S M L

लातूरमध्ये हत्तीरोगानं रहिवाशी बेजार

17 नोव्हेंबर, लातूर पुरुषोत्तम भांगेमुख्यमंत्र्यांच्या लातूर जिल्ह्यात हत्तीरोगानं उग्र स्वरूप धारण केलंय. हत्तीरोगानं आतापर्यंत 4 हजार लोकांना बेजार केलंय. जिल्ह्यातील रहिवाशांच्यादृष्टीनं ही चिंतेची बाब असली तरी आरोग्य विभागाच्यावतीने अद्याप ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. चार वर्ष आरोग्य विभागाच्यावतीने एकदिवसीय हत्तीरोग नियंत्रण सामूहिक उपचार मोहीम राबवण्यात येते. मात्र योग्य समुपदेशनाअभावी आणि गोळ्या वाटप करण्यार्‍या अप्रशिक्षित कर्मचार्‍यांमुळे ही मोहीम नागरिकांपर्यंत पोचलीच नाही. आरोग्य विभागाच्यावतीनं वाटल्या जाणार्‍या मोफत गोळ्या अजून पोचल्याच नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो रुग्णांचे हाल होत आहेत. ' गोळ्या वाटप सुरू असलेलं मला माहिती नाही. अजून तरी कोणी मला गोळ्या दिलेल्या नाहीत ' असं रहिवासी राम म्हात्रे सांगत होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ही मोहीम राबवण्यात आली. पण भीतीमुळं दिलेल्या गोळ्याही रहिवासी खात नसल्याचं स्पष्ट झालंय. ' गेल्या वर्षी गोळ्या खाल्यानं चिकनगुनिया झाल्याचा समज रहिवाशांमध्ये होता. त्यामुळे 50 टक्के लोकांनीच गोळ्या घेतल्या आहेत ', असं अंगणवाडी कर्मचारी सखुबाई वाढवणकर यांनी सांगितलं. ' कर्मचार्‍यांमार्फत जिल्ह्यातील रहिवाशांना गोळ्या देण्यात येणार असल्याचं लातूरचे जिल्हा हिवताप अधिकारी व्ही.के. मुंडे यांनी स्पष्ट केलं.आंध्रप्रदेशाच्या सीमेवरील जंगलाचा भाग तसंच कर्नाटक राज्याच्या सीमेवरील पाण्याचा भाग यामुळे लातूर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रसार झपाट्याने होतोय. त्यामुळे हत्तीरोग नियंत्रणाची ही मोहीम पल्सपोलिओच्या धर्तीवर राबवण्याबरोबरच लोकजागृती करण्याची खरी गरज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2008 03:02 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2008 03:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close