S M L

आघाडी टिकवायची की नाही हे एकदा दिल्लीत बसून ठरवा - पिचड

15 ऑक्टोबरलोडशेडिंगच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आता चांगलीचं जुंपली आहे. या आघाडीला आता लोडशेडिंगच्या वादाचा शॉक बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादात आता आणखी भर पडलीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अजित पवारांनी माझं उर्जा खातं काढून घ्या असे उद्गार काढले होतं. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी माणिकराव ठाकरेंवर टीका केली. हे आघाडीचं सरकार टिकवायचं की नाही हे एकदा दिल्लीला विचारून ठरवून टाका, या शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी माणिकराव ठाकरेंवर सडकून टीका केली. माणिकराव ठाकरे यांनी वीजेच्या मुद्द्यावर वक्तव्य करण्याआधी किमान मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्यायला हवं होतं, असं म्हणत ही असली वक्तव्य म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचं पिचड म्हणाले. तसेच लोडशेडिंग हा काही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उभा केलेला प्रश्न नाही, सतत काही ना काही कारणाने राष्ट्रवादीला बदनाम करणं, त्रास देणं थांबवा, असंही पिचड म्हणाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2011 04:48 PM IST

आघाडी टिकवायची की नाही हे एकदा दिल्लीत बसून ठरवा - पिचड

15 ऑक्टोबर

लोडशेडिंगच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आता चांगलीचं जुंपली आहे. या आघाडीला आता लोडशेडिंगच्या वादाचा शॉक बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादात आता आणखी भर पडलीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अजित पवारांनी माझं उर्जा खातं काढून घ्या असे उद्गार काढले होतं. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी माणिकराव ठाकरेंवर टीका केली. हे आघाडीचं सरकार टिकवायचं की नाही हे एकदा दिल्लीला विचारून ठरवून टाका, या शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी माणिकराव ठाकरेंवर सडकून टीका केली. माणिकराव ठाकरे यांनी वीजेच्या मुद्द्यावर वक्तव्य करण्याआधी किमान मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्यायला हवं होतं, असं म्हणत ही असली वक्तव्य म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचं पिचड म्हणाले. तसेच लोडशेडिंग हा काही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उभा केलेला प्रश्न नाही, सतत काही ना काही कारणाने राष्ट्रवादीला बदनाम करणं, त्रास देणं थांबवा, असंही पिचड म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2011 04:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close