S M L

मायावतींनी केलं 650 कोटींच्या आंबेडकर पार्कचं थाटात उद्घाटन

14 ऑक्टोबरतब्बल 650 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नोएडातल्या आंबेडकर पार्कचं मायावतींनी थाटात उद्घाटन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काशीराम यांच्यासोबत मायावतींचेही भव्य पुतळे या पार्कमध्ये आहेत. या पार्कचे उद्घाटन करून मायावतींनी येणार्‍या निवडणुकीचे रणशिंग फुकले.उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्या स्वप्नातीलं ड्रीम पार्क. मायावती यांनी नोएडामध्ये शुक्रवारी आपल्या या ड्रीम पार्कचे थाटात उद्घाटन केलं. पार्क जितकं भव्य तितकाच उद्घाटनाचा सोहळाही भव्यदिव्य होता. निळ्या रंगात पार्क न्हाऊन निघालं होतं. हजारो लोक उद्घाटनासाठी हजर होते. त्यांच्या बैठकीची व्यवस्थाही शाही होती. स्वतः मायावतींनी बौद्ध भिक्खंूच्या मंत्रघोषात या पार्कचं उद्घाटन केलं.दलित प्रेरणा स्थळ किंवा आंबेडकर पार्क असं त्याचं नाव आहे. तब्बल 650 कोटी रुपये खर्चून यमुना नदीच्या किनार्‍यावर राजधानी दिल्लीच्या सीमेवरच या भव्य पार्कची निर्मिती करण्यात आली आहेत. या पार्कमध्ये 20 हत्ती आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम आणि स्वतः मायावती यांचे 12 भव्य पुतळे आहेत. 33 एकर जागेवर या ड्रीम पार्कची निर्मिती करण्यात आली. यमुनेच्या किनार्‍यावर पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे पुतळे आहेत. पण, आंबेडकर किंवा काशीराम यांचे पुतळे नाहीत. म्हणूनच ते बांधण्याचा निर्णय घेतला, असं मायावतींनी उद्घाटनावेळी स्पष्ट केलं. हे स्मारक बांधण्यासाठी सरकारने राज्याच्या बजेटच्या केवळ 1 टक्के इतकी रक्कम खर्च केल्याचा दावा त्यांनी केला.तसेच उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर डोळा ठेवत मायावतींनी यावेळी दलित कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला. बहुजन समाज पक्षाचा धसका घेऊन काँग्रेस दलित पंतप्रधान करण्याचा प्रयत्न करेल, असं भाकीत त्यांनी यावेळी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 14, 2011 05:37 PM IST

मायावतींनी केलं 650 कोटींच्या आंबेडकर पार्कचं थाटात उद्घाटन

14 ऑक्टोबर

तब्बल 650 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नोएडातल्या आंबेडकर पार्कचं मायावतींनी थाटात उद्घाटन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काशीराम यांच्यासोबत मायावतींचेही भव्य पुतळे या पार्कमध्ये आहेत. या पार्कचे उद्घाटन करून मायावतींनी येणार्‍या निवडणुकीचे रणशिंग फुकले.उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्या स्वप्नातीलं ड्रीम पार्क. मायावती यांनी नोएडामध्ये शुक्रवारी आपल्या या ड्रीम पार्कचे थाटात उद्घाटन केलं. पार्क जितकं भव्य तितकाच उद्घाटनाचा सोहळाही भव्यदिव्य होता. निळ्या रंगात पार्क न्हाऊन निघालं होतं. हजारो लोक उद्घाटनासाठी हजर होते. त्यांच्या बैठकीची व्यवस्थाही शाही होती. स्वतः मायावतींनी बौद्ध भिक्खंूच्या मंत्रघोषात या पार्कचं उद्घाटन केलं.

दलित प्रेरणा स्थळ किंवा आंबेडकर पार्क असं त्याचं नाव आहे. तब्बल 650 कोटी रुपये खर्चून यमुना नदीच्या किनार्‍यावर राजधानी दिल्लीच्या सीमेवरच या भव्य पार्कची निर्मिती करण्यात आली आहेत. या पार्कमध्ये 20 हत्ती आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम आणि स्वतः मायावती यांचे 12 भव्य पुतळे आहेत. 33 एकर जागेवर या ड्रीम पार्कची निर्मिती करण्यात आली. यमुनेच्या किनार्‍यावर पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे पुतळे आहेत.

पण, आंबेडकर किंवा काशीराम यांचे पुतळे नाहीत. म्हणूनच ते बांधण्याचा निर्णय घेतला, असं मायावतींनी उद्घाटनावेळी स्पष्ट केलं. हे स्मारक बांधण्यासाठी सरकारने राज्याच्या बजेटच्या केवळ 1 टक्के इतकी रक्कम खर्च केल्याचा दावा त्यांनी केला.तसेच उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर डोळा ठेवत मायावतींनी यावेळी दलित कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला. बहुजन समाज पक्षाचा धसका घेऊन काँग्रेस दलित पंतप्रधान करण्याचा प्रयत्न करेल, असं भाकीत त्यांनी यावेळी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2011 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close