S M L

जशास तसे उत्तर देऊ शकतो !

07 ऑक्टोबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात केलेल्या टिकेवर आज अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिलंय. आम्हालाही त्यांच्याच भाषेत उत्तर देता येतं. पण आम्ही संयम पाळतो. असंही त्यांनी सुनावलं. शिवाय मुंबई वेगळी करण्याचा कुठलाही मुद्दा नाही मात्र केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना सातत्याने हा मुद्दा करते असा टोलाही त्यांनी लगावला. ठाकरे यांनी आर. आर. पाटलांना चार्ली चॅपलिनची उपमा दिली होती यावर बोलतांना उपमा आम्हालाही देता येतात मात्र आमची ती संस्कृती नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.काल गुरूवारी झालेल्या शिवसेनेच्या दसर्‍यामेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चौफेर तोफ डागली. राष्ट्रवादीवर हल्लाबोल करत शिवसेनाप्रमुखांनी इंग्लंड दौर्‍यावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या गृहमंत्री आर.आर.पाटील यांना सुटाबुटात पाहून मला एका परदेशी नागरीकाचा फोन आला तो म्हणे चॉर्ली चॅपलिन इकडे दिसला अशा शेलक्या शब्दात आबांना टोला लगावला. तसेच दादरचं नाव चैत्यभूमी देणार असं काही चाललं आहे. पण एक सांगतो दादरचं नाव दादरच राहणार ते कधीच बदलणार नाही आणि बदलुही देणार नाही, आणि जर कोणी मुंबई तोडण्याचा प्रयत्न केला तर स्वत: हातात पिस्तुल घेऊन गोळ्या घालीन असा खणखणीत इशाराही बाळासाहेबांनी दिला होता. शिवसेनाप्रमुखांची टीका अजितदादांना चांगली झोंबली आम्हालाही त्यांच्याच भाषेत उत्तर देता येतं. पण आम्ही संयम पाळतो.आबांना चॉर्ली चॅपलीनची उपमा दिली याला जशाच तस उत्तर देता येईल पण ही आमची संस्कृती नाही अशा शब्दात अजितदादांनी सुनावलं. शिवाय मुंबई वेगळी करण्याचा कुठलाही मुद्दा नाही मात्र केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना सातत्याने हा मुद्दा करते असा टोलाही त्यांनी लगावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 7, 2011 10:04 AM IST

जशास तसे उत्तर देऊ शकतो !

07 ऑक्टोबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात केलेल्या टिकेवर आज अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिलंय. आम्हालाही त्यांच्याच भाषेत उत्तर देता येतं. पण आम्ही संयम पाळतो. असंही त्यांनी सुनावलं. शिवाय मुंबई वेगळी करण्याचा कुठलाही मुद्दा नाही मात्र केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना सातत्याने हा मुद्दा करते असा टोलाही त्यांनी लगावला. ठाकरे यांनी आर. आर. पाटलांना चार्ली चॅपलिनची उपमा दिली होती यावर बोलतांना उपमा आम्हालाही देता येतात मात्र आमची ती संस्कृती नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

काल गुरूवारी झालेल्या शिवसेनेच्या दसर्‍यामेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चौफेर तोफ डागली. राष्ट्रवादीवर हल्लाबोल करत शिवसेनाप्रमुखांनी इंग्लंड दौर्‍यावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या गृहमंत्री आर.आर.पाटील यांना सुटाबुटात पाहून मला एका परदेशी नागरीकाचा फोन आला तो म्हणे चॉर्ली चॅपलिन इकडे दिसला अशा शेलक्या शब्दात आबांना टोला लगावला. तसेच दादरचं नाव चैत्यभूमी देणार असं काही चाललं आहे. पण एक सांगतो दादरचं नाव दादरच राहणार ते कधीच बदलणार नाही आणि बदलुही देणार नाही, आणि जर कोणी मुंबई तोडण्याचा प्रयत्न केला तर स्वत: हातात पिस्तुल घेऊन गोळ्या घालीन असा खणखणीत इशाराही बाळासाहेबांनी दिला होता. शिवसेनाप्रमुखांची टीका अजितदादांना चांगली झोंबली आम्हालाही त्यांच्याच भाषेत उत्तर देता येतं. पण आम्ही संयम पाळतो.आबांना चॉर्ली चॅपलीनची उपमा दिली याला जशाच तस उत्तर देता येईल पण ही आमची संस्कृती नाही अशा शब्दात अजितदादांनी सुनावलं. शिवाय मुंबई वेगळी करण्याचा कुठलाही मुद्दा नाही मात्र केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना सातत्याने हा मुद्दा करते असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2011 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close