S M L

आंदोलनासाठी अण्णांचा वापर -दिग्विजय सिंग

11 ऑक्टोबरकाँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी अण्णा हजारे यांच्यावर पुन्हा एकदा आरोपाची फैरी झाडली. भूषण पितापुत्र आणि केजरीवाल अण्णांचा राजकीय फायद्यासाठी वापर करतायेत, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. दिग्विजय सिंग यांनी अण्णांना एक पत्र लिहले आहे. या पत्रात अण्णांना थेट आरोपाचा पुरावाच दिला आहे.टीम अण्णांनी काँग्रेसविरोधात मतदान न करण्याच्या मोहिमेला सुरवात केली आणि काँग्रेसमध्ये नाराजीचे सुर उमटले. अण्णांचे आंदोलनाच्या वेळी दिग्विजय सिंग यांनी आरोपाची मालिकाच सुरू केली होती. आणि आता दिग्विजय सिंग यांनी थेट अण्णांना पत्र लिहून आपलं मत स्पष्टपणे सांगितले आहे. तुमचे अनुयायी फाईव्ह स्टार संस्कृतीवाले आहेत. आणि भाजपला तुम्हाला राष्ट्रपतीपदासाठी लढवायचं आहे. भाजप अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांच्यावर लाच घेण्यासाठी गुन्हा दाखल झाला नाही तरी अण्णा भाजपला कधीच टार्गेट करत नाही. भाजपने काळा पैसा मायदेशात आणण्यासाठी काहीच केलेलं नाही. संघाशी तुमच्या संबधामुळे तुम्ही मला राजकारणातून निवृत्ती घ्यायला सांगता. मात्र आता संघप्रमुखांनीच आम्ही अण्णाला पाठिंबा दिल्याचं जाहीर विधान केलं आहे. यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होतात. हिसारमध्ये काँग्रेसचा विरोध करतांना तुम्ही चौटाला सारख्या भ्रष्ट उमेदवाराला पाठिंबा देतात असंही दिग्विजय सिंग यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2011 09:49 AM IST

आंदोलनासाठी अण्णांचा वापर -दिग्विजय सिंग

11 ऑक्टोबर

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी अण्णा हजारे यांच्यावर पुन्हा एकदा आरोपाची फैरी झाडली. भूषण पितापुत्र आणि केजरीवाल अण्णांचा राजकीय फायद्यासाठी वापर करतायेत, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. दिग्विजय सिंग यांनी अण्णांना एक पत्र लिहले आहे. या पत्रात अण्णांना थेट आरोपाचा पुरावाच दिला आहे.

टीम अण्णांनी काँग्रेसविरोधात मतदान न करण्याच्या मोहिमेला सुरवात केली आणि काँग्रेसमध्ये नाराजीचे सुर उमटले. अण्णांचे आंदोलनाच्या वेळी दिग्विजय सिंग यांनी आरोपाची मालिकाच सुरू केली होती. आणि आता दिग्विजय सिंग यांनी थेट अण्णांना पत्र लिहून आपलं मत स्पष्टपणे सांगितले आहे. तुमचे अनुयायी फाईव्ह स्टार संस्कृतीवाले आहेत. आणि भाजपला तुम्हाला राष्ट्रपतीपदासाठी लढवायचं आहे. भाजप अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांच्यावर लाच घेण्यासाठी गुन्हा दाखल झाला नाही तरी अण्णा भाजपला कधीच टार्गेट करत नाही. भाजपने काळा पैसा मायदेशात आणण्यासाठी काहीच केलेलं नाही. संघाशी तुमच्या संबधामुळे तुम्ही मला राजकारणातून निवृत्ती घ्यायला सांगता. मात्र आता संघप्रमुखांनीच आम्ही अण्णाला पाठिंबा दिल्याचं जाहीर विधान केलं आहे. यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होतात. हिसारमध्ये काँग्रेसचा विरोध करतांना तुम्ही चौटाला सारख्या भ्रष्ट उमेदवाराला पाठिंबा देतात असंही दिग्विजय सिंग यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2011 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close