S M L

अण्णांच्या आंदोलनाला आरएसएसचाही पाठिंबा !

06 ऑक्टोबरदेशभरात वाढत चाललेली महागाई आणि भ्रष्टाचाराला लोकं वैतागली आहे. अण्णांनी पुकारलेल्या लढ्यात सर्वसामान्याचा आवाज सरकारपर्यंत पोहचु शकला पण भ्रष्टाचारविरोधी लढ्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे तरच तो लढा यशस्वीपणे चालू शकतो असं सांगत अण्णांचं नाव न घेता सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपला पाठिंबा दर्शवला. नागपुरात दसर्‍यानिमित्त संघाच्या विजयादशमी सोहळ्यात ते बोलत होते. आज दसर्‍यानिमित्त संघाच्या विजयादशमी सोहळ्याचे नागपूर येथे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे सोहळ्यास सरसंघचालकांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी मोहन भागवतांनी सरकारवर सडकून टीका केली. भ्र्रष्टाचार रोखण्यासाठी व्यवस्थेत मोठे बदल करावे लागतील असंही भागवतांनी सांगितलं. महागाईबाबत सरकारकडे काहीही उत्तर नाहीय. मुळात गरीबीची व्याख्याच चुकीची असल्याने गरीबांची टिंगल सरकारने चालवली अशी टीकाही सरसंघचालकांनी केली. मावळच्या गोळाबारावरूनही त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. त्याचबरोबर अण्णांच्या आंदोलनात आपला न कळत पाठिंबा दर्शवला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2011 12:14 PM IST

अण्णांच्या आंदोलनाला आरएसएसचाही पाठिंबा !

06 ऑक्टोबर

देशभरात वाढत चाललेली महागाई आणि भ्रष्टाचाराला लोकं वैतागली आहे. अण्णांनी पुकारलेल्या लढ्यात सर्वसामान्याचा आवाज सरकारपर्यंत पोहचु शकला पण भ्रष्टाचारविरोधी लढ्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे तरच तो लढा यशस्वीपणे चालू शकतो असं सांगत अण्णांचं नाव न घेता सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपला पाठिंबा दर्शवला. नागपुरात दसर्‍यानिमित्त संघाच्या विजयादशमी सोहळ्यात ते बोलत होते.

आज दसर्‍यानिमित्त संघाच्या विजयादशमी सोहळ्याचे नागपूर येथे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे सोहळ्यास सरसंघचालकांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी मोहन भागवतांनी सरकारवर सडकून टीका केली. भ्र्रष्टाचार रोखण्यासाठी व्यवस्थेत मोठे बदल करावे लागतील असंही भागवतांनी सांगितलं. महागाईबाबत सरकारकडे काहीही उत्तर नाहीय. मुळात गरीबीची व्याख्याच चुकीची असल्याने गरीबांची टिंगल सरकारने चालवली अशी टीकाही सरसंघचालकांनी केली. मावळच्या गोळाबारावरूनही त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. त्याचबरोबर अण्णांच्या आंदोलनात आपला न कळत पाठिंबा दर्शवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2011 12:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close