S M L

काँग्रेसने देशाचं डंम्पिंग ग्राऊंड केलं - बाळासाहेब

06 ऑक्टोबरमुंबई जर कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तर स्वत: पिस्तुल घेऊन गोळ्या घालीन असा खणखणीत इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. तसेच या काँग्रेस सरकारने आजपर्यंत काय केलं कसाबचा पाहुणचार अजून सुरू आहे, अफजल गुरूला अजून फासावर लटकवले नाही या सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी रस्त्यावर उतरा असं आवाहन बाळासाहेबांनी केलं. मुंबईतल्या शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्यात आपल्या ठाकरी शैलीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चौफेर तोफा डागल्या. पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्र सरकार, तसेच सोनिया गांधींना बाळासाहेबांनी फटकारलं. देशाचं नेतृत्व कणखर हवं, असं ते म्हणाले. रामलीला मैदानावर अण्णांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी टीम अण्णांवर हल्ला केला. अण्णांचा उद्देश प्रामाणिक असला तरी एकट्या अण्णांच्या उपोषणामुळे भ्रष्टाचार संपणार नाही, असं ते म्हणाले. तसेच जैतापूर प्रकल्प होऊ देणार नाही जर दमदाटीचा प्रयत्न केला तर त्यांची झळ संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईला पोहचेल असा इशाराही बाळासाहेबांनी दिला.दरवर्षीप्रमाणे दसर्‍याला शिवसेनेचा दसरा मेळावा थाटात पार पडला. आवाजची मर्यादा काय असते, शिवसेनेचा आवाज डेसिबलमध्ये रोखता येणार नाही पण कोणाला काय सांगणार ज्याना ऐतिहासिक महत्व कळत नाही असं सांगत बाळासाहेबांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. इंग्लंड दौर्‍यावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या गृहमंत्री आर.आर.पाटील यांना सुटाबुटात पाहून मला एका परदेशी नागरीकाचा फोन आला तो म्हणे चॉर्ली चॅपलिन इकडे दिसला अशा शेलक्या शब्दात आबांना टोला लगावला. रामदास आठवले यांनी केलेल्या मागणीला बाळासाहेबांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. चालतं आता तर युती झाली आहे राजकारण खेळावं लागतं एकदा काय सगळं झालं की पाहता येईल शेवटी सर्व काही हे राजकारण आहे. गिरणी कामगारांच्या प्रश्नी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना भेटून काही फायद्याचे नाही हे नेत्यांना टोप्या घालणार असं सांगत त्यांची नकल करून बाळासाहेबांनी टीका केली. या काँग्रेस सरकारने देशाचं डंम्पिंग ग्राऊंड केलं आहे. सोनिया गांधी उपचारासाठी देशाबाहेर गेल्या होत्या. एक महिना त्या बाहेर गेल्या तर देशात हैदास मांडला होता. अण्णांचे पंचतारांकित आंदोलन सुरू होते. अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांनी तर माईक हाती आला की जोर चढत होता. अण्णांचे उपोषण सुरू असतांना रामलीला मैदानावर दिवसांला 25 हजार लोक जेवण करत होती. अण्णांना भेटाला आलेल्याना जेवणाचे विचारले जात होते. भ्रष्टाचाराची थट्टा करू नका अण्णा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. पण अशा आंदोलनाने ते संपणार नाही भ्रष्टाचाराविरोधात चांगले चांगले संपले आहे. लढा सक्षमपणे चालू ठेवावा लागेल. तर पंतप्रधान मनमोहन सिंग काय बोलतात ते कळत नाही त्यामुळे त्यांचे शत्रूंना काय कळणार. गेल्या साठ वर्षाच्या सत्तेत असतांना सर्वसामान्य जनतेला एक शौचालय देऊ शकले नाही. या सरकारने डंम्पिंग ग्राऊंड केलं आहे. मुंबई शहराला कोणी उभं केलं आहे ते नाना शंकर शेठ यांनी. आणि त्यांनाच विसरून चालणार नाही. देशात पहिली रेल्वे, मुंबई महापालिका,नगरपालिका त्यांनीच आणली आहे आम्ही त्यांच्या स्मारकासाठी एका जमीनाचा तुकडा इंदु मिलमधून मागितला आहे बाकीचा देण्यात यावा याला आमचा अक्षेप नाही. दुसरीकडे दादरचं नाव चैत्यभूमी देणार असं काही चाललं आहे. पण एक सांगतो दादरचं नाव दादरच राहणार आहे ते कधीच बदलणार नाही आणि बदलुही देणार नाही असा इशाराही बाळासाहेबांनी दिला. मुंबईत बांग्लादेशींची संख्या कसं काय वाढली यावर कोण उत्तर देणार ? असा सवाल बाळासाहेबांनी उपस्थित केला. मुंबईतच खड्डे आहेत का ? राज्यात दुसरीकडे कुठे खड्डे नाही का ? सगळे खड्डे शिवसेनेच्या नावावर लावण्याचं काम चालू आहे. काल झालेल्या रिक्षाचालकांना मारहाण ही शिवसैनिकांनी केली असा दावाही बाळासाहेबांनी केला. यानंतर बाळासाहेबांनी थेट माध्यमांवरच टीका केली. वाईट असेल तिथे वाईट म्हणा पण चांगलं असेल तेव्हा चांगलं दाखवा ज्या ठिकाणी चांगलं काम केलं तर कौतुक करा. पण मी तुमच्यावर टीका करत नाही पण समजून उमजून करा असा सल्लावजा टोला माध्यमांना लगावला. तसेच न्यायमूतीर्ंनी कायद्याशी खेळू नये. याला टाळे लावा त्याला टाळे लावा असं सांगतात तर केंद्रावर का आक्षेप घेत नाही अफजल गुरूला फाशी होत नाही तर शासनाला टाळे लावा असे का सांगत नाही अशी टीकाही केली. उद्या जर मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर स्वत: हातात पिस्तुल घेऊन गोळ्या घालीन असा खणखणीत इशारा बाळासाहेबांनी दिला. तर राज्यात पुन्हा एका दौराकरण्याची ताकद आहे असं पुन्हा एकदा बाळासाहेबांनी आवर्जून सांगितले. तसेच भाषणाच्या शेवटला काँग्रेस सरकार पाडण्यासाठी रस्त्यावर उतरा असं आवाहन बाळासाहेबांनी शिवसैनिकांना केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2011 03:39 PM IST

