S M L

राज्य श्रीमंत, लोकं उपाशी !

21 ऑक्टोबरमानवी विकास अहवाल 2011 आज सादर करण्यात आला. यात दिलेल्या आकडेवारीवरून आर्थिक विकासाचा कुपोषण कमी होण्याशी काही संबंध नाही असं दिसतंय. गुजरातसारख्या औद्योगिक राज्याचा झपाट्यानं विकास झाला असला तरी भूक निर्देशांकात त्याचा तेरावा नंबर लागतो. म्हणजे कुपोषणाच्या बाबतीत गुजरातची स्थिती ओरिसा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आसामसारख्या तुलनेने गरीब राज्यांपेक्षाही वाईट आहे. पंजाब आणि केरळमध्ये देशात सगळ्यात कमी कुपोषण आहे. तर झारखंड आणि मध्यप्रदेशात सगळ्यात जास्त लोक उपाशी आहेत. कमी जन्मदर आणि कमी वजनाच्या मुलांच्या बाबतीत भारताची स्थिती सार्क देशांमध्ये आणि ब्रिक देशांमध्ये सगळ्यांत वाईट आहे, असंही या अहवालात सांगण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2011 05:16 PM IST

राज्य श्रीमंत, लोकं उपाशी !

21 ऑक्टोबर

मानवी विकास अहवाल 2011 आज सादर करण्यात आला. यात दिलेल्या आकडेवारीवरून आर्थिक विकासाचा कुपोषण कमी होण्याशी काही संबंध नाही असं दिसतंय. गुजरातसारख्या औद्योगिक राज्याचा झपाट्यानं विकास झाला असला तरी भूक निर्देशांकात त्याचा तेरावा नंबर लागतो. म्हणजे कुपोषणाच्या बाबतीत गुजरातची स्थिती ओरिसा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आसामसारख्या तुलनेने गरीब राज्यांपेक्षाही वाईट आहे. पंजाब आणि केरळमध्ये देशात सगळ्यात कमी कुपोषण आहे. तर झारखंड आणि मध्यप्रदेशात सगळ्यात जास्त लोक उपाशी आहेत. कमी जन्मदर आणि कमी वजनाच्या मुलांच्या बाबतीत भारताची स्थिती सार्क देशांमध्ये आणि ब्रिक देशांमध्ये सगळ्यांत वाईट आहे, असंही या अहवालात सांगण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2011 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close