S M L

मालेगाव स्फोटातील आरोपींसाठी हिंदू महासभा सरसावली

निरंजन टकले/ आशिष दीक्षित 18 नोव्हेंबर, दिल्ली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना कायदेशीर मदत देण्यासाठी लागणारा पैसा उभा करता यावा, म्हणून हिंदू महासभा आणि काही वकिलांनी दिल्लीतल्या कोटक महिंद्रा बँकेत एक खातं उघडलंय. बाटला हाऊस प्रकरणातील आरोपींना कित्येकांनी कायदेशीर मदत देऊ केली होती. त्याला विरोध करणार्‍या हिंदुत्त्ववादी संघटना आता स्वतः मात्र प्रज्ञा सिंगसाठी तेच करताना दिसत आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिला कायदेशीर मदत करण्यासाठी अभिनव भारत, शिवसेनेच्या पाठोपाठ आता हिंदू महासभाही सरसावली आहे. प्रज्ञासिंग आणि तिच्यासारख्या अन्य हिंदू आरोपींना कायदेशीर मदत करण्यासाठी त्यांनी ' हमलॉ ' ही लिगल फर्म सुरू केली आहे. 'आम्ही साध्वीला कायदेशीर मदत करायला तयार आहोत. कोणीही पुढे आलं तर एकही पैसा न घेता आम्ही ही केस लढवू', असं ' हमलॉ' चे प्रोप्रायटर अ‍ॅडव्होकेट भूपेश दयाल यांनी सांगितलं. ' इतिहास साक्षीला आहे, हिंदू कधीच हिंसा करू शकत नाही, असं हिंदू महासभाचे राष्ट्रीय सरचिटणीस संदीप कालिया सांगत होते. ' हमलॉ ' ही बिगर सरकारी संस्था चालवायला पैसा मिळावा, म्हणून अ‍ॅड. भूपेश दयाल यांनी दिल्लीतल्या बँकेत एक खातं उघडलंय. साध्वी प्रज्ञासिंगला मदत करायची असेल तर या खात्यात पैसे जमा करा, असं आवाहन ते करणार आहेत. बाटला हाऊस प्रकरणात आरोपींना जामिया विद्यापीठाने कायदेशीर मदत देऊ केली होती. त्याला विरोध करणारे स्वत: त्याच मार्गाने जात आहेत.शिवसेना, अभिनव भारत, हिंदू महासभा यासारख्या कितीतरी जणांनी प्रज्ञासिंगला कायदेशीर किंवा आर्थिक मदत जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात प्रज्ञापर्यंत कोणतीही मदत पोहचली नसल्याचं प्रज्ञाची बहीण प्रतिभा झा यांनी आयबीएन लोकमतला सांगितलं.साध्वीच्या नावाचा राजकीय फायदा घेणारे लोक अजुनही साध्वीपर्यंत पोहचले नाहीत. त्यामुळे तिच्या नावावर गोळा होणारा पैसा तरी तिच्यापर्यंत पोहचेल का, अशी शंका निर्माण होतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2008 06:42 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2008 06:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close