S M L

नागपुरचे राजा वर्मा पक्के महाराष्ट्रीय

17 नोव्हेंबर, नागपूर प्रशांत कोरटकरवसुधैव कुटुंबकम ही परंपरा महाराष्ट्रानं नेहमीच जपली आहे. अनेक वर्षांपासून पर-राज्यातील लोकं इथं आले आणि आता ते महाराष्ट्राचेच झाले. नागपुरातील राजा वर्मा हे त्यापैकी एक. जरी हिंदी भाषिक असले तरी त्यांचा पिंड मात्र महाराष्ट्राचा आहे. नागपुरच्या रामदासपेठेत गेल्या साठ वर्षांपासून मराठी लोकांच्या सान्निध्यात राहून राजा वर्मा लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील उत्तरप्रदेशातून 1948 मध्ये महाराष्ट्रात आले तेव्हापासून ते महाराष्ट्रातच राहत आहे. त्यांच्यावर इथल्याच मातीतले संस्कार झालेत. 'माझं एज्युकेशन मराठीत झालं. इतकं चांगलं मराठी कसं बोलता, असं लोक विचारतात तेव्हा इथे राहतो तर मराठी यायलाचं हवं असं सांगतो ', असं राजा वर्मा सांगत होते. सुरूवातीच्या काळात मराठी मित्रांच्या सहवासात मराठी शाळेत शिक्षण पूर्ण झाल्यावर काहीतरी करावं, यासाठी त्यांनी आपल्या वडिलांकडून फोटाग्राफीचा गुण घेतला. त्याकाळात ही त्यांना एका मराठी व्यक्तीनं साथ दिली. त्याची आठवण आजही त्यांच्या मनात आहे. परप्रांतीय आंदोलनाबाबत वर्मा म्हणाले, मराठी -अमराठी वादाची सुरूवात ही राजकारण्यांनीच केली आणि तो संपेल. मात्र सामान्य लोकांना त्याचं काहीच सोयरसूतक नाही '. राजा वर्मांनी मराठी अमराठीत कधीच फरक केला नाही. गेल्या चाळीस वर्षात त्यांनी शेकडो तरूणांना मदत केली.अनेकांना फोटोग्रॉफी शिकवली. समाजासाठी काही तरी करावं, या विचाराचे लोक आज ही इथं आहेत. त्यांना मराठी-अमराठीच्या मुद्यावर विचार करायला वेळ नाही. त्यांना वाटतं हा मुद्दा काही काळापुरता आहे. त्यामुळे महाराष्ट्राशी असलेला ऋणानूबंध कमी होणारा नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2008 12:07 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2008 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close