S M L

बोगस पोरं, बोगस शाळा ; कारवाईच काय ?

05 ऑक्टोबरशिक्षण विभागाने सुरू केलेल्या पट तपासणी मोहिमेमुळे औरंगाबाद जिल्ह्यातही अनेक संस्थाचं बिंग फुटलं. त्याचा धसका घेतलेल्या औरंगाबाद विभागातल्या तब्बल 107 संस्थाचालकांनी संस्था सुरुच केलं नसल्याचं जाहीर केलं. काही शाळांमधील तुकड्याच्या तुकड्याच बोगस असल्याचे स्पष्ट झालं. तर काही शाळामध्ये विद्यार्थी संख्या फूगवून दाखवल्याचं स्पष्ट झालंय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सुमारे दीडशे शाळाच या मोहिमेमुळंे बंद पडणार आहेत. चक्क परराज्यातून, मध्यप्रदेशमधून विद्यार्थी आयात केल्याचा प्रकारही उघडकीस आला. या सगळ्या तपासणीमध्ये मान्यता न घेता सुरू असलेल्या संस्थांची तपासणीच झालेली नाही, त्यामुळे अशा संस्थावर काय कारवाई होणार ? असा प्रश्नही निर्माण झाला आहेत.शिक्षण विभागाने केलेल्या पटपडताळणीतून अनेक धक्कादायक प्रकार उजेडात आलेत. काही शाळांमधील तुकड्याच्या तुकड्याच बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर काही शाळामध्ये प्रत्येक वर्गात दाखविलेली विद्यार्थी संख्या अत्यंत चुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील साधारणत : दिडशे शाळाच या मोहिमेमुळंे बंद पडणार आहेत. औरंगाबादचे जिल्हाधिकारी कुणालकुमार म्हणतात, एकशे सात शाळांनी मान्यता घेऊन शाळा सुरू केलेल्या नव्हत्या असे कळविले. प्रत्यक्षात त्यापैकी 77 शाऴा या बोगस निघाल्या आहे.औरंगाबाद शहरातील - अकरावी आणि बारावीच्या वर्गातील विद्यार्थीसंंख्याही बोगस असल्याचे दिसून आले. त्यामुळे या संस्थेची मान्यताच रद्द होऊ शकते. हे एक उदाहरण, पण असे अनेक प्रकार या मोहिमेत उघड झाले आणि संस्थाचालकांचे बिंग फुटले. बोगस शाळा आणि विद्यार्थीसंख्या शोधून काढणार्‍या या मोहिमेसाठी औरंगाबाद जिल्ह्यात साडेतीन हजार कर्मचार्‍यांनी काम पाहिले.सोलापुरात अनेक शाळा कागदावरच !सोलापूरमधील शिक्षण अधिकार्‍यांच्या नोंद असलेली सलगरवाडीतील मुस्लीम छप्परबंद समाजसेवा मंडळाची उर्दू शाळा प्रत्यक्षात त्या पत्त्यावर अस्तित्वातच नव्हती. संस्थाचालकाशी संपर्क साधल्यावर ही शाळा वेगळ्या नावाने सुरु आहे असा कावा संस्थाचालकांने केला. पण शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी हा दावा ग्राह्य धरला नाही.पटनोंदणीसाठी टेंपो भरून विद्यार्थी !कोकणात अनेक ठिकाणी बेकायदेशीर शाळा सुरू असल्याचं आढळून आलं. दापोली तालुक्यातल्या देगाव आणि कोळबांद्रे शाळेतल्या मुलांना टेंपोत भरून खेडमधल्या शाळेत पटनोंदणीसाठी पाठवण्यात येत असतांना आयबीएन लोकमतच्या टीमने त्यांना गाठलं. आणि शिक्षकांची भंबेरी उडाली. खेडच्या तु. बा. कदम संस्थेची ही शाळा असल्याचं समजतंय. देगाव शाळेत 8 वी ते 10 वीच्या 120 मुलांना अनधिकृत रित्या प्रवेश देण्यात आला. पण ही मुलं खेडच्या अस्तान शाळेतल्या पटावर आहेत. तर काळबांद्रे शाळेतही 8 वी ते 10 वीच्या 60 मुलांना दुसर्‍या शाळेतल्या पटावर दाखवण्यात आलं. विद्यार्थ्यांची पळवापळवी !विद्यार्थ्यांची आयात-निर्यात करणार्‍या अशाच एका संस्थेचा आयबीएन-लोकमत टीमने पर्दाफाश केला. नाशिकमध्ये एका ठिकाणी जवळपास पाचशे विद्यार्थी ठेवण्यात आलेत. ज्या जागेवर विद्यार्थी आहेत ती शाळा नाही की होस्टलसुद्धा नाही. मग विद्यार्थ्यांना तिथे का ठेवलंय हे जेव्हा तिथे उपस्थित लोकांना विचारलं तेव्हा त्यांनी चक्क पळ काढला. विद्यार्थ्यांनासुद्धा पढवण्यात आलं होतं. त्यांना नीट उत्तरंही देता येत नव्हती. तर शहरातील दुसर्‍या शाळेमध्ये विद्यार्थी एका घरात आणून ठेवले असल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा उपस्थित दोन मिनिट म्हणून शिक्षक पळून गेले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2011 05:26 PM IST

बोगस पोरं, बोगस शाळा ; कारवाईच काय ?

