S M L

नाशिकामध्ये स्फोटांना कारणीभूत फटाक्यांचे दुकान सुरूच

21 ऑक्टोबरनाशिकमध्ये सप्तश्रृंगी अपार्टमेंटमधील स्फोटाला कारणीभूत ठरलेल्या गुरनानी कुटुंबाचं फटाक्यांचं दुकान आजही भर वस्तीत बिनदिक्कतपणे सुरू आहे. चार महिन्यांपूर्वी 8 जूनला पंचवटीतल्या सप्तश्रृंगी अपार्टमेंटमध्ये फटाक्यांच्या दारुच्या बेकायदेशीर दुकानात भीषण स्फोट झाला होता. त्यात तिघेजण ठार झाले. या फटाक्याच्या दुकानाचे मालक, मनोहर गुरनानी हे देखील यामध्ये ठार झाले. पण अजूनही दुकानाचं लायसन्स त्यांच्याच नावावर आहे. आणि गुरनानी कुटुंब हे दुकान चालवतंय. सहाजण जखमी झाले तर इमारतीच्या झालेल्या नुकसानामुळे 15 कुटुंब रस्त्यावर आली. पण या स्फोटामधला मुख्य संशयित आरोपी गुरनानीचं जॉनी फायर्स हे फटाक्यांचं दुकान आजही रविवार शहरातील कारंज्यावरच्या भर वस्तीत सुरू आहे. दुसरीकडे या स्फोटामुळे रस्त्यावर आलेल्या 15 कुटुंबांची दिवाळी मात्र दु:खात जातेय. गुरनानींचा परवाना रद्द करण्याबाबत पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी एकमेकांवर बोट दाखवत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2011 03:00 PM IST

नाशिकामध्ये स्फोटांना कारणीभूत फटाक्यांचे दुकान सुरूच

21 ऑक्टोबर

नाशिकमध्ये सप्तश्रृंगी अपार्टमेंटमधील स्फोटाला कारणीभूत ठरलेल्या गुरनानी कुटुंबाचं फटाक्यांचं दुकान आजही भर वस्तीत बिनदिक्कतपणे सुरू आहे. चार महिन्यांपूर्वी 8 जूनला पंचवटीतल्या सप्तश्रृंगी अपार्टमेंटमध्ये फटाक्यांच्या दारुच्या बेकायदेशीर दुकानात भीषण स्फोट झाला होता. त्यात तिघेजण ठार झाले. या फटाक्याच्या दुकानाचे मालक, मनोहर गुरनानी हे देखील यामध्ये ठार झाले. पण अजूनही दुकानाचं लायसन्स त्यांच्याच नावावर आहे. आणि गुरनानी कुटुंब हे दुकान चालवतंय. सहाजण जखमी झाले तर इमारतीच्या झालेल्या नुकसानामुळे 15 कुटुंब रस्त्यावर आली. पण या स्फोटामधला मुख्य संशयित आरोपी गुरनानीचं जॉनी फायर्स हे फटाक्यांचं दुकान आजही रविवार शहरातील कारंज्यावरच्या भर वस्तीत सुरू आहे. दुसरीकडे या स्फोटामुळे रस्त्यावर आलेल्या 15 कुटुंबांची दिवाळी मात्र दु:खात जातेय. गुरनानींचा परवाना रद्द करण्याबाबत पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी एकमेकांवर बोट दाखवत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2011 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close