S M L

अण्णांच्या मौनव्रताला सुरुवात

16 ऑक्टोबरदिल्लीत जंतरमंतर आणि रामलीला मैदानावर जनलोकपाल विधेयकासाठी यशस्वीपणे लढाई जिंकणार्‍या अण्णांनी आता बेमुदत मौनव्रत सुरू केलं आहे. आज रविवारी ठरल्याप्रमाणे अण्णांने सकाळपासून मौनव्रताला सुरूवात केली. अण्णांचा दिनक्रम कायम आहे. मात्र अण्णांच्या मौनव्रतावर काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. काश्मीर प्रश्नी आणि प्रशांत भूषण यांच्याबद्दल न बोलण्यासाठीचं अण्णांनी मौनव्रत सुरू केल्याचा आरोप दिग्विजय सिंग यांनी केला.टीम अण्णांचे सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे ख्यातनाम वकील प्रशांत भूषण यांना भगतसिंग क्रांतीसेनेच्या तीन कार्यकर्त्यांनी त्यांच्याच चेंबरमध्ये घुसून बेदम मारहाण केली. हे प्रकरण इथंच थांबलं नाही तर दुसर्‍यादिवशी पुन्हा भगतसिंग क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी अण्णा समर्थकांना बेदम चोप दिला. भूषण यांना मारहाण करणार्‍या हल्लेखोरांना दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आले यावेळी कोर्टाबाहेर जमलेले अण्णांना समर्थकांना बेदम मारहाण केली. मात्र याप्रकरणावरून अण्णांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच प्रशांत भूषण यांचे काश्मीर विषयी विधान चुकीचे होते काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग आहे असं स्पष्ट केलं तसेच भूषण यांना टीममध्ये न ठेवण्याचे संकेत दिले. तर टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी भूषण यांचे मत व्यक्तीगत होते त्याचा टीम अण्णांशी कोणताच संबंध नाही असं स्पष्ट सांगितले. पण भूषण टीमसाठी महत्वाचे सदस्य आहे असं स्पष्टपणे सांगितले. टीम अण्णांच्या या मतभेदावरून विरोधकांनीही चांगलाच हल्ला चढवला. दिग्विजय सिंग यांनी अण्णांच्या आंदोलनात संघाचा हात होता असा गंभीर आरोप केला. आणि आजही अण्णांच्या मौनव्रतावर प्रश्नचिन्ह निर्माण केला. अण्णा येडियुरप्पा आणि काश्मीर प्रश्नाबद्दल बोलणं टाळण्यासाठीच मौनव्रत धारण करत आहे असा आरोप त्यांनी केला. गुजरातमध्ये लोकायुक्तांची नियुक्ती न करणार्‍या नरेंद्र मोदींविरोधात अण्णा का बोलत नाहीत असा प्रश्नही त्यांनी विचारला. तर अण्णांनी हे मौनव्रत कोणत्याही पक्षाविरोधात नाही असं स्पष्ट सांगितले. आपण हे आत्मशांती आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी मौनव्रत करणार असल्याचंही अण्णांनी सांगितलं. आता अण्णा आपलं मौनव्रत कधी सोडणार आणि काय नेमका काय खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 16, 2011 05:17 PM IST

अण्णांच्या मौनव्रताला सुरुवात

16 ऑक्टोबर

दिल्लीत जंतरमंतर आणि रामलीला मैदानावर जनलोकपाल विधेयकासाठी यशस्वीपणे लढाई जिंकणार्‍या अण्णांनी आता बेमुदत मौनव्रत सुरू केलं आहे. आज रविवारी ठरल्याप्रमाणे अण्णांने सकाळपासून मौनव्रताला सुरूवात केली. अण्णांचा दिनक्रम कायम आहे. मात्र अण्णांच्या मौनव्रतावर काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. काश्मीर प्रश्नी आणि प्रशांत भूषण यांच्याबद्दल न बोलण्यासाठीचं अण्णांनी मौनव्रत सुरू केल्याचा आरोप दिग्विजय सिंग यांनी केला.

टीम अण्णांचे सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे ख्यातनाम वकील प्रशांत भूषण यांना भगतसिंग क्रांतीसेनेच्या तीन कार्यकर्त्यांनी त्यांच्याच चेंबरमध्ये घुसून बेदम मारहाण केली. हे प्रकरण इथंच थांबलं नाही तर दुसर्‍यादिवशी पुन्हा भगतसिंग क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी अण्णा समर्थकांना बेदम चोप दिला. भूषण यांना मारहाण करणार्‍या हल्लेखोरांना दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आले यावेळी कोर्टाबाहेर जमलेले अण्णांना समर्थकांना बेदम मारहाण केली.

मात्र याप्रकरणावरून अण्णांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच प्रशांत भूषण यांचे काश्मीर विषयी विधान चुकीचे होते काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग आहे असं स्पष्ट केलं तसेच भूषण यांना टीममध्ये न ठेवण्याचे संकेत दिले. तर टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी भूषण यांचे मत व्यक्तीगत होते त्याचा टीम अण्णांशी कोणताच संबंध नाही असं स्पष्ट सांगितले. पण भूषण टीमसाठी महत्वाचे सदस्य आहे असं स्पष्टपणे सांगितले. टीम अण्णांच्या या मतभेदावरून विरोधकांनीही चांगलाच हल्ला चढवला.

दिग्विजय सिंग यांनी अण्णांच्या आंदोलनात संघाचा हात होता असा गंभीर आरोप केला. आणि आजही अण्णांच्या मौनव्रतावर प्रश्नचिन्ह निर्माण केला. अण्णा येडियुरप्पा आणि काश्मीर प्रश्नाबद्दल बोलणं टाळण्यासाठीच मौनव्रत धारण करत आहे असा आरोप त्यांनी केला. गुजरातमध्ये लोकायुक्तांची नियुक्ती न करणार्‍या नरेंद्र मोदींविरोधात अण्णा का बोलत नाहीत असा प्रश्नही त्यांनी विचारला. तर अण्णांनी हे मौनव्रत कोणत्याही पक्षाविरोधात नाही असं स्पष्ट सांगितले. आपण हे आत्मशांती आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी मौनव्रत करणार असल्याचंही अण्णांनी सांगितलं. आता अण्णा आपलं मौनव्रत कधी सोडणार आणि काय नेमका काय खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2011 05:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close