05 ऑक्टोबर

शिक्षण विभागाने सुरू केलेल्या पट तपासणी मोहिमेमुळे औरंगाबाद जिल्ह्यातही अनेक संस्थाचं बिंग फुटलं. त्याचा धसका घेतलेल्या औरंगाबाद विभागातल्या तब्बल 107 संस्थाचालकांनी संस्था सुरुच केलं नसल्याचं जाहीर केलं. काही शाळांमधील तुकड्याच्या तुकड्याच बोगस असल्याचे स्पष्ट झालं. तर काही शाळामध्ये विद्यार्थी संख्या फूगवून दाखवल्याचं स्पष्ट झालंय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सुमारे दीडशे शाळाच या मोहिमेमुळंे बंद पडणार आहेत. चक्क परराज्यातून, मध्यप्रदेशमधून विद्यार्थी आयात केल्याचा प्रकारही उघडकीस आला. या सगळ्या तपासणीमध्ये मान्यता न घेता सुरू असलेल्या संस्थांची तपासणीच झालेली नाही, त्यामुळे अशा संस्थावर काय कारवाई होणार ? असा प्रश्नही निर्माण झाला आहेत.

शिक्षण विभागाने केलेल्या पटपडताळणीतून अनेक धक्कादायक प्रकार उजेडात आलेत. काही शाळांमधील तुकड्याच्या तुकड्याच बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर काही शाळामध्ये प्रत्येक वर्गात दाखविलेली विद्यार्थी संख्या अत्यंत चुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील साधारणत : दिडशे शाळाच या मोहिमेमुळंे बंद पडणार आहेत. औरंगाबादचे जिल्हाधिकारी कुणालकुमार म्हणतात, एकशे सात शाळांनी मान्यता घेऊन शाळा सुरू केलेल्या नव्हत्या असे कळविले. प्रत्यक्षात त्यापैकी 77 शाऴा या बोगस निघाल्या आहे.

औरंगाबाद शहरातील - अकरावी आणि बारावीच्या वर्गातील विद्यार्थीसंंख्याही बोगस असल्याचे दिसून आले. त्यामुळे या संस्थेची मान्यताच रद्द होऊ शकते. हे एक उदाहरण, पण असे अनेक प्रकार या मोहिमेत उघड झाले आणि संस्थाचालकांचे बिंग फुटले. बोगस शाळा आणि विद्यार्थीसंख्या शोधून काढणार्‍या या मोहिमेसाठी औरंगाबाद जिल्ह्यात साडेतीन हजार कर्मचार्‍यांनी काम पाहिले.

सोलापुरात अनेक शाळा कागदावरच !

सोलापूरमधील शिक्षण अधिकार्‍यांच्या नोंद असलेली सलगरवाडीतील मुस्लीम छप्परबंद समाजसेवा मंडळाची उर्दू शाळा प्रत्यक्षात त्या पत्त्यावर अस्तित्वातच नव्हती. संस्थाचालकाशी संपर्क साधल्यावर ही शाळा वेगळ्या नावाने सुरु आहे असा कावा संस्थाचालकांने केला. पण शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी हा दावा ग्राह्य धरला नाही.

पटनोंदणीसाठी टेंपो भरून विद्यार्थी !

कोकणात अनेक ठिकाणी बेकायदेशीर शाळा सुरू असल्याचं आढळून आलं. दापोली तालुक्यातल्या देगाव आणि कोळबांद्रे शाळेतल्या मुलांना टेंपोत भरून खेडमधल्या शाळेत पटनोंदणीसाठी पाठवण्यात येत असतांना आयबीएन लोकमतच्या टीमने त्यांना गाठलं. आणि शिक्षकांची भंबेरी उडाली. खेडच्या तु. बा. कदम संस्थेची ही शाळा असल्याचं समजतंय. देगाव शाळेत 8 वी ते 10 वीच्या 120 मुलांना अनधिकृत रित्या प्रवेश देण्यात आला. पण ही मुलं खेडच्या अस्तान शाळेतल्या पटावर आहेत. तर काळबांद्रे शाळेतही 8 वी ते 10 वीच्या 60 मुलांना दुसर्‍या शाळेतल्या पटावर दाखवण्यात आलं. विद्यार्थ्यांची पळवापळवी !

विद्यार्थ्यांची आयात-निर्यात करणार्‍या अशाच एका संस्थेचा आयबीएन-लोकमत टीमने पर्दाफाश केला. नाशिकमध्ये एका ठिकाणी जवळपास पाचशे विद्यार्थी ठेवण्यात आलेत. ज्या जागेवर विद्यार्थी आहेत ती शाळा नाही की होस्टलसुद्धा नाही. मग विद्यार्थ्यांना तिथे का ठेवलंय हे जेव्हा तिथे उपस्थित लोकांना विचारलं तेव्हा त्यांनी चक्क पळ काढला. विद्यार्थ्यांनासुद्धा पढवण्यात आलं होतं. त्यांना नीट उत्तरंही देता येत नव्हती. तर शहरातील दुसर्‍या शाळेमध्ये विद्यार्थी एका घरात आणून ठेवले असल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा उपस्थित दोन मिनिट म्हणून शिक्षक पळून गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2011 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close