S M L

पुण्यात फटाके मुक्त दिवाळी अभियान

25 ऑक्टोबरफटाके मुक्त दिवाळी करा, प्रदुषण मुक्त दिवाळी करा असं आवाहन सगळ्यांकडून सांगितलं जातं. परंतु, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शाखेनं फटाकेमुक्त दिवाळी अभियान राबवलं आहे. या अभियाना अंतर्गत पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेमधल्या विद्यार्थ्यांकडून एक शपथपत्र भरुन घेण्यात आलं. त्या शपथपत्रामध्ये ''आम्ही फटाक्यांऐवजी पुस्तके घेणार आणि किमान शंभर रुपऐ वाचविणार'' अशा प्रकारची प्रतिज्ञा होती. या अभियाना अंतर्गत मुलांकडून 2 कोटींपेक्षा जास्त बचत केली गेल्याचे समितीकडून सांगण्यात आलं. दरवर्षी 300 पेक्षा जास्त लोक हे फटाक्या पासून होणार्‍या ध्वनी आणि वायू प्रदुषणाच्या समस्येनं ग्रासले जातात. तसेच पर्यावरणाचीही हानी होते. त्यामुळे फटाक्या व्यतिरिक्त दिवाळी साजरी करावी, असा संदेश या अभियानातून दिला गेला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2011 11:20 AM IST

पुण्यात फटाके मुक्त दिवाळी अभियान

25 ऑक्टोबर

फटाके मुक्त दिवाळी करा, प्रदुषण मुक्त दिवाळी करा असं आवाहन सगळ्यांकडून सांगितलं जातं. परंतु, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शाखेनं फटाकेमुक्त दिवाळी अभियान राबवलं आहे. या अभियाना अंतर्गत पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेमधल्या विद्यार्थ्यांकडून एक शपथपत्र भरुन घेण्यात आलं. त्या शपथपत्रामध्ये ''आम्ही फटाक्यांऐवजी पुस्तके घेणार आणि किमान शंभर रुपऐ वाचविणार'' अशा प्रकारची प्रतिज्ञा होती. या अभियाना अंतर्गत मुलांकडून 2 कोटींपेक्षा जास्त बचत केली गेल्याचे समितीकडून सांगण्यात आलं. दरवर्षी 300 पेक्षा जास्त लोक हे फटाक्या पासून होणार्‍या ध्वनी आणि वायू प्रदुषणाच्या समस्येनं ग्रासले जातात. तसेच पर्यावरणाचीही हानी होते. त्यामुळे फटाक्या व्यतिरिक्त दिवाळी साजरी करावी, असा संदेश या अभियानातून दिला गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2011 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close