S M L

'बच्चे में है दम..';भ्रष्टाचाराविरोधात 14 वर्षांच्या आदित्यचा ई-लढा

25 ऑक्टोबरअण्णांच्या आंदोलनात तरूणांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्सफूर्त सहभाग होता आता याच आंदोलनातून स्फूर्ती घेऊन पुण्यातील अभिनव इंग्लिश शाळेत 10 वीत शिकत असलेल्या आदित्य पळनीटकर या अवघ्या 14 वर्षाच्या विद्यार्थ्याने भ्रष्टाचाराच्या विरोधात वेबसाईट लाँच केली आहे. www.corruptionfree.in असं या वेबसाईटचं नाव असून या वेबसाईटचं वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल फोन, इमेल तसेच ट्विटरवरून भ्रष्टाचारासंबंधी माहिती पाठवता येते. या वेबसाईटला प्रचंड प्रतिसाद मिळतोय, गेल्या 15 दिवसात देशाविदेशातील 30 हजार लोकांनी या वेबसाईटला भेट दिली. तसेच लोक उत्स्फूर्तपणे भ्रष्टाचाराचे त्यांना आलेले अनुभव, रिपोर्टस पाठवत आहे. आज समाजात भ्रष्टाचार माजला असताना एका शाळकरी विद्यार्थ्याने या विरोधात उचललेलं हे आश्वासक पाऊल आहे.आदित्य पळनीटकर हा पुण्यातील सेनापती बापट रोडवर राहणारा 10 व्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी आहेत. एका स्पर्धेत भाग घेतल्यानंतर आदित्यने विषय निवडला होता भ्रष्टाचाराविरोधातील लढाई.. अण्णा हजारेच्या आंदोलनामुळे भारावलेल्या आदित्यच्या मनात मग ठिणगी पेटली की आपण करप्शनविरोधात काही कृती करावी आणि साकारली एक आगळीवेगळी वेबसाईट. पुणे, मुंबई- बेंगलुरू,कोलकाता यासारख्या देशातील 6 प्रमुख शहरांसाठी खास लिंक्स आहेत तर संपूर्ण देशभरातील नागरिकांकरताही वेगळा पर्याय उपलब्ध आहे.जर कुणा नागरिकाला आपली ओळख उघड करायची नसेल तर तीही काळजी ही वेबसाईट घेते. हे रिपोर्टस मीडियाला आणि संबंधित यंत्रणेलाही पाठवले जातात. इंडिया अगेन्सट करप्शनच्या वेबसाईटच्या फेसबुकवर आदित्याच्या या कामगिरीची माहीती दिल्यानंतर आदित्याला अक्षरश: तुडुंब प्रतिसाद मिळतोय ज्यामुळे आदित्यचा हुरूप वाढला आहे.भ्रष्टाचाराविरोधातील या लढाईत एकटा आदित्य लढत नाहीय तर त्याचा पुण्यातील आणि बेंगलुरूमधील 2 मित्र यांच्यासोबत त्याचा धाकटा भाऊही त्याला मदत करतोय. जर तुम्हालाही आदित्यच्या लढाईत सामील व्हायचं असेल SMS करा 844632460 या मोबाईल नंबरवर किंवा इमेल करा Email@corruptionfree.in वर....

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2011 03:21 PM IST

'बच्चे में है दम..';भ्रष्टाचाराविरोधात 14 वर्षांच्या आदित्यचा ई-लढा

25 ऑक्टोबर

अण्णांच्या आंदोलनात तरूणांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्सफूर्त सहभाग होता आता याच आंदोलनातून स्फूर्ती घेऊन पुण्यातील अभिनव इंग्लिश शाळेत 10 वीत शिकत असलेल्या आदित्य पळनीटकर या अवघ्या 14 वर्षाच्या विद्यार्थ्याने भ्रष्टाचाराच्या विरोधात वेबसाईट लाँच केली आहे. www.corruptionfree.in असं या वेबसाईटचं नाव असून या वेबसाईटचं वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल फोन, इमेल तसेच ट्विटरवरून भ्रष्टाचारासंबंधी माहिती पाठवता येते.

या वेबसाईटला प्रचंड प्रतिसाद मिळतोय, गेल्या 15 दिवसात देशाविदेशातील 30 हजार लोकांनी या वेबसाईटला भेट दिली. तसेच लोक उत्स्फूर्तपणे भ्रष्टाचाराचे त्यांना आलेले अनुभव, रिपोर्टस पाठवत आहे. आज समाजात भ्रष्टाचार माजला असताना एका शाळकरी विद्यार्थ्याने या विरोधात उचललेलं हे आश्वासक पाऊल आहे.

आदित्य पळनीटकर हा पुण्यातील सेनापती बापट रोडवर राहणारा 10 व्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी आहेत. एका स्पर्धेत भाग घेतल्यानंतर आदित्यने विषय निवडला होता भ्रष्टाचाराविरोधातील लढाई.. अण्णा हजारेच्या आंदोलनामुळे भारावलेल्या आदित्यच्या मनात मग ठिणगी पेटली की आपण करप्शनविरोधात काही कृती करावी आणि साकारली एक आगळीवेगळी वेबसाईट.

पुणे, मुंबई- बेंगलुरू,कोलकाता यासारख्या देशातील 6 प्रमुख शहरांसाठी खास लिंक्स आहेत तर संपूर्ण देशभरातील नागरिकांकरताही वेगळा पर्याय उपलब्ध आहे.

जर कुणा नागरिकाला आपली ओळख उघड करायची नसेल तर तीही काळजी ही वेबसाईट घेते. हे रिपोर्टस मीडियाला आणि संबंधित यंत्रणेलाही पाठवले जातात. इंडिया अगेन्सट करप्शनच्या वेबसाईटच्या फेसबुकवर आदित्याच्या या कामगिरीची माहीती दिल्यानंतर आदित्याला अक्षरश: तुडुंब प्रतिसाद मिळतोय ज्यामुळे आदित्यचा हुरूप वाढला आहे.

भ्रष्टाचाराविरोधातील या लढाईत एकटा आदित्य लढत नाहीय तर त्याचा पुण्यातील आणि बेंगलुरूमधील 2 मित्र यांच्यासोबत त्याचा धाकटा भाऊही त्याला मदत करतोय.

जर तुम्हालाही आदित्यच्या लढाईत सामील व्हायचं असेल SMS करा 844632460 या मोबाईल नंबरवर किंवा इमेल करा Email@corruptionfree.in वर....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2011 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close