S M L

अण्णांशी बोलणार - विलासराव देशमुख

05 ऑक्टोबरजनलोकपाल विधेयक नाहीतर मतदान नाही, असा इशारा अण्णा हजारेंनी काल दिल्यानंतर आता काँग्रेसची धावाधाव सुरू झाली आहे. अण्णांच्या या इशार्‍याचा फटका येणार्‍या निवडणुकांमध्ये काँग्रेसला बसण्याची भीती काँग्रेस नेत्यांना वाटतेय. त्यामुळेच आता काँग्रेसने अण्णांशी संवाद साधण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठीच अण्णांच्या आंदोलनात यशस्वी मध्यस्थी करणार्‍या विलासराव देशमुख यांनी अण्णांशी बोलणी करण्याची तयारी दाखवली आहे. लोकपालबिलाबाबत सरकार सकारात्मक असताना अशी वक्तव्य करणं चुकीचं असल्याचंही विलासराव देशमुख यांनी म्हटलं आहे.काल अण्णांनी जनलोकपाल विधेयक नाही तर मतदान नाही, असा खणखणीत इशारा काँग्रेसला दिला. काँग्रेस जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यात टाळाटाळ करतंय, असा आरोप अण्णांनी केला. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर झालं नाही, तर ज्या पाच राज्यांत निवडणुका आहेत त्या राज्यांचा दौरा करून याबद्दल आपण जनजागृती करू असंही अण्णांनी सांगितलं. याची सुरुवात अण्णा उत्तर प्रदेशपासून करणार आहेत. मात्र काँग्रेसला दिलेला इशारा हे माझं व्यक्तीगत मत आहे ते जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून नाही याबद्दल आमची कोअर कमिटीशी कोणतीही बातचीत झाली नाही असा खुलासा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल आयबीएन लोकमतच्या 'आजचा सवाल' या कार्यक्रमात केला. अण्णांच्या या इशारा काँग्रेस सरकराने एकदा डोळेझाक केल्याचे परिणाम भोगले आहे. रामलीला येथे अण्णांनी 12 दिवस उपोषण करून जनलोकपाल विधेयकाची लढाई यशस्वीपणे जिंकली. यासाठी मध्यस्थी केली ती विलासराव देशमुख यांनी. देशमुख यांनी या अगोदर ही राज्यात अण्णांनी ज्या ज्यावेळेस उपोषण केले त्या त्यावेळेस मध्यस्थी करून आंदोलन यशस्वीपणे पार पाडले आता अण्णांशी विलासराव चर्चा करण्यास तयारी दर्शवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 01:42 PM IST

अण्णांशी बोलणार - विलासराव देशमुख

05 ऑक्टोबर

जनलोकपाल विधेयक नाहीतर मतदान नाही, असा इशारा अण्णा हजारेंनी काल दिल्यानंतर आता काँग्रेसची धावाधाव सुरू झाली आहे. अण्णांच्या या इशार्‍याचा फटका येणार्‍या निवडणुकांमध्ये काँग्रेसला बसण्याची भीती काँग्रेस नेत्यांना वाटतेय. त्यामुळेच आता काँग्रेसने अण्णांशी संवाद साधण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठीच अण्णांच्या आंदोलनात यशस्वी मध्यस्थी करणार्‍या विलासराव देशमुख यांनी अण्णांशी बोलणी करण्याची तयारी दाखवली आहे. लोकपालबिलाबाबत सरकार सकारात्मक असताना अशी वक्तव्य करणं चुकीचं असल्याचंही विलासराव देशमुख यांनी म्हटलं आहे.

काल अण्णांनी जनलोकपाल विधेयक नाही तर मतदान नाही, असा खणखणीत इशारा काँग्रेसला दिला. काँग्रेस जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यात टाळाटाळ करतंय, असा आरोप अण्णांनी केला. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर झालं नाही, तर ज्या पाच राज्यांत निवडणुका आहेत त्या राज्यांचा दौरा करून याबद्दल आपण जनजागृती करू असंही अण्णांनी सांगितलं. याची सुरुवात अण्णा उत्तर प्रदेशपासून करणार आहेत. मात्र काँग्रेसला दिलेला इशारा हे माझं व्यक्तीगत मत आहे ते जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून नाही याबद्दल आमची कोअर कमिटीशी कोणतीही बातचीत झाली नाही असा खुलासा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल आयबीएन लोकमतच्या 'आजचा सवाल' या कार्यक्रमात केला. अण्णांच्या या इशारा काँग्रेस सरकराने एकदा डोळेझाक केल्याचे परिणाम भोगले आहे. रामलीला येथे अण्णांनी 12 दिवस उपोषण करून जनलोकपाल विधेयकाची लढाई यशस्वीपणे जिंकली. यासाठी मध्यस्थी केली ती विलासराव देशमुख यांनी. देशमुख यांनी या अगोदर ही राज्यात अण्णांनी ज्या ज्यावेळेस उपोषण केले त्या त्यावेळेस मध्यस्थी करून आंदोलन यशस्वीपणे पार पाडले आता अण्णांशी विलासराव चर्चा करण्यास तयारी दर्शवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2011 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close