यानंतर त्यांच्या नावे केंद्र शासनाचा 5 हजार रुपयांचा चेक येतो. त्यापैकी 2500 रुपये विद्यार्थ्याला प्रयोगासाठी लागणार्‍या साधन सामुग्रीसाठी आणि 2500 रुपये प्रवास खर्चासाठी दिले जातात. प्राची प्रमाणेच पूनम चव्हाण हिच्या बाबतीतही असा प्रकार घडला. या विद्यार्थ्यांच्या पालकांना हा प्रकार कळाल्यावर त्यांनाही धक्का बसला.प्राचीचे वडील प्रकाश खोत म्हणतात, हा घडलेला प्रकार धक्कादायक असून असं जर घडत राहिलं तर योजनेचे बारा वाजतील.या प्रकरणाची दखल गट विकास अधिकार्‍यांनीही घेतली. गट विकास अधिकारी प्रमोद गोडांबे म्हणतात, तक्रार माझ्याकडे आल्यानंतर सीमा गायकवाड या शिक्षिकेला मी नोटीस बजावली असून खुलासा मागवला आहे.इंस्पायरी ऍवार्डही योजना पहिल्यांदाच राबविली जातेय. पण, या योजनेचे तीन तेरा वाजवले जातायेत तेही विद्यार्थांपुढे आदर्श निर्माण करणार्‍या शिक्षकांकडूनच. या योजनेअंतर्गत मिळाणारी रक्कम ही जरी छोटी असली तरी देशातील लाखो शाळांध्ये असा प्रकार घडला तर देशातील हा सर्वात मोठा घोटाळा असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि स्वप्नांचा खेळ खंडोबा होण्याआधीच सरकारने या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2011 01:54 PM IST

शिक्षकांनीच लाटलं विद्यार्थ्यांचे अनुदान

गणेश गायकवाड, मुंबई

27 सप्टेंबर

केंद्र सरकारने विद्यार्थांच्या संर्वधनासाठी आणि प्रोत्साहनासाठी दिलेल्या अनुदानाचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ तालुक्यात राहटोली गावातील शाळेत उघडकीस आला. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा या उद्देशाने विद्यार्थ्यांना इंस्पायरी ऍवार्ड देण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी सादर करावयाचे प्रयोग शिक्षकांनीच रेडीमेड आणून सादर करुन विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीचाच गळा घोटला. तसेच इंस्पायरी ऍवार्डच्या स्वरुपात आलेली रक्कम ही शिक्षकांनीच अपहार केल्याची तक्रार विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.

शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा या करता केंद्र शासनाने पहिल्यांदाच इंस्पायरी ऍवार्ड नावाने एक विशेष योजना सुरु केली आहे. पण, या योजनेला काळीमा फासण्याचं काम अंबरनाथ तालुक्यात उघडकीला आलं. अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी प्राची खोतची इंस्पायरी ऍवार्डसाठी निवड झाली होती.

तिच्या नावे अनुदानाचे 5,000 हजार रुपयेही आले. तिनं सौर उर्जेवर चालणारा एक प्रयोग सादर केल्याचं दाखवलं गेलं. पण, धक्कादायक प्रकार म्हणजे तिनं कोणताही प्रयोग सादर केला नाही की, तिला कोणत्याही प्रकारचं अनुदान मिळालं नाही अशी तक्रार तिनं बोर्ड ऑफ डायरेक्टरकडे केली.

विद्यार्थिनी प्राची खोत म्हणते, मी प्रयोग केला नाही आणि अनुदानाचे पैसेही घेतले नाहीत. हे पैसे आमच्या शिक्षिका यांनी घेतल्याचा माझा आरोप आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेतून कल्पक आणि संशोधक वृत्ती असणार्‍या दोन विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांची नावं शिक्षण विभागाकडे पाठवली जातात त्यानंतर त्यांच्या नावे केंद्र शासनाचा 5 हजार रुपयांचा चेक येतो. त्यापैकी 2500 रुपये विद्यार्थ्याला प्रयोगासाठी लागणार्‍या साधन सामुग्रीसाठी आणि 2500 रुपये प्रवास खर्चासाठी दिले जातात.

प्राची प्रमाणेच पूनम चव्हाण हिच्या बाबतीतही असा प्रकार घडला. या विद्यार्थ्यांच्या पालकांना हा प्रकार कळाल्यावर त्यांनाही धक्का बसला.प्राचीचे वडील प्रकाश खोत म्हणतात, हा घडलेला प्रकार धक्कादायक असून असं जर घडत राहिलं तर योजनेचे बारा वाजतील.

या प्रकरणाची दखल गट विकास अधिकार्‍यांनीही घेतली. गट विकास अधिकारी प्रमोद गोडांबे म्हणतात, तक्रार माझ्याकडे आल्यानंतर सीमा गायकवाड या शिक्षिकेला मी नोटीस बजावली असून खुलासा मागवला आहे.

इंस्पायरी ऍवार्डही योजना पहिल्यांदाच राबविली जातेय. पण, या योजनेचे तीन तेरा वाजवले जातायेत तेही विद्यार्थांपुढे आदर्श निर्माण करणार्‍या शिक्षकांकडूनच. या योजनेअंतर्गत मिळाणारी रक्कम ही जरी छोटी असली तरी देशातील लाखो शाळांध्ये असा प्रकार घडला तर देशातील हा सर्वात मोठा घोटाळा असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि स्वप्नांचा खेळ खंडोबा होण्याआधीच सरकारने या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2011 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close