S M L

प्रशांत भूषण यांना बेदम मारहाण

12 ऑक्टोबरटीम अण्णांचे सदस्य आणि वकील प्रशांत भूषण यांना आज सुप्रीम कोर्टाच्या त्यांच्या चेंबरमध्ये घुसून काही लोकांनी मारहाण केली. दुपारी चार वाजता प्रशांत भूषण आपल्या चेंबरमध्ये एका टीव्ही चॅनलला मुलाखत देण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी त्यांच्या तोंडावर कुणीतरी ठोसा दिला. भूषण यांना त्यांच्या खुर्चीतून खेचण्यात आलं. त्यांना वारंवार लाथा आणि बुक्क्या मारण्यात आल्या. श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी भूषण यांना मारहाण केली. इंदर वर्मा, अरुण आणि विष्णू गुप्ता अशी या हल्लेखोरांची नावं आहेत. काश्मीरबद्दल प्रशांत भूषण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हे कार्यकर्ते संतापले होते. त्यामुळेच त्यांनी मारहाण केल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपुर्वी प्रशांत भूषण यांनी काश्मीर प्रश्नी तेथील लोकांना स्वतंत्र द्या आणि लष्कराला मागे बोलवा असं विधान प्रशांत यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा याचा जाब विचारण्यासाठी प्रशांत भूषण यांना त्यांच्या सुप्रीम कोर्टाच्या 301 चेंबरमध्ये गाठले. यावेळी भूषण या वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. अगोदर भूषण आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी अधिक आक्रमक होत भूषण यांना लाथा, बुक्याने मारहाण करायला सुरूवात केली. भूषण याचे सहकारी आणि कार्यालयातील कर्मचार्‍यांनी धाव घेऊन सेनेच्या कार्यकर्त्यांना पकडले आणि चोप दिला. यावेळी दोघे जण फरार झाले. मात्र इंदर वर्मा हा तरूण पकडला गेला. कर्मचार्‍यांनी त्याला पोलिसांकडे स्वाधीन केलं. दरम्यान, प्रशांत भूषण यांना ताबडतोब दिल्लीतल्या आर एम एल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. भूषण यांना कोणतीही गंभीर जखम नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली.प्रशांत भूषण यांना मारहाणीचा टीम अण्णांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. किरण बेदी, मेधा पाटकर यांनी हा भ्याड हल्ला होता. त्याचा आम्ही निषेध करतो असं सांगितलं तर अण्णा म्हणाले की, तरूणांनी कायदा हातात घेणे चुकीचे आहे. देशाला तरूणांची गरज आहे. त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. अशा प्रकारचे कृत्य करू नये असं आवाहन अण्णांनी केलं. तसेच या प्रकरणी अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांच्याशी बातचीत करून योग्य तो निर्णय घेऊ असं ही अण्णांनी सांगितले. तर काँग्रेसचे आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.प्रशांत भूषण यांचे विधान 'आम्ही अनेक सामाजिक संघटनांशी मिळून काम करत आहोत. लष्कराचा विशेषाधिकार कायदा काढण्यासाठी मोहीम सुरू आहे. विशेषाधिकारांमुळेच लष्कराचे जवान दबाव आणतात. हे एक कारण आहे. त्यामुळेच मानवाधिकार संघटना जे काही योग्य आहे ते करू शकतात. जिथं पीडित लोक आवाज उठवतात तिथं तो मुद्दा उचलायलाच हवा. अशा पीडितांचा तुम्ही मुद्दा हाती घेतला तर ते फायद्याचंच ठरेल.' - प्रशांत भूषण यापूर्वीही सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. 26 नोव्हेंबर 2010हुरियतचे नेते मीरवाईझ उमर फारुख चंदिगडमध्ये पत्रकार परिषद घेत होते. काही मिनिटांतच त्यांच्या पत्रकार परिषदेत गदारोळ झाला. काश्मीरबाबत त्यांच्या भूमिकेवर काही जणांनी त्यांना धारेवर धरलं.या घटनेच्या 25 दिवस अगोदर प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्या दिल्लीतल्या घरापुढे भाजपच्या महिला विभागाने धरणं दिलं. काश्मीर आणि नक्षलवाद याबद्दलच्या त्यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. त्यावेळी रॉय घरात नव्हत्या. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला.असे हल्ले केवळ सामाजिक कार्यकर्त्यांपुरतेच मर्यादित नाहीत. पत्रकार अरुण शौरी यांनाही अशा हिंसक आंदोलनाचा सामना करावा लागला. 1990 मध्ये एका लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या त्यांच्या मतांवरून आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं.2009 मध्ये मुंबईत आयबीएन-लोकमतच्या ऑफिसवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. याप्रमाणेच हेडलाईन्स टुडेच्या ऑफिसलाही संघाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्य केलं. हिंदू दहशतवादाबद्दलची बातमी दाखवल्यामुळे ते संतापले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2011 11:24 AM IST

