S M L

गोव्यात लोकायुक्त विधेयक मंजूर ; दिगंबर कामत अडचणीत

05 ऑक्टोबरगोवा विधानसभेत आज लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे विधेयक मंजुरीच्या प्रतीक्षेत होतं. हे विधेयक मंजूर करण्यासाठी गोवा विधानसभेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्वानुमते लोकायुक्तांचे विधेयक मंजूर करण्यात आलं. तर दुसरीकडे गोव्यातल्या बेकादेशीर खाणकाम प्रकरणी मुख्यमंत्री दिगंबर कामत अडचणीत आले आहेत. गोवा विधासभेच्या लोकलेखा समितीने बेकायदेशीर खाणकामाचा अहवाल विधानसभेच्या अध्यक्षांकडे सादर केला. खाणकाम मंत्रालय मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे असल्याने कामत अडचणीत आले आहेत. तब्बल 4 हजार कोटींचा हा घोटाळा आहे, असा अंदाज PAC नं व्यक्त केला. यापासून राज्याचा सुमारे 200 कोटींचा महसूल बुडाला. कर्नाटकातल्या बेल्लारीपेक्षाही गोव्यातला खाणकाम घोटाळा मोठा असल्याचा आरोप PAC चे अध्यक्ष मनोहर पर्रीकर यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2011 04:30 PM IST

गोव्यात लोकायुक्त विधेयक मंजूर ; दिगंबर कामत अडचणीत

05 ऑक्टोबर

गोवा विधानसभेत आज लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे विधेयक मंजुरीच्या प्रतीक्षेत होतं. हे विधेयक मंजूर करण्यासाठी गोवा विधानसभेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्वानुमते लोकायुक्तांचे विधेयक मंजूर करण्यात आलं. तर दुसरीकडे गोव्यातल्या बेकादेशीर खाणकाम प्रकरणी मुख्यमंत्री दिगंबर कामत अडचणीत आले आहेत. गोवा विधासभेच्या लोकलेखा समितीने बेकायदेशीर खाणकामाचा अहवाल विधानसभेच्या अध्यक्षांकडे सादर केला. खाणकाम मंत्रालय मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे असल्याने कामत अडचणीत आले आहेत. तब्बल 4 हजार कोटींचा हा घोटाळा आहे, असा अंदाज PAC नं व्यक्त केला. यापासून राज्याचा सुमारे 200 कोटींचा महसूल बुडाला. कर्नाटकातल्या बेल्लारीपेक्षाही गोव्यातला खाणकाम घोटाळा मोठा असल्याचा आरोप PAC चे अध्यक्ष मनोहर पर्रीकर यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2011 04:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close