S M L

लाईट येणार, केंद्राकडून मिळाली 700 मेगावॅट वीज !

12 ऑक्टोबरलोडशेडिंग प्रश्नी आज दिल्लीत ऊर्जामंत्री अजित पवार यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे आणि केंद्रीय कोळसा राज्य मंत्री प्रतिक पाटील यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत केंद्राकडून महाराष्ट्राला 700 मेगावॅट वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातली 300 मे.वॉ. वीज आज रात्रीपासून मिळणार आहे तर उरलेली 400 मे वॉ. वीज 18 तारखेनंतर मिळणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केलं. सध्या केवळ केरळकडे वीज उपलब्ध आहे पण ती महाग असल्याने घ्यायची की नाही ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ठरवण्यात येईल असं अजित पवार म्हणाले. शिवाय कोळसा मंत्रालय आता 2 रेक कोळसा देण्यात तयार झालंय त्यामुळे दिवाळीपूर्वी महाराष्ट्रातील वीजेचं संकट टळलेलं असेल असं आश्वासन अजितदादा पवारांनी राज्यातील जनतेला दिलंय. दरम्यान देशातल्या वीजसंकटाला केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कोळसा मंत्रालयाला दोषी ठरवलं आहे. पण सोबतच महाराष्ट्रात येणारी दिवाळी लख्ख उजेडात जाईल असंही त्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना विश्वास व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2011 05:55 PM IST

लाईट येणार, केंद्राकडून मिळाली 700 मेगावॅट वीज !

12 ऑक्टोबर

लोडशेडिंग प्रश्नी आज दिल्लीत ऊर्जामंत्री अजित पवार यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे आणि केंद्रीय कोळसा राज्य मंत्री प्रतिक पाटील यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत केंद्राकडून महाराष्ट्राला 700 मेगावॅट वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातली 300 मे.वॉ. वीज आज रात्रीपासून मिळणार आहे तर उरलेली 400 मे वॉ. वीज 18 तारखेनंतर मिळणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केलं.

सध्या केवळ केरळकडे वीज उपलब्ध आहे पण ती महाग असल्याने घ्यायची की नाही ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ठरवण्यात येईल असं अजित पवार म्हणाले. शिवाय कोळसा मंत्रालय आता 2 रेक कोळसा देण्यात तयार झालंय त्यामुळे दिवाळीपूर्वी महाराष्ट्रातील वीजेचं संकट टळलेलं असेल असं आश्वासन अजितदादा पवारांनी राज्यातील जनतेला दिलंय. दरम्यान देशातल्या वीजसंकटाला केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कोळसा मंत्रालयाला दोषी ठरवलं आहे. पण सोबतच महाराष्ट्रात येणारी दिवाळी लख्ख उजेडात जाईल असंही त्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना विश्वास व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2011 05:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close