काँग्रेसने देशाचं डंम्पिंग ग्राऊंड केलं - बाळासाहेब

06 ऑक्टोबर

मुंबई जर कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तर स्वत: पिस्तुल घेऊन गोळ्या घालीन असा खणखणीत इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. तसेच या काँग्रेस सरकारने आजपर्यंत काय केलं कसाबचा पाहुणचार अजून सुरू आहे, अफजल गुरूला अजून फासावर लटकवले नाही या सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी रस्त्यावर उतरा असं आवाहन बाळासाहेबांनी केलं. मुंबईतल्या शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्यात आपल्या ठाकरी शैलीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चौफेर तोफा डागल्या. पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्र सरकार, तसेच सोनिया गांधींना बाळासाहेबांनी फटकारलं. देशाचं नेतृत्व कणखर हवं, असं ते म्हणाले. रामलीला मैदानावर अण्णांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी टीम अण्णांवर हल्ला केला. अण्णांचा उद्देश प्रामाणिक असला तरी एकट्या अण्णांच्या उपोषणामुळे भ्रष्टाचार संपणार नाही, असं ते म्हणाले. तसेच जैतापूर प्रकल्प होऊ देणार नाही जर दमदाटीचा प्रयत्न केला तर त्यांची झळ संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईला पोहचेल असा इशाराही बाळासाहेबांनी दिला.दरवर्षीप्रमाणे दसर्‍याला शिवसेनेचा दसरा मेळावा थाटात पार पडला. आवाजची मर्यादा काय असते, शिवसेनेचा आवाज डेसिबलमध्ये रोखता येणार नाही पण कोणाला काय सांगणार ज्याना ऐतिहासिक महत्व कळत नाही असं सांगत बाळासाहेबांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. इंग्लंड दौर्‍यावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या गृहमंत्री आर.आर.पाटील यांना सुटाबुटात पाहून मला एका परदेशी नागरीकाचा फोन आला तो म्हणे चॉर्ली चॅपलिन इकडे दिसला अशा शेलक्या शब्दात आबांना टोला लगावला. रामदास आठवले यांनी केलेल्या मागणीला बाळासाहेबांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. चालतं आता तर युती झाली आहे राजकारण खेळावं लागतं एकदा काय सगळं झालं की पाहता येईल शेवटी सर्व काही हे राजकारण आहे.

