S M L

अनावश्यक मेसेजेस आणि कॉल्सवर आजपासून बंदी

27 सप्टेंबरविविध कंपन्यांकडून येणारे जाहिरातीचे अनावश्यक कॉल्स आणि एसएमएसला वैतागलेल्या लोकांना आजपासून दिलासा मिळणार आहे. मोबाईलवर येणारे जाहिरातीचे कॉल्स आणि बल्क एसएमएस बंद होणार आहेत. फक्त यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनची नोंद 'डू नॉट डिस्टर्ब' लिस्टमध्ये करावी लागेल. अशी नोंद करूनही जर तुम्हाला टेलीमार्केटिंग कॉल्स किंवा एसएमएस आले तर कंपन्यांना अडीच लाखांपर्यंतचा दंड होऊ शकतो. फक्त यासाठी 'नॅशनल कस्टमर प्रेफरन्स रजिस्ट्री (National Customer Preference Registry) मध्ये तुमचा नंबर नोंदवायचा आहे. 1909 या नंबरवर फोन करुन तुम्ही तुमचा नंबर नोंदवू शकता. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने तयार केलेल्या नियमावलीनुसार आता मोबाईल कंपन्यांना अशी सेवा नाकरलेल्या ग्राहकांना एसएमएस पाठवता येणार नाहीत. असे एसएमएस संपुर्णपणे बंद करता येत नसतील तर तुम्ही काहीप्रमाणातही ही सेवा ब्लॉक करु शकालं. नंबर रजिस्टर केल्यानंतरही जर तुम्हाला असे एसएमएस येत असतील तर तुम्ही तुमच्या मोबाईल कंपनीकडे तक्रार करु शकता. ट्रायने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन न करणार्‍या कंपन्यांना अडीच लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. असे कॉल बंद करण्यासाठी तुम्हाला करावे लागेल 1. National Customer Preference Registry मध्ये तुमचा मोबाईल नंबर नोंदवावा लागेल2. 1909 या नंबरवर फोन करुन तुम्ही तुमचा नंबर नोंदवू शकता. किंवा मग START O असा एसएमएस 1909 या नंबरवर पाठवून देखील तुम्ही तुमचा नंबर रजिस्टर करू शकता.3. www.nccptrai.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही तुमचा नंबर नोंदवू शकता

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2011 05:26 PM IST

अनावश्यक मेसेजेस आणि कॉल्सवर आजपासून बंदी

27 सप्टेंबर

विविध कंपन्यांकडून येणारे जाहिरातीचे अनावश्यक कॉल्स आणि एसएमएसला वैतागलेल्या लोकांना आजपासून दिलासा मिळणार आहे. मोबाईलवर येणारे जाहिरातीचे कॉल्स आणि बल्क एसएमएस बंद होणार आहेत. फक्त यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनची नोंद 'डू नॉट डिस्टर्ब' लिस्टमध्ये करावी लागेल. अशी नोंद करूनही जर तुम्हाला टेलीमार्केटिंग कॉल्स किंवा एसएमएस आले तर कंपन्यांना अडीच लाखांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

फक्त यासाठी 'नॅशनल कस्टमर प्रेफरन्स रजिस्ट्री (National Customer Preference Registry) मध्ये तुमचा नंबर नोंदवायचा आहे. 1909 या नंबरवर फोन करुन तुम्ही तुमचा नंबर नोंदवू शकता. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने तयार केलेल्या नियमावलीनुसार आता मोबाईल कंपन्यांना अशी सेवा नाकरलेल्या ग्राहकांना एसएमएस पाठवता येणार नाहीत. असे एसएमएस संपुर्णपणे बंद करता येत नसतील तर तुम्ही काहीप्रमाणातही ही सेवा ब्लॉक करु शकालं. नंबर रजिस्टर केल्यानंतरही जर तुम्हाला असे एसएमएस येत असतील तर तुम्ही तुमच्या मोबाईल कंपनीकडे तक्रार करु शकता. ट्रायने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन न करणार्‍या कंपन्यांना अडीच लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

असे कॉल बंद करण्यासाठी तुम्हाला करावे लागेल

1. National Customer Preference Registry मध्ये तुमचा मोबाईल नंबर नोंदवावा लागेल2. 1909 या नंबरवर फोन करुन तुम्ही तुमचा नंबर नोंदवू शकता. किंवा मग START O असा एसएमएस 1909 या नंबरवर पाठवून देखील तुम्ही तुमचा नंबर रजिस्टर करू शकता.3. www.nccptrai.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही तुमचा नंबर नोंदवू शकता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2011 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close