S M L

अर्थव्यवस्थेला बनावट नोटांचा सुरूंग !

सुमन चक्रवर्ती, नवी दिल्ली19 ऑक्टोबरभारतीय अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊदची गँग करत आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) ची या गँगला छुपी मदत आहे. अब्जावधी रुपयांचं बनावट चलन भारतीय बाजारात पाठवलं जातंय. हैदराबाद हे या बनावट चलनाचं मुख्य केंद्र बनलं आहे. दुबई, शारजाह आणि अबू धाबीहून बनावट नोटा हैदराबादला पाठवल्या जातात अशी डीआरआय म्हणजेच डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सची माहिती आहे. 2010 मध्ये जप्त केलेल्या बनावट नोटांची किंमत तब्बल 27 कोटी रुपये आहे. पण हा आकडा 25 पट जास्त असावा असा केंद्रीय गृहमंत्रालयाला संशय आहे. म्हणजेच तब्बल 650 कोटींचं बनावट चलन कोणताही थांगपत्ता न लागता भारतात आलं आहे. खर्‍या चलनात आणि बनावट चलनातला तुम्ही फरक ओळखू शकता का ? अनेकवेळा नाहीच. कारण बनावट भारतीय चलन भारतीय बाजारपठेत मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. आणि त्याचा शोध घेणं कठीण आहे. याचा सूत्रधार आहे, भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम. पाकिस्तानच्या आयएसआयशी हातमिळवणी करून तो 1990 पासून हे काम करतोय. सुरुवातीला बनावट नोटांचे नेपाळमार्गे भारतात स्मगलिंग होत होतं. आणि त्याची जबाबदारी होती सलीममियाँ अन्सारीकडे. नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र यांच्या कार्यकाळातल्या मंत्रिमंडळात तो मंत्री होता. पण आता हे काम दाऊदच्या दोन महत्त्वाच्या सहकार्‍यांनी हाती घेतलं आहे. अफ्ताब भट्की पुर्वी हा मुंबईत राहायचा तर दुसरा बाबू गैठाण हा मूळचा हैदराबादचा पण सध्या हे दोघेही दुबईत राहतात. दुबईहून येणार्‍या बनावट भारतीय नोटांच्या व्यवहाराचे आता हैदराबाद हे केंद्र बनलंय. इथून देशभरात या नोटा पाठवल्या जातात.रॉचे माजी प्रमुख ए. के. वर्मा म्हणतात, भारतात बनावट नोटा पाठवणं पाकिस्तानसारख्या देशाला अवघड नाही. कारण पाकिस्तान स्वतःच या नोटा छापतंय.केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार बनावट नोटांच्या तस्करीचा सर्वात पसंतीचा मार्ग आहे विमान वाहतूक. दुबई, शारजाह आणि अबू धाबीहून बनावट नोटा मुख्यतः हैदराबादला पाठवल्या जातात, अशी डीआरआय म्हणजेच डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सची माहिती आहे. नव्या मोडस ऑपरेंडीनुसार या कामासाठी दुबईतल्या भारतीय मजुरांची निवड केली जाते. त्यांचं भारताचं परतीचं तिकीट काढलं जातं. त्यांच्याकडे परफ्युम्स आणि कपडे असलेल्या सुटकेस दिल्या जातात. या सुटकेसमध्ये असलेल्या गुप्त कप्प्यांमध्ये कार्बन कागदात बनावट नोटा गुंडाळलेल्या असतात.गुप्तचर संस्थांनी दुसर्‍या एका मार्गाचा छडा लावलाय. पहिल्यांदा बनावट नोटा दुबईहून कोलंबोला पाठवल्या जातात. त्यानंतर एखादा एजंट कालिकत किंवा चेन्नईहून कोलंबोला जातो. बनावट नोटा ताब्यात घेतो आणि भारतात परततो.डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटिलेजन्सने 2008-2009 मध्ये अडीच कोटींचे बनावट चलन जप्त केलं होतं. 2010 मध्ये जप्त जप्त केलेल्या चलनाची किंमत तब्बल 27 कोटी रुपये आहे. पण हा आकडा 25 पट जास्त असावा असा केंद्रीय गृहमंत्रालयाला संशय आहे. म्हणजेच तब्बल 650 कोटींचे बनावट चलन कोणताही थांगपत्ता न लागता भारतात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 19, 2011 01:01 PM IST

अर्थव्यवस्थेला बनावट नोटांचा सुरूंग !