प्रशांत भूषण यांना बेदम मारहाण

12 ऑक्टोबर

टीम अण्णांचे सदस्य आणि वकील प्रशांत भूषण यांना आज सुप्रीम कोर्टाच्या त्यांच्या चेंबरमध्ये घुसून काही लोकांनी मारहाण केली. दुपारी चार वाजता प्रशांत भूषण आपल्या चेंबरमध्ये एका टीव्ही चॅनलला मुलाखत देण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी त्यांच्या तोंडावर कुणीतरी ठोसा दिला. भूषण यांना त्यांच्या खुर्चीतून खेचण्यात आलं. त्यांना वारंवार लाथा आणि बुक्क्या मारण्यात आल्या. श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी भूषण यांना मारहाण केली. इंदर वर्मा, अरुण आणि विष्णू गुप्ता अशी या हल्लेखोरांची नावं आहेत. काश्मीरबद्दल प्रशांत भूषण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हे कार्यकर्ते संतापले होते. त्यामुळेच त्यांनी मारहाण केल्याचं म्हटलं आहे.

काही दिवसांपुर्वी प्रशांत भूषण यांनी काश्मीर प्रश्नी तेथील लोकांना स्वतंत्र द्या आणि लष्कराला मागे बोलवा असं विधान प्रशांत यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा याचा जाब विचारण्यासाठी प्रशांत भूषण यांना त्यांच्या सुप्रीम कोर्टाच्या 301 चेंबरमध्ये गाठले. यावेळी भूषण या वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. अगोदर भूषण आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी अधिक आक्रमक होत भूषण यांना लाथा, बुक्याने मारहाण करायला सुरूवात केली. भूषण याचे सहकारी आणि कार्यालयातील कर्मचार्‍यांनी धाव घेऊन सेनेच्या कार्यकर्त्यांना पकडले आणि चोप दिला. यावेळी दोघे जण फरार झाले. मात्र इंदर वर्मा हा तरूण पकडला गेला. कर्मचार्‍यांनी त्याला पोलिसांकडे स्वाधीन केलं. दरम्यान, प्रशांत भूषण यांना ताबडतोब दिल्लीतल्या आर एम एल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. भूषण यांना कोणतीही गंभीर जखम नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

प्रशांत भूषण यांना मारहाणीचा टीम अण्णांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. किरण बेदी, मेधा पाटकर यांनी हा भ्याड हल्ला होता. त्याचा आम्ही निषेध करतो असं सांगितलं तर अण्णा म्हणाले की, तरूणांनी कायदा हातात घेणे चुकीचे आहे. देशाला तरूणांची गरज आहे. त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. अशा प्रकारचे कृत्य करू नये असं आवाहन अण्णांनी केलं. तसेच या प्रकरणी अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांच्याशी बातचीत करून योग्य तो निर्णय घेऊ असं ही अण्णांनी सांगितले. तर काँग्रेसचे आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

प्रशांत भूषण यांचे विधान

'आम्ही अनेक सामाजिक संघटनांशी मिळून काम करत आहोत. लष्कराचा विशेषाधिकार कायदा काढण्यासाठी मोहीम सुरू आहे. विशेषाधिकारांमुळेच लष्कराचे जवान दबाव आणतात. हे एक कारण आहे. त्यामुळेच मानवाधिकार संघटना जे काही योग्य आहे ते करू शकतात. जिथं पीडित लोक आवाज उठवतात तिथं तो मुद्दा उचलायलाच हवा. अशा पीडितांचा तुम्ही मुद्दा हाती घेतला तर ते फायद्याचंच ठरेल.' - प्रशांत भूषण यापूर्वीही सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.

26 नोव्हेंबर 2010

हुरियतचे नेते मीरवाईझ उमर फारुख चंदिगडमध्ये पत्रकार परिषद घेत होते. काही मिनिटांतच त्यांच्या पत्रकार परिषदेत गदारोळ झाला. काश्मीरबाबत त्यांच्या भूमिकेवर काही जणांनी त्यांना धारेवर धरलं.

या घटनेच्या 25 दिवस अगोदर प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्या दिल्लीतल्या घरापुढे भाजपच्या महिला विभागाने धरणं दिलं. काश्मीर आणि नक्षलवाद याबद्दलच्या त्यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. त्यावेळी रॉय घरात नव्हत्या. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला.

असे हल्ले केवळ सामाजिक कार्यकर्त्यांपुरतेच मर्यादित नाहीत. पत्रकार अरुण शौरी यांनाही अशा हिंसक आंदोलनाचा सामना करावा लागला. 1990 मध्ये एका लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या त्यांच्या मतांवरून आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं.

2009 मध्ये मुंबईत आयबीएन-लोकमतच्या ऑफिसवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. याप्रमाणेच हेडलाईन्स टुडेच्या ऑफिसलाही संघाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्य केलं. हिंदू दहशतवादाबद्दलची बातमी दाखवल्यामुळे ते संतापले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2011 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close