S M L

नवी मुंबईत 'आदर्श' घोटाळा !

29 सप्टेंबरनवी मुंबईतीलबेलापूर सिडको आणि नगरविकास खात्याच्या आशिर्वादाने आणखीन एक आदर्श घोटाळा समोर आला आहे. 1987 साली 16 लाख 80 हजार भरुन ऐरोली इथं 2 हजार 400 स्केअर मिटरचा भूखंड सिडको कडून मिळवून देखील. तब्बल 24 वर्षानंतर त्याच जुन्या रक्कमेवर आणि त्याच कागदपत्रांवर नव्यानं बेलापूर इथं मोक्याच्या ठिकाणी 2 हजार 400 मिटरचा भूखंड सिडकोनं दिला. आणि हा भूखंड देण्यासाठी चक्क नगर विकास खात्याने आदेश दिले आहेत. नगरविकास खात एवढ्यावर थांबलं नाही तर या टर्निंगपॉईन्ट इमारतीला एक एफएसआय(FSI) ऐवजी दीड एफएसआय देण्याचेही आदेश दिले आहेत. यामुळे सिडकोचं आजच्या बाजार भावाने 25 कोटींच नुकसान झालयं ऍन्टी करप्शनच्या चौकशीत हा भूखंड घोटाळा समोर आला आहे. ओम शांती सोसायटीच्या नावानं भूखंड बळकवणार्‍या या सोसायटीचा चीफ प्रमोटर आहे प्यारेलाल प्रजापती. प्यारेलाल हा राज्यातील बड्या नेत्यांचा आणि सनदी अधिकार्‍याचा जवळचा मानला जातो. या प्रकरणात प्यारेलाल प्रजापती यांना अँन्टीकरप्शनं दोषी ठरवलंय. तर त्याच्यासोबत त्याची पत्नी दुलारी देवी प्रजापती, संजीव प्रजापती, राजेश प्रजापती यांचीही नावं आहेत. त्याचबरोबर प्रजापती यांनी मदत करणार्‍या अधिकार्‍यांवरही अँन्टी करप्शनने दोषी ठरवलं आहे. कोण आहेत हे अधिकारी. मुन्शीलाल गौतम- निवृत्त सहसचिव, नगरविकास विभागएस.एन.गवळी- निवृत्त, अपर सचिव, नगरविकास विभागजी.एन.तलरेजा- निवृत्त उपसचिव, नगरविकास विभागपी.व्ही.घाडगे- उपसचिव, नगरविकास विभागखुर्शीद पटेल- निवृत्त कंपनी सचिव, सिडकोपिलाजी परब, निवृत्त मार्केटिंग मॅनेजर, सिडकोअरुण सबनीस- निवृत्तमार्केटिंग मॅनेजर, सिडकोनारायण इदाते- इस्टेट ऑफिसर, सिडको

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 29, 2011 10:06 AM IST

नवी मुंबईत 'आदर्श' घोटाळा !

29 सप्टेंबर

नवी मुंबईतीलबेलापूर सिडको आणि नगरविकास खात्याच्या आशिर्वादाने आणखीन एक आदर्श घोटाळा समोर आला आहे. 1987 साली 16 लाख 80 हजार भरुन ऐरोली इथं 2 हजार 400 स्केअर मिटरचा भूखंड सिडको कडून मिळवून देखील. तब्बल 24 वर्षानंतर त्याच जुन्या रक्कमेवर आणि त्याच कागदपत्रांवर नव्यानं बेलापूर इथं मोक्याच्या ठिकाणी 2 हजार 400 मिटरचा भूखंड सिडकोनं दिला. आणि हा भूखंड देण्यासाठी चक्क नगर विकास खात्याने आदेश दिले आहेत. नगरविकास खात एवढ्यावर थांबलं नाही तर या टर्निंगपॉईन्ट इमारतीला एक एफएसआय(FSI) ऐवजी दीड एफएसआय देण्याचेही आदेश दिले आहेत. यामुळे सिडकोचं आजच्या बाजार भावाने 25 कोटींच नुकसान झालयं ऍन्टी करप्शनच्या चौकशीत हा भूखंड घोटाळा समोर आला आहे. ओम शांती सोसायटीच्या नावानं भूखंड बळकवणार्‍या या सोसायटीचा चीफ प्रमोटर आहे प्यारेलाल प्रजापती. प्यारेलाल हा राज्यातील बड्या नेत्यांचा आणि सनदी अधिकार्‍याचा जवळचा मानला जातो. या प्रकरणात प्यारेलाल प्रजापती यांना अँन्टीकरप्शनं दोषी ठरवलंय. तर त्याच्यासोबत त्याची पत्नी दुलारी देवी प्रजापती, संजीव प्रजापती, राजेश प्रजापती यांचीही नावं आहेत.

त्याचबरोबर प्रजापती यांनी मदत करणार्‍या अधिकार्‍यांवरही अँन्टी करप्शनने दोषी ठरवलं आहे. कोण आहेत हे अधिकारी. मुन्शीलाल गौतम- निवृत्त सहसचिव, नगरविकास विभागएस.एन.गवळी- निवृत्त, अपर सचिव, नगरविकास विभागजी.एन.तलरेजा- निवृत्त उपसचिव, नगरविकास विभागपी.व्ही.घाडगे- उपसचिव, नगरविकास विभागखुर्शीद पटेल- निवृत्त कंपनी सचिव, सिडकोपिलाजी परब, निवृत्त मार्केटिंग मॅनेजर, सिडकोअरुण सबनीस- निवृत्तमार्केटिंग मॅनेजर, सिडकोनारायण इदाते- इस्टेट ऑफिसर, सिडको

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2011 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close