S M L

पहिल्या महिला लोककला संमेलनाचे थाटात उद्घाटन

09 ऑक्टोबरमुंबईमध्ये अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहेत. पहिल्यांदाच अशा प्रकारचं संमेलन होत असून 2 दिवस हे संमेलन रंगणार आहे. यामध्ये देशभरातल्या लोक कलेचा वारसा जपणार्‍या महिला लोक कलावंत आपली कला सादर करणार आहेत.आज सकाळी या संमेलनाचे उद्घाटन झालं. त्यानंतर पद्मभूषण तिज्जनबाई यांच्या पंडवानी गायनाने मुंबईकरांची सकाळ सुरेल केली. या संमेलनात आदिवासी महिला जीवन, महाराष्ट्रातल्या संतकवयित्रींचं योगदान अशा अनेक विषयांवर परिसंवाद होत आहेत. आदिवासी नृत्य, पथनाट्यं, पोवाडा, भारूड आणि भोजपुरी संगीताबरोबरच मर्‍हाटमोळी लावणीही होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 9, 2011 01:41 PM IST

पहिल्या महिला लोककला संमेलनाचे थाटात उद्घाटन

09 ऑक्टोबर

मुंबईमध्ये अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहेत. पहिल्यांदाच अशा प्रकारचं संमेलन होत असून 2 दिवस हे संमेलन रंगणार आहे. यामध्ये देशभरातल्या लोक कलेचा वारसा जपणार्‍या महिला लोक कलावंत आपली कला सादर करणार आहेत.आज सकाळी या संमेलनाचे उद्घाटन झालं. त्यानंतर पद्मभूषण तिज्जनबाई यांच्या पंडवानी गायनाने मुंबईकरांची सकाळ सुरेल केली. या संमेलनात आदिवासी महिला जीवन, महाराष्ट्रातल्या संतकवयित्रींचं योगदान अशा अनेक विषयांवर परिसंवाद होत आहेत. आदिवासी नृत्य, पथनाट्यं, पोवाडा, भारूड आणि भोजपुरी संगीताबरोबरच मर्‍हाटमोळी लावणीही होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2011 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close