S M L

टाटाला दिलेल्या जमिनी शेतकर्‍यांना परत ; ममतादीदींचा विजय

28 सप्टेंबरसिंगूर जमीन प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक विजय मिळाला. सिंगूर भूसंपादन कायदा घटनात्मक आहे असा निर्वाळा हायकोर्टाने दिला. टाटांच्या नॅनो प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनी परत करण्यासंबंधीचा हा कायदा 14 जूनला ममता बॅनर्जी सत्तेवर आल्यानंतर मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार आता इथल्या शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनी परत मिळणार आहेत. टाटांच्या नॅनो कार प्रकल्पासाठी ही जागा घेण्यात आली होती. ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी उपोषण आंदोलनही केलं होतं. त्यानंतर टाटांनी 3 ऑक्टोबर 2006 रोजी या प्रकल्पातून माघार घेतली होती. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच शेतकर्‍यांना त्यांच्या जागा परत करण्याचा निर्णय ममता बॅनजीर्ंनी घेतला होता. या निर्णयात टाटा कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे आदेशही पश्चिम बंगाल हायकोर्टाने दिले आहेत. तसेच टाटांकडून राज्याकडे होणारे जमिनीचे हस्तांतरणही योग्य पद्धतीनं व्हावं म्हणून काही विशेष अधिकार्‍यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 28, 2011 09:31 AM IST

टाटाला दिलेल्या जमिनी शेतकर्‍यांना परत ; ममतादीदींचा विजय

28 सप्टेंबर

सिंगूर जमीन प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक विजय मिळाला. सिंगूर भूसंपादन कायदा घटनात्मक आहे असा निर्वाळा हायकोर्टाने दिला. टाटांच्या नॅनो प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनी परत करण्यासंबंधीचा हा कायदा 14 जूनला ममता बॅनर्जी सत्तेवर आल्यानंतर मंजूर करण्यात आला.

या कायद्यानुसार आता इथल्या शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनी परत मिळणार आहेत. टाटांच्या नॅनो कार प्रकल्पासाठी ही जागा घेण्यात आली होती. ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी उपोषण आंदोलनही केलं होतं. त्यानंतर टाटांनी 3 ऑक्टोबर 2006 रोजी या प्रकल्पातून माघार घेतली होती. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच शेतकर्‍यांना त्यांच्या जागा परत करण्याचा निर्णय ममता बॅनजीर्ंनी घेतला होता. या निर्णयात टाटा कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे आदेशही पश्चिम बंगाल हायकोर्टाने दिले आहेत. तसेच टाटांकडून राज्याकडे होणारे जमिनीचे हस्तांतरणही योग्य पद्धतीनं व्हावं म्हणून काही विशेष अधिकार्‍यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2011 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close