S M L

दादरच्या नामांतराची मागणीच नव्हती - आठवले

07 ऑक्टोबरराज्याच्या राजकारणात नवीन समीकरणं तयार करण्याच्या हेतूनं शिवसेना-भाजपशी जवळीक साधणार्‍या रामदास आठवलेंनी दादरच्या नामांतराची मागणीच नव्हती अशी भूमिका घेतली आहे. आपण नामांतराची मागणी केली नव्हती पण व्हीटी स्टेशनचं नाव बद्दलण्याची मागणी केली होती असा नवा खुलासा आठवले यांनी केला. याबाबत बाळासाहेबांची लवकरच भेट घेणार असंही आठवले यांनी सांगितले. काल गुरूवारी बाळासाहेब ठाकरेंनी दसर्‍यामेळाव्या निमित्त चौफेर तोफ डागली. मुंबई शहराला कोणी उभं केलं आहे ते नाना शंकर शेठ यांनी. आणि त्यांनाच विसरून चालणार नाही. देशात पहिली रेल्वे, मुंबई महापालिका,नगरपालिका त्यांनीच आणली आहे आम्ही त्यांच्या स्मारकासाठी एका जमीनाचा तुकडा इंदु मिलमधून मागितला आहे बाकीचा देण्यात यावा याला आमचा अक्षेप नाही. दुसरीकडे दादरचं नाव चैत्यभूमी देणार असं काही चाललं आहे. पण एक सांगतो दादरचं नाव दादरच राहणार आहे ते कधीच बदलणार नाही आणि बदलुही देणार नाही असा इशाराही बाळासाहेबांनी दिला. बाळासाहेबांच्या या इशार्‍याला राष्ट्रवादीने बाळासाहेबांना हुकूमशाही करु नका असं कडक प्रत्युत्तर दिले. तर शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपनंही आता या मुद्याचे गंभीर पडसाद उमटू शकतात हे लक्षात घेत सावध भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे मुंबई राज्यापासून वेगळी करण्याच्या बाळासाहेबांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पुढाकार घेतला. आम्हालाही त्यांच्याच भाषेत उत्तर देता येतं. पण आम्ही संयम पाळतो. असंही त्यांनी सुनावलं. शिवाय मुंबई वेगळी करण्याचा कुठलाही मुद्दा नाही मात्र केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना सातत्याने हा मुद्दा करते असा टोलाही त्यांनी लगावला. ठाकरे यांनी आर. आर. पाटलांना चार्ली चॅपलीनची उपमा दिली होती यावर बोलतांना उपमा आम्हालाही देता येतात मात्र आमची ती संस्कृती नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.एकंदरीतच दादरच्या नामांतरासह मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेत बाळासाहेब ठाकरेंनी अनेक विषयांना हात घालत रणशिंग फुंकलं आणि आता त्याचे पडसादही उमटू लागलेत. आता येत्या काही दिवसात हा संघर्ष तीव्र होणार हे निश्चित.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 7, 2011 06:33 PM IST

दादरच्या नामांतराची मागणीच नव्हती - आठवले

07 ऑक्टोबर

राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणं तयार करण्याच्या हेतूनं शिवसेना-भाजपशी जवळीक साधणार्‍या रामदास आठवलेंनी दादरच्या नामांतराची मागणीच नव्हती अशी भूमिका घेतली आहे. आपण नामांतराची मागणी केली नव्हती पण व्हीटी स्टेशनचं नाव बद्दलण्याची मागणी केली होती असा नवा खुलासा आठवले यांनी केला. याबाबत बाळासाहेबांची लवकरच भेट घेणार असंही आठवले यांनी सांगितले.

काल गुरूवारी बाळासाहेब ठाकरेंनी दसर्‍यामेळाव्या निमित्त चौफेर तोफ डागली. मुंबई शहराला कोणी उभं केलं आहे ते नाना शंकर शेठ यांनी. आणि त्यांनाच विसरून चालणार नाही. देशात पहिली रेल्वे, मुंबई महापालिका,नगरपालिका त्यांनीच आणली आहे आम्ही त्यांच्या स्मारकासाठी एका जमीनाचा तुकडा इंदु मिलमधून मागितला आहे बाकीचा देण्यात यावा याला आमचा अक्षेप नाही. दुसरीकडे दादरचं नाव चैत्यभूमी देणार असं काही चाललं आहे. पण एक सांगतो दादरचं नाव दादरच राहणार आहे ते कधीच बदलणार नाही आणि बदलुही देणार नाही असा इशाराही बाळासाहेबांनी दिला. बाळासाहेबांच्या या इशार्‍याला राष्ट्रवादीने बाळासाहेबांना हुकूमशाही करु नका असं कडक प्रत्युत्तर दिले. तर शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपनंही आता या मुद्याचे गंभीर पडसाद उमटू शकतात हे लक्षात घेत सावध भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे मुंबई राज्यापासून वेगळी करण्याच्या बाळासाहेबांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पुढाकार घेतला.

आम्हालाही त्यांच्याच भाषेत उत्तर देता येतं. पण आम्ही संयम पाळतो. असंही त्यांनी सुनावलं. शिवाय मुंबई वेगळी करण्याचा कुठलाही मुद्दा नाही मात्र केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना सातत्याने हा मुद्दा करते असा टोलाही त्यांनी लगावला. ठाकरे यांनी आर. आर. पाटलांना चार्ली चॅपलीनची उपमा दिली होती यावर बोलतांना उपमा आम्हालाही देता येतात मात्र आमची ती संस्कृती नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

एकंदरीतच दादरच्या नामांतरासह मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेत बाळासाहेब ठाकरेंनी अनेक विषयांना हात घालत रणशिंग फुंकलं आणि आता त्याचे पडसादही उमटू लागलेत. आता येत्या काही दिवसात हा संघर्ष तीव्र होणार हे निश्चित.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2011 06:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close