S M L

हिसारचा पराभवातून काँग्रेसने धडा घ्यावा - अण्णा हजारे

17 ऑक्टोबरहिसारचा पराभव काँग्रेसने समजून घ्यावा आणि हिवाळी अधिवेशनात लोकपाल विधेयक आणावे नाही तर येणार्‍या 5 राज्याच्या निवडणुकीत टीम अण्णा काँग्रेसविरुध्द प्रचार करेल. त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे अशी प्रतिक्रिया अण्णांनी लेखी दिली. जर लढण्याची वेळ आल्यास पुन्हा लढेल असंही अण्णांनी स्पष्ट केलं. पत्रकार राजू परुळेकर यांनी अण्णांच्या वतीने ही प्रतिक्रिया व्यक्त केली.जनलोकपाल विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करा अन्यथा ज्या ठिकाणी निवडणुका होतील तिथे काँग्रेस विरोधात प्रचार करणार इशारा देत टीम अण्णांनी हिसार निवडणुकीत काँग्रेसविरोधात जोरदार प्रचार केला. त्यांचं फलीत आज निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला जोरदार फटका बसला आहे. भाजपसोबत आघाडीत असलेल्या जनहित काँग्रेसचे कुलदीप बिश्नोई यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर इंडियन नॅशनल लोकदलाचे अजयसिंह चौटाला दुसर्‍या क्रमांकावर तर काँग्रेसचे जयप्रकाश तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं आहे. आज राळेगणसिध्दीत अण्णांच्या मौनव्रताचा दुसरा दिवस आहे. अण्णांनी आपले सहकारी राजू परूळेकर यांच्याकडे आपली लेखी प्रतिक्रिया दिली. यामध्ये हिसारचा पराभव काँग्रेसने समजून घ्यावा आणि हिवाळी अधिवेशनात लोकपाल विधेयक आणावे नाही तर येणार्‍या 5 राज्याच्या निवडणुकीत टीम अण्णा काँग्रेसविरुध्द प्रचार करेल. त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे, जर लढण्याची वेळ आल्यास पुन्हा लढेल अशी प्रतिक्रिया अण्णांनी लेखी दिली. अण्णा म्हणतात...'हा पराभव काँग्रेसला धडा असून वेळीच धडा घेतला नाही, तर देशभर काँग्रेसची अशीच अवस्था होईल. या पराभवाबद्दल काँग्रेसनं टीम अण्णांना दोष न देता हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल विधेयक आणावं. हिस्सार पोटनिवडणुकीत टीम अण्णांचे सदस्य गेले होते. मात्र काँग्रेसची अशीच भूमिका राहिली तर येणार्‍या विधानसभा निवडणुकीत मी स्वत:प्रचाराला जाईन. टीम अण्णांमध्ये फूट पाडण्याचे कोणतेही प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.'

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2011 10:40 AM IST

हिसारचा पराभवातून काँग्रेसने धडा घ्यावा - अण्णा हजारे

17 ऑक्टोबर

हिसारचा पराभव काँग्रेसने समजून घ्यावा आणि हिवाळी अधिवेशनात लोकपाल विधेयक आणावे नाही तर येणार्‍या 5 राज्याच्या निवडणुकीत टीम अण्णा काँग्रेसविरुध्द प्रचार करेल. त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे अशी प्रतिक्रिया अण्णांनी लेखी दिली. जर लढण्याची वेळ आल्यास पुन्हा लढेल असंही अण्णांनी स्पष्ट केलं. पत्रकार राजू परुळेकर यांनी अण्णांच्या वतीने ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

जनलोकपाल विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करा अन्यथा ज्या ठिकाणी निवडणुका होतील तिथे काँग्रेस विरोधात प्रचार करणार इशारा देत टीम अण्णांनी हिसार निवडणुकीत काँग्रेसविरोधात जोरदार प्रचार केला. त्यांचं फलीत आज निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला जोरदार फटका बसला आहे. भाजपसोबत आघाडीत असलेल्या जनहित काँग्रेसचे कुलदीप बिश्नोई यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर इंडियन नॅशनल लोकदलाचे अजयसिंह चौटाला दुसर्‍या क्रमांकावर तर काँग्रेसचे जयप्रकाश तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं आहे.

आज राळेगणसिध्दीत अण्णांच्या मौनव्रताचा दुसरा दिवस आहे. अण्णांनी आपले सहकारी राजू परूळेकर यांच्याकडे आपली लेखी प्रतिक्रिया दिली. यामध्ये हिसारचा पराभव काँग्रेसने समजून घ्यावा आणि हिवाळी अधिवेशनात लोकपाल विधेयक आणावे नाही तर येणार्‍या 5 राज्याच्या निवडणुकीत टीम अण्णा काँग्रेसविरुध्द प्रचार करेल. त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे, जर लढण्याची वेळ आल्यास पुन्हा लढेल अशी प्रतिक्रिया अण्णांनी लेखी दिली.

अण्णा म्हणतात...

'हा पराभव काँग्रेसला धडा असून वेळीच धडा घेतला नाही, तर देशभर काँग्रेसची अशीच अवस्था होईल. या पराभवाबद्दल काँग्रेसनं टीम अण्णांना दोष न देता हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल विधेयक आणावं. हिस्सार पोटनिवडणुकीत टीम अण्णांचे सदस्य गेले होते. मात्र काँग्रेसची अशीच भूमिका राहिली तर येणार्‍या विधानसभा निवडणुकीत मी स्वत:प्रचाराला जाईन. टीम अण्णांमध्ये फूट पाडण्याचे कोणतेही प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2011 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close