S M L

टीम इंडियाची विजयी दिवाळी भेट

24 ऑक्टोबरमुंबई वन डेत इंग्लंडचा धुव्वा उडवत भारतीय टीमने देशवासीयांना विजयाची दिवाळी भेट दिली. चौथ्या वन डेत भारताने इंग्लंडवर 6 विकेट राखून मात केली आणि सीरिजमध्येही विजयाचा चौकार मारला. भारताच्या दमदार बॉलिंगसमोर पहिली बॅटिंग करणार्‍या इंग्लंडची टीम 220 रन्सवर ऑलआऊट झाली. आर अश्विन आणि वन डेत पदार्पण करणार्‍या वरुन ऍरॉननं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. विजयाचे हे आव्हान भारताने 6 विकेट आणि तब्बल 10 ओव्हर राखून पार केलं. भारताची सुरुवात खराब झाली. पार्थिव पटेल आणि गौतम गंभीर झटपट आऊट झाले. तर अजिंक्य रहाणेलाही मोठी खेळी करता आली नाही. पण सुरैश रैना आणि विराट कोहलीने चौथ्या विकेटसाठी 131 रन्सची पार्टनरशिप करत विजयाचा पाया रचला. रैना 80 रन्स करुन आऊट झाला. यानंतर कोहली आणि कॅप्टन धोणीनं फटकेबाजी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. कोहली 86 रन्सवर नॉटआऊट राहिला. आता भारत आणि इंग्लंडदरम्याची पाचवी आणि शेवटची वन डे मॅच येत्या 25 तारखेला कोलकाता रंगणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2011 12:44 PM IST

टीम इंडियाची विजयी दिवाळी भेट

24 ऑक्टोबर

मुंबई वन डेत इंग्लंडचा धुव्वा उडवत भारतीय टीमने देशवासीयांना विजयाची दिवाळी भेट दिली. चौथ्या वन डेत भारताने इंग्लंडवर 6 विकेट राखून मात केली आणि सीरिजमध्येही विजयाचा चौकार मारला. भारताच्या दमदार बॉलिंगसमोर पहिली बॅटिंग करणार्‍या इंग्लंडची टीम 220 रन्सवर ऑलआऊट झाली. आर अश्विन आणि वन डेत पदार्पण करणार्‍या वरुन ऍरॉननं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. विजयाचे हे आव्हान भारताने 6 विकेट आणि तब्बल 10 ओव्हर राखून पार केलं. भारताची सुरुवात खराब झाली. पार्थिव पटेल आणि गौतम गंभीर झटपट आऊट झाले. तर अजिंक्य रहाणेलाही मोठी खेळी करता आली नाही. पण सुरैश रैना आणि विराट कोहलीने चौथ्या विकेटसाठी 131 रन्सची पार्टनरशिप करत विजयाचा पाया रचला. रैना 80 रन्स करुन आऊट झाला. यानंतर कोहली आणि कॅप्टन धोणीनं फटकेबाजी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. कोहली 86 रन्सवर नॉटआऊट राहिला. आता भारत आणि इंग्लंडदरम्याची पाचवी आणि शेवटची वन डे मॅच येत्या 25 तारखेला कोलकाता रंगणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2011 12:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close