S M L

भूखंडाच्या जावईशोधावर कोर्टाने जोशींना खडसावले !

12 ऑक्टोबरमाजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांना आज सुप्रीम कोर्टाने दणका दिला. मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर करुन जावयाला भूखंड दिल्याबद्दल कोर्टाने जोशींवर ताशेरे ओढले आहेत. पण मनोहर जोशी यांच्याविरोधात चौकशी समिती नेमण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला होता. तो निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केलेत. 1996 साली मनोहर जोशींनी त्यांचे जावई गिरीश व्यास यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला पुण्यातला एक भूखंड नियम मोडून दिला होता. शाळेसाठी आरक्षित असलेल्या या जागेवर व्यावसायिक इमारत बांधण्याची परवानगी जोशींनी आपल्या जावयाला मिळवून दिली. मुंबई हायकोर्टाने हे कृत्य बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. आता सुप्रीम कोर्टानंही हाच आदेश कायम ठेवला आहे. आणि गिरीश व्यास यांना दोन पर्याय दिले आहेत. एकतर दोन आठवड्यांच्या आत त्यांनी ही जागा आणि त्यावरची सहा मजली इमारत पुणे महापालिकेच्या ताब्यात द्यावी नाहीतर कारवाईला सामोरे जावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. दरम्यान, गिरीष व्यास हे आपले जावई आहेत पण आपल्यावरचे आरोप मान्य नाहीत असं स्पष्टीकरण मनोहर जोशी यांनी दिलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2011 10:00 AM IST

भूखंडाच्या जावईशोधावर कोर्टाने जोशींना खडसावले !

12 ऑक्टोबर

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांना आज सुप्रीम कोर्टाने दणका दिला. मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर करुन जावयाला भूखंड दिल्याबद्दल कोर्टाने जोशींवर ताशेरे ओढले आहेत. पण मनोहर जोशी यांच्याविरोधात चौकशी समिती नेमण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला होता. तो निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केलेत. 1996 साली मनोहर जोशींनी त्यांचे जावई गिरीश व्यास यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला पुण्यातला एक भूखंड नियम मोडून दिला होता.

शाळेसाठी आरक्षित असलेल्या या जागेवर व्यावसायिक इमारत बांधण्याची परवानगी जोशींनी आपल्या जावयाला मिळवून दिली. मुंबई हायकोर्टाने हे कृत्य बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. आता सुप्रीम कोर्टानंही हाच आदेश कायम ठेवला आहे. आणि गिरीश व्यास यांना दोन पर्याय दिले आहेत. एकतर दोन आठवड्यांच्या आत त्यांनी ही जागा आणि त्यावरची सहा मजली इमारत पुणे महापालिकेच्या ताब्यात द्यावी नाहीतर कारवाईला सामोरे जावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. दरम्यान, गिरीष व्यास हे आपले जावई आहेत पण आपल्यावरचे आरोप मान्य नाहीत असं स्पष्टीकरण मनोहर जोशी यांनी दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2011 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close