S M L

नाशिक पालिकेने केली आचारसंहिता भंग !

20 ऑक्टोबरनाशिक महापालिकेने आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार विरोधकांनी केली आहे. नाशिक महापालिकेचा कॅश क्रेडिटचा निर्णय निवडणूक आयोगाच्या आदेशाचा भंग करणारा असल्याची तक्रार विरोधक करत आहेत. दिडशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्याच्या प्रस्तावाला नाशिकच्या महापौरांनी मंजुरी दिली. कमाई अठन्नी, खर्चा रुपय्या अशा अवस्थेत डबघाईला आलेल्या महापालिकेला सावरण्याचा हा देखावा असल्याची विरोधकांची तक्रार आहे. विशेष म्हणजे मतदारांवर प्रभाव पडेल असे धोरणात्मक व महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत या निवडणूक आयोगाच्या आदेशाचे यात उल्लंघन करण्यात आल्याचं विरोधकांचे म्हणणं आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात नगरसेवक राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2011 12:52 PM IST

नाशिक पालिकेने केली आचारसंहिता भंग !

20 ऑक्टोबर

नाशिक महापालिकेने आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार विरोधकांनी केली आहे. नाशिक महापालिकेचा कॅश क्रेडिटचा निर्णय निवडणूक आयोगाच्या आदेशाचा भंग करणारा असल्याची तक्रार विरोधक करत आहेत. दिडशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्याच्या प्रस्तावाला नाशिकच्या महापौरांनी मंजुरी दिली. कमाई अठन्नी, खर्चा रुपय्या अशा अवस्थेत डबघाईला आलेल्या महापालिकेला सावरण्याचा हा देखावा असल्याची विरोधकांची तक्रार आहे. विशेष म्हणजे मतदारांवर प्रभाव पडेल असे धोरणात्मक व महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत या निवडणूक आयोगाच्या आदेशाचे यात उल्लंघन करण्यात आल्याचं विरोधकांचे म्हणणं आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात नगरसेवक राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2011 12:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close