S M L

कळसूबाईच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

02 ऑक्टोबरदेशभरात सध्या नवरात्रीची धूम सुरु आहे. राज्यातल्या सर्वात उंच ठिकाणी असलेली देवी म्हणजे कळसूबाई शिखरावरची. कळसूबाई या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची सध्या गर्दी झाली आहे. अहमदनगरमध्ये भंडारदरा धरण परिसरात हे देवी वसली आहे. मूळची आदिवासी समाजाच्या या देवीची नवरात्रीत यात्रा भरते. राज्यात इतरत्र वसलेले हजारो आदिवासी यानिमित्ताने कळसूबाईच्या शिखरावर देवीच्या दर्शनासाठी येतात. डोंगरावर डोंगर अशा पद्धतीची नैसर्गिक रचना या मंदिराची आहे. काही वर्षांपूर्वी डोंगरांच्या कपारीला साखळदंड लावले होते. त्यावरुन चढाई करावी लागत होती आता मात्र गावकरी आणि मंदिर प्रशासनाने लोखंडी शिड्या लावल्या आहेत. त्यामुळे आबालवृद्धांना आता मंदिरात येणे सोपं झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2011 11:29 PM IST

कळसूबाईच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

02 ऑक्टोबर

देशभरात सध्या नवरात्रीची धूम सुरु आहे. राज्यातल्या सर्वात उंच ठिकाणी असलेली देवी म्हणजे कळसूबाई शिखरावरची. कळसूबाई या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची सध्या गर्दी झाली आहे. अहमदनगरमध्ये भंडारदरा धरण परिसरात हे देवी वसली आहे. मूळची आदिवासी समाजाच्या या देवीची नवरात्रीत यात्रा भरते. राज्यात इतरत्र वसलेले हजारो आदिवासी यानिमित्ताने कळसूबाईच्या शिखरावर देवीच्या दर्शनासाठी येतात. डोंगरावर डोंगर अशा पद्धतीची नैसर्गिक रचना या मंदिराची आहे. काही वर्षांपूर्वी डोंगरांच्या कपारीला साखळदंड लावले होते. त्यावरुन चढाई करावी लागत होती आता मात्र गावकरी आणि मंदिर प्रशासनाने लोखंडी शिड्या लावल्या आहेत. त्यामुळे आबालवृद्धांना आता मंदिरात येणे सोपं झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2011 11:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close