S M L

मेळघाटात 6 महिन्यात 226 कुपोषित बालकांचा मृत्यू

03 ऑक्टोबरकुपोषणाच्या समस्येवर कित्येक कोटींचा खर्च होऊनही, मेळघाटातल्या आदिवासी पाड्यांवरील 226 बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला आहे. गेल्या 6 महिन्यात तब्बल 226 आदिवासी बालकं दगावली आहेत. तर 2 हजार 532 बालकं अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचे दावे फोल ठरले आहेत. त्याचबरोबर भागात काम करीत असलेल्या अनेक एनजीओ आणि सरकारी यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्हं उपस्थित झाले आहेत.विशेष म्हणजे आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतूनच ही धक्कादायक माहिती समोर आली. पण सरकारी अधिकारी मात्र मेळघाटात मॅक्रो प्लॅनिंग केल्याचा दावा करत आहे. सरकारी यंत्रणेव्यतिरिक्त या भागात जवळपास 350 स्वयंसेवी संस्था सक्रिय आहे. तसेच 1 उपजिल्हा रुग्णालय,11 प्राथमिक आरोग्य केंद्र यावरही करोडोंचा सरकारी निधी दरवर्षी खर्च होतो. कुपोषण नियंत्रणासाठी परदेशातूनही आर्थिक मदत मेळघाटासाठी मिळते. तरीही कुपोषणावर नियंत्रण येत नसल्याने हा पैसा नेमका जातो कुठे ? हाही प्रश्न उपस्थित झाला आहे.कुपोषणाचे बळी- गेल्या 6 महिन्यात 226 बालकांचा मृत्यू- 2, 532 बालकांची मृत्यूशी झुंज- आदिवासी पाड्यांवर कुपोषणाचं वाढतं प्रमाण - आरोग्यव्यवस्था अपुरी- मनुष्यबळ अपुरे- औषधांचाही अपुरा साठाकागदावरची यंत्रणा !- 317 गावांचा मिळून मेळघाट- 1 उपजिल्हा रुग्णालय- 11 प्राथमिक आरोग्य केंद्र- 350 स्वयंसेवी संस्था - परदेशी मदतीचाही ओघ- मॅक्रो प्लॅनिंगचा अधिकार्‍यांचा दावा

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 3, 2011 06:20 PM IST

मेळघाटात 6 महिन्यात 226 कुपोषित बालकांचा मृत्यू

03 ऑक्टोबर

कुपोषणाच्या समस्येवर कित्येक कोटींचा खर्च होऊनही, मेळघाटातल्या आदिवासी पाड्यांवरील 226 बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला आहे. गेल्या 6 महिन्यात तब्बल 226 आदिवासी बालकं दगावली आहेत. तर 2 हजार 532 बालकं अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचे दावे फोल ठरले आहेत. त्याचबरोबर भागात काम करीत असलेल्या अनेक एनजीओ आणि सरकारी यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्हं उपस्थित झाले आहेत.

विशेष म्हणजे आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतूनच ही धक्कादायक माहिती समोर आली. पण सरकारी अधिकारी मात्र मेळघाटात मॅक्रो प्लॅनिंग केल्याचा दावा करत आहे. सरकारी यंत्रणेव्यतिरिक्त या भागात जवळपास 350 स्वयंसेवी संस्था सक्रिय आहे. तसेच 1 उपजिल्हा रुग्णालय,11 प्राथमिक आरोग्य केंद्र यावरही करोडोंचा सरकारी निधी दरवर्षी खर्च होतो. कुपोषण नियंत्रणासाठी परदेशातूनही आर्थिक मदत मेळघाटासाठी मिळते. तरीही कुपोषणावर नियंत्रण येत नसल्याने हा पैसा नेमका जातो कुठे ? हाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

कुपोषणाचे बळी

- गेल्या 6 महिन्यात 226 बालकांचा मृत्यू- 2, 532 बालकांची मृत्यूशी झुंज- आदिवासी पाड्यांवर कुपोषणाचं वाढतं प्रमाण - आरोग्यव्यवस्था अपुरी- मनुष्यबळ अपुरे- औषधांचाही अपुरा साठा

कागदावरची यंत्रणा !- 317 गावांचा मिळून मेळघाट- 1 उपजिल्हा रुग्णालय- 11 प्राथमिक आरोग्य केंद्र- 350 स्वयंसेवी संस्था - परदेशी मदतीचाही ओघ- मॅक्रो प्लॅनिंगचा अधिकार्‍यांचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2011 06:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close