S M L

राष्ट्रपतीपद माझ्यासाठी सन्मान - नारायण मूर्ती

13 ऑक्टोबरराष्ट्रपतीपदासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपल्या नावाला सहमती दर्शवली तर तो मी माझा बहुमान समजेल अशी प्रतिक्रिया इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी दिली. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत नारायण मूतीर्ंनी हे स्पष्ट केलंय. आयटी क्षेत्रात भारताचे नाव जागतिक पातळीवर नेण्यात सिंहाचा वाटा उचलणार्‍या इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत आयबीएन लोकमतने घेतली. नारायण मूतीर्ंची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेणारं आयबीएन लोकमत हे पहिलं मराठी न्यूज चॅनेल ठरलंय. निखिल वागळे : सर आम्ही तुम्हाला येत्या काळात एका अधिक व्यापक भूमिकेत, म्हणजेच भारताच्या राष्ट्रपतीच्या भूमिकेत, पाहू शकू का ? जर डॉ. अब्दुल कलाम यांच्यासारखी तुमची सर्वपक्षांकडून बिनविरोध निवड झाली तर.. नारायण मूर्ती : मी या विषयावर माझं मत देणं योग्य नाही. माझ्यापेक्षा अधिक मोठे, तज्ज्ञ लोक आणि निर्णय घेण्याच्या भूमिकेत असलेले लोक आहेत. म्हणूनच मी यावर माझं मत देणं उचित समजत नाही. निखिल वागळे : सर, पण सर्वपक्षांनी जर तुम्हाला पाठिंबा दिला तर ? कारण आमच्या सारख्या भारताच्या तरुण जनतेला तुमच्या आणि डॉ. कलाम यांच्या सारखं नेतृत्त्व हवंय आणि तरुण जनता ते नेतृत्त्व तुमच्यात पाहतेय. जर सर्वपक्षांनी तुमचं नाव सुचवलं तर तुम्ही ही ऑफर स्विकारायला तयार आहात का ? नारायण मूर्ती : नक्कीच हा मी माझा सन्मान समजेन, राष्ट्रासाठी ते मोलाचं योगदान देण्यासारखं आहे. आणि नक्कीच मला खूप आनंद होईल ही जबाबदारी घेताना, पण यावर मी काही बोलणं उचित नाही. आता यावर बोलणं हे आता खूप घाईचं होईल. कारण नव्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी अजून 9 महिन्यांचा कालावधी आहे. निखिल वागळे : म्हणजे मी असं म्हणू शकतो की तुम्ही जरुर तयार आहात.नारायण मूर्ती : मी आपल्या देशाला मोलाचं योगदान देण्याची ही संधी समजेन. भारताची पब्लिक हेल्थ फाऊंडेशनचा मी भाग आहे. जी एक मोठी नागरीकांच्या हितासाठी तयार झालेली संस्था आहे. नॅशनल पेमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चं काम. मास्टर कार्ड किंवा विझा च्या धरतीवरचं काम आहे. या दोन्ही संस्थांशी मी जोडलेला आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारची जबाबदारी ही माझ्यासाठी देशाला मोलाचं योगदान देण्याची संधी ठरेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2011 09:35 AM IST

राष्ट्रपतीपद माझ्यासाठी सन्मान - नारायण मूर्ती

13 ऑक्टोबर

राष्ट्रपतीपदासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपल्या नावाला सहमती दर्शवली तर तो मी माझा बहुमान समजेल अशी प्रतिक्रिया इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी दिली. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत नारायण मूतीर्ंनी हे स्पष्ट केलंय.

आयटी क्षेत्रात भारताचे नाव जागतिक पातळीवर नेण्यात सिंहाचा वाटा उचलणार्‍या इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत आयबीएन लोकमतने घेतली. नारायण मूतीर्ंची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेणारं आयबीएन लोकमत हे पहिलं मराठी न्यूज चॅनेल ठरलंय. निखिल वागळे : सर आम्ही तुम्हाला येत्या काळात एका अधिक व्यापक भूमिकेत, म्हणजेच भारताच्या राष्ट्रपतीच्या भूमिकेत, पाहू शकू का ? जर डॉ. अब्दुल कलाम यांच्यासारखी तुमची सर्वपक्षांकडून बिनविरोध निवड झाली तर..

नारायण मूर्ती : मी या विषयावर माझं मत देणं योग्य नाही. माझ्यापेक्षा अधिक मोठे, तज्ज्ञ लोक आणि निर्णय घेण्याच्या भूमिकेत असलेले लोक आहेत. म्हणूनच मी यावर माझं मत देणं उचित समजत नाही.

निखिल वागळे : सर, पण सर्वपक्षांनी जर तुम्हाला पाठिंबा दिला तर ? कारण आमच्या सारख्या भारताच्या तरुण जनतेला तुमच्या आणि डॉ. कलाम यांच्या सारखं नेतृत्त्व हवंय आणि तरुण जनता ते नेतृत्त्व तुमच्यात पाहतेय. जर सर्वपक्षांनी तुमचं नाव सुचवलं तर तुम्ही ही ऑफर स्विकारायला तयार आहात का ?

नारायण मूर्ती : नक्कीच हा मी माझा सन्मान समजेन, राष्ट्रासाठी ते मोलाचं योगदान देण्यासारखं आहे. आणि नक्कीच मला खूप आनंद होईल ही जबाबदारी घेताना, पण यावर मी काही बोलणं उचित नाही. आता यावर बोलणं हे आता खूप घाईचं होईल. कारण नव्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी अजून 9 महिन्यांचा कालावधी आहे.

निखिल वागळे : म्हणजे मी असं म्हणू शकतो की तुम्ही जरुर तयार आहात.

नारायण मूर्ती : मी आपल्या देशाला मोलाचं योगदान देण्याची ही संधी समजेन. भारताची पब्लिक हेल्थ फाऊंडेशनचा मी भाग आहे. जी एक मोठी नागरीकांच्या हितासाठी तयार झालेली संस्था आहे. नॅशनल पेमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चं काम. मास्टर कार्ड किंवा विझा च्या धरतीवरचं काम आहे. या दोन्ही संस्थांशी मी जोडलेला आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारची जबाबदारी ही माझ्यासाठी देशाला मोलाचं योगदान देण्याची संधी ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2011 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close