S M L

रिक्षाचालकांच्या मुजोरीवर राजकारण्याची शिरजोरी !

05 ऑक्टोबरमुंबईतल्या खड्‌ड्यानंतर आता रिक्षाच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू समोरासमोर आले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुजोर रिक्षाचालकांचा बंदोबस्त करण्याचा इशारा दिला. आणि मनसेचे कार्यकर्ते कामाला लागले. मंुबई महापाललिका निवडणुकीच्या दृष्टीने यातला राजकीय फायदा पाहता शिवसेनेनंही मग आघाडी उघडली. आणि शिवसेना-मनसेत श्रेय लाटण्याचं राजकारण सुरू झालं.जवळच भाडं नाकारणार्‍या रिक्षा चालकांच्या मुजोरपणाचा अनुभव सर्व सामान्यांसाठी नवीन नाही. या रिक्षा चालकांच्या पाठीशी असलेल्या रिक्षा संघटनांच्या आणि राजकीय पक्षांच्या पाठबळामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांची दादागिरी सुरुच असते. आणि त्यावर वर ताण म्हणजे, चांगली सेवा न देता वर आपल्या अवास्तव मागण्या मान्य करुन घेण्यासाठी हे रिक्षा आणि टॅक्सी चालक संपाचं हत्यार उपसून सर्व सामान्यांना वेठीसही धरतात. त्यामुळे त्यांच्या विरोधातला संताप वाढत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रिक्षा चालकांना मनसे स्टाईलनं दम भरला.राज ठाकरे यांनी इशारा देताच मनसे कार्यकर्ते कामालाही लागले. मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी रिक्षा चालकांना मारहाणीचे प्रकारही घडले. मनसेचं हे कृत्य जरी बेकायदेशीर असलं तरी त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो ये लक्षात येताच शिवसेनेनं सुद्धा रिक्षा चालकांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत असा दावा केला. तर ठाकरे बंधूंच्या या भांडणात मग राष्ट्रवादीनं उडी घेत, जनतेला त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचा सल्ला छगन भुजबळ यांनी दिला.शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी जरी रिक्षा चालकांच्या विरोधात आघाडी उघडली असली तरीही हा या प्रश्नावरचा उपाय नव्हे फार तर या मुळे भावनिक राजकारण करुन सर्व सामान्यांमध्ये फार तर अधिकची लोकप्रियता मिळवता येईल. पण, कायदेशीर दृष्ट्या या रिक्षा चालकांवर कारवाई करुन हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला भाग पाडण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांकडून झाल्यास त्याचा अधिक फायदा या पक्षांना होऊ शकतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2011 04:51 PM IST

रिक्षाचालकांच्या मुजोरीवर राजकारण्याची शिरजोरी !

05 ऑक्टोबर

मुंबईतल्या खड्‌ड्यानंतर आता रिक्षाच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू समोरासमोर आले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुजोर रिक्षाचालकांचा बंदोबस्त करण्याचा इशारा दिला. आणि मनसेचे कार्यकर्ते कामाला लागले. मंुबई महापाललिका निवडणुकीच्या दृष्टीने यातला राजकीय फायदा पाहता शिवसेनेनंही मग आघाडी उघडली. आणि शिवसेना-मनसेत श्रेय लाटण्याचं राजकारण सुरू झालं.

जवळच भाडं नाकारणार्‍या रिक्षा चालकांच्या मुजोरपणाचा अनुभव सर्व सामान्यांसाठी नवीन नाही. या रिक्षा चालकांच्या पाठीशी असलेल्या रिक्षा संघटनांच्या आणि राजकीय पक्षांच्या पाठबळामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांची दादागिरी सुरुच असते. आणि त्यावर वर ताण म्हणजे, चांगली सेवा न देता वर आपल्या अवास्तव मागण्या मान्य करुन घेण्यासाठी हे रिक्षा आणि टॅक्सी चालक संपाचं हत्यार उपसून सर्व सामान्यांना वेठीसही धरतात. त्यामुळे त्यांच्या विरोधातला संताप वाढत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रिक्षा चालकांना मनसे स्टाईलनं दम भरला.

राज ठाकरे यांनी इशारा देताच मनसे कार्यकर्ते कामालाही लागले. मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी रिक्षा चालकांना मारहाणीचे प्रकारही घडले. मनसेचं हे कृत्य जरी बेकायदेशीर असलं तरी त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो ये लक्षात येताच शिवसेनेनं सुद्धा रिक्षा चालकांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत असा दावा केला. तर ठाकरे बंधूंच्या या भांडणात मग राष्ट्रवादीनं उडी घेत, जनतेला त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचा सल्ला छगन भुजबळ यांनी दिला.

शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी जरी रिक्षा चालकांच्या विरोधात आघाडी उघडली असली तरीही हा या प्रश्नावरचा उपाय नव्हे फार तर या मुळे भावनिक राजकारण करुन सर्व सामान्यांमध्ये फार तर अधिकची लोकप्रियता मिळवता येईल. पण, कायदेशीर दृष्ट्या या रिक्षा चालकांवर कारवाई करुन हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला भाग पाडण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांकडून झाल्यास त्याचा अधिक फायदा या पक्षांना होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2011 04:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close