S M L

देशभरात दिवाळीचा उत्साह

26 ऑक्टोबरदेशभरात दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर फट्याक्यांच्या आतषबाजीने आकाश उजाळून निघाले. अंधाराला मागे टाकून प्रकाशमय करत नव्यावर्षाचं आनंदाने स्वागत केलं जातं आहे. श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला याचंच प्रतिक म्हणून नरकचतुर्दशी साजरी केली जाते. ही परंपरा जपत गोव्यातही रस्त्यारस्त्यावर वेगवेगळ्या आकाराचा नरकासुराचे पुतळे बनवले जातात. एवढंच नाही या पुतळ्यांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. या पुतळ्यांचं दहन केलं जातं. संपूर्ण गोव्यातून हजारो नागरीक या सोहळ्यात सहभागी होत असतात. औरंगाबादेत उजाळलं आसमंतअंधाराचा नाश करून प्रकाशानं आसमंत उजळवून टाकणारा दीपोत्सव औरंगाबादमध्येही सादरा केला गेला. 11 हजार दिवे लावून औरंगाबादमधल्या नागरिकांनी हा प्रकाशाचा सण साजरा केला. दिवाळीची आजची पहाट या पणत्यांनी उजळवून टाकली. औरंगाबादच्या खडकेश्वर मंदिर परिसरात 'एमसीएन नेटवर्क'च्या वतीनं हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. महापौर अनिता घोडेलेंसह हजारो नागरिक या प्रकाशोत्सवात सहभागी झाले होते.ऊसतोड कामगारांची पालवरची दिवाळीतर दुसरीकडे कामासाठी आपलं घरदार सोडून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या ऊसतोडणी कामगारही आपल्यापरीनं दिवाळी साजरी करत आहे. झगमगत्या समाजापासून अनेक वर्षं दूर पालावर ही दिवाळी साजरी होते आहे.सेन्सेक्स 95 अंकानी वधारलाशेअर बाजाारात लक्ष्मीपूजनाच्या शूभ मुहूर्तावर ट्रेडिंग झालं. यावेळी सेन्सेक्स 95 पॉईन्टसनी वधारला तर निफ्टी 16 पॉईंटसी वधारला. शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी लगबग सुरु होती.तसेच कोल्हापूरच्या महालक्ष्मीची कमळ पुष्पामध्ये असलेली वरदायीनी रुपात पुजा बांधण्यात आली. आज लक्ष्मी -कुबेर पुजन असल्यानं कमळ पुष्पामध्ये असलेली वरदायीनी रुपात पूजा बांधण्यात आली. आजची ही पूजा मयुर मुनिश्वर आणि अरुण मयेकंर यांनी बांधली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2011 04:01 AM IST

देशभरात दिवाळीचा उत्साह

26 ऑक्टोबर

देशभरात दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर फट्याक्यांच्या आतषबाजीने आकाश उजाळून निघाले. अंधाराला मागे टाकून प्रकाशमय करत नव्यावर्षाचं आनंदाने स्वागत केलं जातं आहे. श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला याचंच प्रतिक म्हणून नरकचतुर्दशी साजरी केली जाते. ही परंपरा जपत गोव्यातही रस्त्यारस्त्यावर वेगवेगळ्या आकाराचा नरकासुराचे पुतळे बनवले जातात. एवढंच नाही या पुतळ्यांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. या पुतळ्यांचं दहन केलं जातं. संपूर्ण गोव्यातून हजारो नागरीक या सोहळ्यात सहभागी होत असतात.

औरंगाबादेत उजाळलं आसमंत

अंधाराचा नाश करून प्रकाशानं आसमंत उजळवून टाकणारा दीपोत्सव औरंगाबादमध्येही सादरा केला गेला. 11 हजार दिवे लावून औरंगाबादमधल्या नागरिकांनी हा प्रकाशाचा सण साजरा केला. दिवाळीची आजची पहाट या पणत्यांनी उजळवून टाकली. औरंगाबादच्या खडकेश्वर मंदिर परिसरात 'एमसीएन नेटवर्क'च्या वतीनं हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. महापौर अनिता घोडेलेंसह हजारो नागरिक या प्रकाशोत्सवात सहभागी झाले होते.

ऊसतोड कामगारांची पालवरची दिवाळी

तर दुसरीकडे कामासाठी आपलं घरदार सोडून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या ऊसतोडणी कामगारही आपल्यापरीनं दिवाळी साजरी करत आहे. झगमगत्या समाजापासून अनेक वर्षं दूर पालावर ही दिवाळी साजरी होते आहे.

सेन्सेक्स 95 अंकानी वधारला

शेअर बाजाारात लक्ष्मीपूजनाच्या शूभ मुहूर्तावर ट्रेडिंग झालं. यावेळी सेन्सेक्स 95 पॉईन्टसनी वधारला तर निफ्टी 16 पॉईंटसी वधारला. शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी लगबग सुरु होती.

तसेच कोल्हापूरच्या महालक्ष्मीची कमळ पुष्पामध्ये असलेली वरदायीनी रुपात पुजा बांधण्यात आली. आज लक्ष्मी -कुबेर पुजन असल्यानं कमळ पुष्पामध्ये असलेली वरदायीनी रुपात पूजा बांधण्यात आली. आजची ही पूजा मयुर मुनिश्वर आणि अरुण मयेकंर यांनी बांधली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2011 04:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close