सुमन चक्रवर्ती, नवी दिल्ली

19 ऑक्टोबर

भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊदची गँग करत आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) ची या गँगला छुपी मदत आहे. अब्जावधी रुपयांचं बनावट चलन भारतीय बाजारात पाठवलं जातंय. हैदराबाद हे या बनावट चलनाचं मुख्य केंद्र बनलं आहे. दुबई, शारजाह आणि अबू धाबीहून बनावट नोटा हैदराबादला पाठवल्या जातात अशी डीआरआय म्हणजेच डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सची माहिती आहे. 2010 मध्ये जप्त केलेल्या बनावट नोटांची किंमत तब्बल 27 कोटी रुपये आहे. पण हा आकडा 25 पट जास्त असावा असा केंद्रीय गृहमंत्रालयाला संशय आहे. म्हणजेच तब्बल 650 कोटींचं बनावट चलन कोणताही थांगपत्ता न लागता भारतात आलं आहे.

खर्‍या चलनात आणि बनावट चलनातला तुम्ही फरक ओळखू शकता का ? अनेकवेळा नाहीच. कारण बनावट भारतीय चलन भारतीय बाजारपठेत मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. आणि त्याचा शोध घेणं कठीण आहे. याचा सूत्रधार आहे, भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम. पाकिस्तानच्या आयएसआयशी हातमिळवणी करून तो 1990 पासून हे काम करतोय. सुरुवातीला बनावट नोटांचे नेपाळमार्गे भारतात स्मगलिंग होत होतं. आणि त्याची जबाबदारी होती सलीममियाँ अन्सारीकडे. नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र यांच्या कार्यकाळातल्या मंत्रिमंडळात तो मंत्री होता. पण आता हे काम दाऊदच्या दोन महत्त्वाच्या सहकार्‍यांनी हाती घेतलं आहे.

अफ्ताब भट्की पुर्वी हा मुंबईत राहायचा तर दुसरा बाबू गैठाण हा मूळचा हैदराबादचा पण सध्या हे दोघेही दुबईत राहतात. दुबईहून येणार्‍या बनावट भारतीय नोटांच्या व्यवहाराचे आता हैदराबाद हे केंद्र बनलंय. इथून देशभरात या नोटा पाठवल्या जातात.रॉचे माजी प्रमुख ए. के. वर्मा म्हणतात, भारतात बनावट नोटा पाठवणं पाकिस्तानसारख्या देशाला अवघड नाही. कारण पाकिस्तान स्वतःच या नोटा छापतंय.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार बनावट नोटांच्या तस्करीचा सर्वात पसंतीचा मार्ग आहे विमान वाहतूक. दुबई, शारजाह आणि अबू धाबीहून बनावट नोटा मुख्यतः हैदराबादला पाठवल्या जातात, अशी डीआरआय म्हणजेच डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सची माहिती आहे.

नव्या मोडस ऑपरेंडीनुसार या कामासाठी दुबईतल्या भारतीय मजुरांची निवड केली जाते. त्यांचं भारताचं परतीचं तिकीट काढलं जातं. त्यांच्याकडे परफ्युम्स आणि कपडे असलेल्या सुटकेस दिल्या जातात. या सुटकेसमध्ये असलेल्या गुप्त कप्प्यांमध्ये कार्बन कागदात बनावट नोटा गुंडाळलेल्या असतात.

गुप्तचर संस्थांनी दुसर्‍या एका मार्गाचा छडा लावलाय. पहिल्यांदा बनावट नोटा दुबईहून कोलंबोला पाठवल्या जातात. त्यानंतर एखादा एजंट कालिकत किंवा चेन्नईहून कोलंबोला जातो. बनावट नोटा ताब्यात घेतो आणि भारतात परततो.

डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटिलेजन्सने 2008-2009 मध्ये अडीच कोटींचे बनावट चलन जप्त केलं होतं. 2010 मध्ये जप्त जप्त केलेल्या चलनाची किंमत तब्बल 27 कोटी रुपये आहे. पण हा आकडा 25 पट जास्त असावा असा केंद्रीय गृहमंत्रालयाला संशय आहे. म्हणजेच तब्बल 650 कोटींचे बनावट चलन कोणताही थांगपत्ता न लागता भारतात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2011 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close