गिरणी कामगारांच्या प्रश्नी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना भेटून काही फायद्याचे नाही हे नेत्यांना टोप्या घालणार असं सांगत त्यांची नकल करून बाळासाहेबांनी टीका केली. या काँग्रेस सरकारने देशाचं डंम्पिंग ग्राऊंड केलं आहे. सोनिया गांधी उपचारासाठी देशाबाहेर गेल्या होत्या. एक महिना त्या बाहेर गेल्या तर देशात हैदास मांडला होता. अण्णांचे पंचतारांकित आंदोलन सुरू होते. अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांनी तर माईक हाती आला की जोर चढत होता. अण्णांचे उपोषण सुरू असतांना रामलीला मैदानावर दिवसांला 25 हजार लोक जेवण करत होती. अण्णांना भेटाला आलेल्याना जेवणाचे विचारले जात होते. भ्रष्टाचाराची थट्टा करू नका अण्णा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. पण अशा आंदोलनाने ते संपणार नाही भ्रष्टाचाराविरोधात चांगले चांगले संपले आहे. लढा सक्षमपणे चालू ठेवावा लागेल.

तर पंतप्रधान मनमोहन सिंग काय बोलतात ते कळत नाही त्यामुळे त्यांचे शत्रूंना काय कळणार. गेल्या साठ वर्षाच्या सत्तेत असतांना सर्वसामान्य जनतेला एक शौचालय देऊ शकले नाही. या सरकारने डंम्पिंग ग्राऊंड केलं आहे. मुंबई शहराला कोणी उभं केलं आहे ते नाना शंकर शेठ यांनी. आणि त्यांनाच विसरून चालणार नाही. देशात पहिली रेल्वे, मुंबई महापालिका,नगरपालिका त्यांनीच आणली आहे आम्ही त्यांच्या स्मारकासाठी एका जमीनाचा तुकडा इंदु मिलमधून मागितला आहे बाकीचा देण्यात यावा याला आमचा अक्षेप नाही.

दुसरीकडे दादरचं नाव चैत्यभूमी देणार असं काही चाललं आहे. पण एक सांगतो दादरचं नाव दादरच राहणार आहे ते कधीच बदलणार नाही आणि बदलुही देणार नाही असा इशाराही बाळासाहेबांनी दिला. मुंबईत बांग्लादेशींची संख्या कसं काय वाढली यावर कोण उत्तर देणार ? असा सवाल बाळासाहेबांनी उपस्थित केला. मुंबईतच खड्डे आहेत का ? राज्यात दुसरीकडे कुठे खड्डे नाही का ? सगळे खड्डे शिवसेनेच्या नावावर लावण्याचं काम चालू आहे. काल झालेल्या रिक्षाचालकांना मारहाण ही शिवसैनिकांनी केली असा दावाही बाळासाहेबांनी केला.

यानंतर बाळासाहेबांनी थेट माध्यमांवरच टीका केली. वाईट असेल तिथे वाईट म्हणा पण चांगलं असेल तेव्हा चांगलं दाखवा ज्या ठिकाणी चांगलं काम केलं तर कौतुक करा. पण मी तुमच्यावर टीका करत नाही पण समजून उमजून करा असा सल्लावजा टोला माध्यमांना लगावला. तसेच न्यायमूतीर्ंनी कायद्याशी खेळू नये. याला टाळे लावा त्याला टाळे लावा असं सांगतात तर केंद्रावर का आक्षेप घेत नाही अफजल गुरूला फाशी होत नाही तर शासनाला टाळे लावा असे का सांगत नाही अशी टीकाही केली.

उद्या जर मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर स्वत: हातात पिस्तुल घेऊन गोळ्या घालीन असा खणखणीत इशारा बाळासाहेबांनी दिला. तर राज्यात पुन्हा एका दौराकरण्याची ताकद आहे असं पुन्हा एकदा बाळासाहेबांनी आवर्जून सांगितले. तसेच भाषणाच्या शेवटला काँग्रेस सरकार पाडण्यासाठी रस्त्यावर उतरा असं आवाहन बाळासाहेबांनी शिवसैनिकांना केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2011 03:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close