S M L

अण्णा,आमच्याशी वैर घेवू नका - बाळासाहेब ठाकरे

07 ऑक्टोबरशिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्यात बाळासाहेबांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीत जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर टीका केली. बाळासाहेबांच्या टीकेला अण्णांनी प्रतिटोला लगावला आमच्या आंदोलनामुळेच युतीच्या तीन मंत्र्यांना जावं लागलं होतं. माझं बाळासाहेबांशी भांडण नाही. माझी लढाई भ्रष्टाचाराशी आहे माझी लढाई कुणा व्यक्तिशी नाही असं अण्णांनी स्पष्ट केलं. मात्र बाळासाहेबांनी यावर खुलासा करत आमचे वय वाढलेच आहे. पण तुम्ही आमच्यापेक्षा वयाने लहान आहात म्हणून हा पोरकटपणा तुम्हालाही शोभत नाही आणि उगाच आमच्याशी 'वैर' घेण्याच्या भागनडीत पडू नका असा इशारा शिवसेनाप्रमुखांना दिला.शिवसेनाप्रमुखांना काल दसरा मेळाव्यात अण्णांवर तोफ डागली. सोनिया गांधी उपचारासाठी देशाबाहेर गेल्या होत्या. एक महिना त्या बाहेर गेल्या तर देशात हैदास मांडला होता. अण्णांचे पंचतारांकित आंदोलन सुरू होते. अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांनी तर माईक हाती आला की जोर चढत होता. अण्णांचे उपोषण सुरू असतांना रामलीला मैदानावर दिवसांला 25 हजार लोक जेवण करत होती. अण्णांना भेटाला आलेल्याना जेवणाचे विचारले जात होते. भ्रष्टाचाराची थट्टा करू नका अण्णा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. पण अशा आंदोलनाने ते संपणार नाही भ्रष्टाचाराविरोधात चांगले चांगले संपले आहे. लढा सक्षमपणे चालू ठेवावा लागेल. असा सल्लावजा टोला लगावला होता. यावर प्रतिक्रिया देत अण्णा म्हणाले की, बाळासाहेबांची आणि माझं अनेक वेळा या ना त्या विषयावरून वाद झाला. मात्र त्यांना प्रत्येक वेळा माघार घ्यावा लागला. आमच्या आंदोलनामुळेच युतीच्या तीन मंत्र्यांना जावं लागलं होतं. माझं बाळासाहेबांशी भांडण नाही. मी 25 वर्षांपासून भ्रष्टाचाराविरोधात लढा देत आहे. माझी लढाई भ्रष्टाचाराशी आहे माझी लढाई कुणा व्यक्तिशी नाही असं अण्णांनी स्पष्ट केलं. अण्णांच्या प्रतिक्रियेला बाळासाहेबांनी पत्रक काढून उत्तर दिलं. "कालच्या दसरा मेळाव्यात आम्ही अण्णांवर भाष्य केले. पण आज ज्याप्रकारे वृत्तपत्रांनी ते सजवलंय, नटवलंय तसं काही आम्ही अण्णांवर बोललेलो नाही. अण्णा जे आता अकारण बोललेत त्याला आम्ही उत्तर देऊ शकतो. कारण आम्ही काही गांधीवादी नाही. आमच्या वाढत्या वयाचा उल्लेख केला म्हणून अण्णांना सांगतो, होय, आमचे वय वाढलेच आहे. पण तुम्ही आमच्यापेक्षा वयाने लहान आहात म्हणून हा पोरकटपणा तुम्हालाही शोभत नाही आणि उगाच आमच्याशी 'वैर' घेण्याच्या भागनडीत पडू नका असा इशारा शिवसेनाप्रमुखांना दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 7, 2011 12:40 PM IST

अण्णा,आमच्याशी वैर घेवू नका - बाळासाहेब ठाकरे

07 ऑक्टोबर

शिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्यात बाळासाहेबांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीत जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर टीका केली. बाळासाहेबांच्या टीकेला अण्णांनी प्रतिटोला लगावला आमच्या आंदोलनामुळेच युतीच्या तीन मंत्र्यांना जावं लागलं होतं. माझं बाळासाहेबांशी भांडण नाही. माझी लढाई भ्रष्टाचाराशी आहे माझी लढाई कुणा व्यक्तिशी नाही असं अण्णांनी स्पष्ट केलं. मात्र बाळासाहेबांनी यावर खुलासा करत आमचे वय वाढलेच आहे. पण तुम्ही आमच्यापेक्षा वयाने लहान आहात म्हणून हा पोरकटपणा तुम्हालाही शोभत नाही आणि उगाच आमच्याशी 'वैर' घेण्याच्या भागनडीत पडू नका असा इशारा शिवसेनाप्रमुखांना दिला.

शिवसेनाप्रमुखांना काल दसरा मेळाव्यात अण्णांवर तोफ डागली. सोनिया गांधी उपचारासाठी देशाबाहेर गेल्या होत्या. एक महिना त्या बाहेर गेल्या तर देशात हैदास मांडला होता. अण्णांचे पंचतारांकित आंदोलन सुरू होते. अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांनी तर माईक हाती आला की जोर चढत होता. अण्णांचे उपोषण सुरू असतांना रामलीला मैदानावर दिवसांला 25 हजार लोक जेवण करत होती. अण्णांना भेटाला आलेल्याना जेवणाचे विचारले जात होते. भ्रष्टाचाराची थट्टा करू नका अण्णा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. पण अशा आंदोलनाने ते संपणार नाही भ्रष्टाचाराविरोधात चांगले चांगले संपले आहे. लढा सक्षमपणे चालू ठेवावा लागेल. असा सल्लावजा टोला लगावला होता.

यावर प्रतिक्रिया देत अण्णा म्हणाले की, बाळासाहेबांची आणि माझं अनेक वेळा या ना त्या विषयावरून वाद झाला. मात्र त्यांना प्रत्येक वेळा माघार घ्यावा लागला. आमच्या आंदोलनामुळेच युतीच्या तीन मंत्र्यांना जावं लागलं होतं. माझं बाळासाहेबांशी भांडण नाही. मी 25 वर्षांपासून भ्रष्टाचाराविरोधात लढा देत आहे. माझी लढाई भ्रष्टाचाराशी आहे माझी लढाई कुणा व्यक्तिशी नाही असं अण्णांनी स्पष्ट केलं.

अण्णांच्या प्रतिक्रियेला बाळासाहेबांनी पत्रक काढून उत्तर दिलं. "कालच्या दसरा मेळाव्यात आम्ही अण्णांवर भाष्य केले. पण आज ज्याप्रकारे वृत्तपत्रांनी ते सजवलंय, नटवलंय तसं काही आम्ही अण्णांवर बोललेलो नाही. अण्णा जे आता अकारण बोललेत त्याला आम्ही उत्तर देऊ शकतो. कारण आम्ही काही गांधीवादी नाही. आमच्या वाढत्या वयाचा उल्लेख केला म्हणून अण्णांना सांगतो, होय, आमचे वय वाढलेच आहे. पण तुम्ही आमच्यापेक्षा वयाने लहान आहात म्हणून हा पोरकटपणा तुम्हालाही शोभत नाही आणि उगाच आमच्याशी 'वैर' घेण्याच्या भागनडीत पडू नका असा इशारा शिवसेनाप्रमुखांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2011 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close