S M L

काँग्रेस आणि संघाकडून बदनामीचं षडयंत्र - अण्णा हजारे

13 ऑक्टोबरजेष्ठ समाज सेवक अण्णा हजारेंनी काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांच्या पत्राला उत्तर पत्राने दिलं आहे. यात त्यांनी काँग्रेससह भाजप आणि संघावरही सडकून टीका केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अण्णांच्या आंदोलनाला संघाची साथ असल्याच्या आरोपाला त्यांनी उत्तर दिलंय. आमच्या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सहभागी असल्याचा दावा मोहन भागवत करत असतील तर ते आमची बदनामी करत आहेत. काँग्रेस आणि आरएसएसने माझ्या बदनामीचे षडयंत्र रचला आहे असा आरोप अण्णांनी केला.अण्णांनी काँग्रेसविरोधात प्रचार करण्याचे रणशिंग फुकले आणि काँग्रेसच्या गोठात एकच खळबळ उडाली. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी आघाडी घेत थेट अण्णांवर हल्लाबोल केला. अण्णांच्या आंदोलनामागे संघाचा हात आहे अशा आश्याचे पत्र अण्णांना लिहले. दिग्विजय यांच्या पत्राला उत्तर देत अण्णा म्हणाले की, देशाचा विकास करण्यात काँग्रेस कमी पडतेय. मी फक्त भ्रष्टाचारच नाही तर ग्रामविकासाचाही मुद्दा उचललाय. या दोन्ही गोष्टी साध्य करणं गरजेचं आहे. तरच देशाची प्रगती होईल. आम्ही महाराष्ट्रात राळेगणसिद्धीसारखी अनेक खेडी उभी केलीयत. पण काँग्रेसनं गेल्या 64 वर्षात काय केलं ? सरकारने 2005 मध्ये माहितीचा अधिकार कायदा आणला. पण सरकारनं त्या कायद्याचा आत्माच काढून घेतला होता. आरटीआय कमजोर बनवण्याचे काम सरकारनं केलं होतं. त्यासाठीसुद्धा आम्हाला आळंदीत उपोषण करावं लागलं. त्यानंतरच सरकारनं मूळ कायदा मंजूर केला.भ्रष्टाचाराबाबत सर्वच राजकीय पक्ष एका माळेचे मणी आहेत. आज काँग्रेसमधले कितीतरी मंत्री जेलमध्ये आहेत. भ्रष्टाचारी लोकांबरोबर जायची सरकारला सवयच झालीय. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये फरक तो काय ? सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव आहे. लोकपाल आणण्यासाठी सरकार वचनबद्ध असेल तर जनलोकपाल बिल मंजूर का करत नाही ? असा सवालही अण्णांनी उपस्थित केला.तसेच राळेगणमध्ये लोक पाठवून काही अनुचित प्रकार घडवून आणण्यासंबंधीची माहिती आम्हाला मिळालीय. हे खरं आहे का ? आम्ही आतापर्यंत काही चुकीचं केलं नसल्यामुळे काही हाती लागणार नाही. मनिष तिवारींनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसं करण्याचा त्यांना अधिकार तरी आहे का ? संयुक्त समितीच्या बैठका घेऊन शेवटी सरकारी समितीचा मसुदा संसदेत ठेवला, यात कुठली आलीय सरकारची इमानदारी ? भ्रष्टाचाराच्या बाबतीत भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक नाही. मी जिवंत असेपर्यंत कुठल्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेत सहभागी होणार नाही. मला राष्ट्रपती बनण्याची इच्छा-अभिलाषा नाही. गेल्या 35 वर्षांत काँग्रेसविरोधी आंदोलन केलं नव्हतं. देश भष्टाचारापासून वाचावा म्हणूनच काँग्रेसला मत देऊ नका असं बोलावे लागतंय. असं मत अण्णांनी व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2011 05:24 PM IST

काँग्रेस आणि संघाकडून बदनामीचं षडयंत्र  - अण्णा हजारे

13 ऑक्टोबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारेंनी काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांच्या पत्राला उत्तर पत्राने दिलं आहे. यात त्यांनी काँग्रेससह भाजप आणि संघावरही सडकून टीका केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अण्णांच्या आंदोलनाला संघाची साथ असल्याच्या आरोपाला त्यांनी उत्तर दिलंय. आमच्या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सहभागी असल्याचा दावा मोहन भागवत करत असतील तर ते आमची बदनामी करत आहेत. काँग्रेस आणि आरएसएसने माझ्या बदनामीचे षडयंत्र रचला आहे असा आरोप अण्णांनी केला.

अण्णांनी काँग्रेसविरोधात प्रचार करण्याचे रणशिंग फुकले आणि काँग्रेसच्या गोठात एकच खळबळ उडाली. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी आघाडी घेत थेट अण्णांवर हल्लाबोल केला. अण्णांच्या आंदोलनामागे संघाचा हात आहे अशा आश्याचे पत्र अण्णांना लिहले. दिग्विजय यांच्या पत्राला उत्तर देत अण्णा म्हणाले की, देशाचा विकास करण्यात काँग्रेस कमी पडतेय. मी फक्त भ्रष्टाचारच नाही तर ग्रामविकासाचाही मुद्दा उचललाय. या दोन्ही गोष्टी साध्य करणं गरजेचं आहे. तरच देशाची प्रगती होईल. आम्ही महाराष्ट्रात राळेगणसिद्धीसारखी अनेक खेडी उभी केलीयत. पण काँग्रेसनं गेल्या 64 वर्षात काय केलं ? सरकारने 2005 मध्ये माहितीचा अधिकार कायदा आणला. पण सरकारनं त्या कायद्याचा आत्माच काढून घेतला होता. आरटीआय कमजोर बनवण्याचे काम सरकारनं केलं होतं. त्यासाठीसुद्धा आम्हाला आळंदीत उपोषण करावं लागलं. त्यानंतरच सरकारनं मूळ कायदा मंजूर केला.

भ्रष्टाचाराबाबत सर्वच राजकीय पक्ष एका माळेचे मणी आहेत. आज काँग्रेसमधले कितीतरी मंत्री जेलमध्ये आहेत. भ्रष्टाचारी लोकांबरोबर जायची सरकारला सवयच झालीय. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये फरक तो काय ? सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव आहे. लोकपाल आणण्यासाठी सरकार वचनबद्ध असेल तर जनलोकपाल बिल मंजूर का करत नाही ? असा सवालही अण्णांनी उपस्थित केला.

तसेच राळेगणमध्ये लोक पाठवून काही अनुचित प्रकार घडवून आणण्यासंबंधीची माहिती आम्हाला मिळालीय. हे खरं आहे का ? आम्ही आतापर्यंत काही चुकीचं केलं नसल्यामुळे काही हाती लागणार नाही. मनिष तिवारींनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसं करण्याचा त्यांना अधिकार तरी आहे का ? संयुक्त समितीच्या बैठका घेऊन शेवटी सरकारी समितीचा मसुदा संसदेत ठेवला, यात कुठली आलीय सरकारची इमानदारी ? भ्रष्टाचाराच्या बाबतीत भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक नाही. मी जिवंत असेपर्यंत कुठल्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेत सहभागी होणार नाही. मला राष्ट्रपती बनण्याची इच्छा-अभिलाषा नाही. गेल्या 35 वर्षांत काँग्रेसविरोधी आंदोलन केलं नव्हतं. देश भष्टाचारापासून वाचावा म्हणूनच काँग्रेसला मत देऊ नका असं बोलावे लागतंय. असं मत अण्णांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2011 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close