S M L

हेडलीच्या चौकशीचे व्हिडिओ एफबीआयने केले प्रसिद्ध

20 ऑक्टोबरडेव्हिड कोलमन हेडली याच्या चौकशीच्या टेप एफबीआयने (FBI)मीडियासाठी खुल्या केल्या आहे. 26/11 मुंबई हल्याप्रकरणी हेडलीवर सध्या शिकागो कोर्टात खटला सुरु आहे. पण आता पहिल्यांदाच हेडलीच्या टेप मीडियासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. फेडरल कोर्टाच्या न्यायाधीशांच्या निर्णयानंतर हे व्हिडिओ उपलब्ध करण्यात आलेत. पण यामध्ये हेडलीच्या चौकशीचे काहीच भाग या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. या टेपमध्ये हेडलीची चौकशी सुरु असताना तो काय बोलतोय ते ही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. मला जे माहिती आहे ते मी सांगितलं आहे. अस तो या व्हिडिओमध्ये म्हणतो. अमेरिकन मीडियाने हेडलीच्या व्हिडिओ टेप्स उपलब्ध करुन देण्याची विनंती कोर्टाला केली होती. या विनंती नंतर न्यायाधीशांनी हे निर्देश दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2011 01:12 PM IST

हेडलीच्या चौकशीचे व्हिडिओ एफबीआयने केले प्रसिद्ध

20 ऑक्टोबर

डेव्हिड कोलमन हेडली याच्या चौकशीच्या टेप एफबीआयने (FBI)मीडियासाठी खुल्या केल्या आहे. 26/11 मुंबई हल्याप्रकरणी हेडलीवर सध्या शिकागो कोर्टात खटला सुरु आहे. पण आता पहिल्यांदाच हेडलीच्या टेप मीडियासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. फेडरल कोर्टाच्या न्यायाधीशांच्या निर्णयानंतर हे व्हिडिओ उपलब्ध करण्यात आलेत. पण यामध्ये हेडलीच्या चौकशीचे काहीच भाग या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. या टेपमध्ये हेडलीची चौकशी सुरु असताना तो काय बोलतोय ते ही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. मला जे माहिती आहे ते मी सांगितलं आहे. अस तो या व्हिडिओमध्ये म्हणतो. अमेरिकन मीडियाने हेडलीच्या व्हिडिओ टेप्स उपलब्ध करुन देण्याची विनंती कोर्टाला केली होती. या विनंती नंतर न्यायाधीशांनी हे निर्देश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2011 01:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close